CAA : आनंदवार्ता! आता भारतीय नागरिकत्व मिळवण्यासाठी 'असा' करा ऑनलाईन अर्ज; सरकारने सुरु केली वेबसाईट
Citizen Amendment Act 2019 : भारत सरकारने CAA साठी एक नवीन वेब पोर्टल आणि मोबाईल ॲप लाँच केलं आहे. ज्याद्वारे निर्वासित भारतीय नागरिकत्व मिळविण्यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात.
Citizen Amendment Act 2019 : सोशल मीडियावर (Social Media) गेल्या काही दिवसांपासून CAA (Citizen Amendment Act) बद्दल बरीच चर्चा सुरु आहे. CAA म्हणजेच सुधारित नागरिकत्व कायदा. या कायद्याला भारत सरकारने लागू केलं आहे. या कायद्याच्या माध्यमातून सरकार आता अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेशातून 31 डिसेंबर 2014 पर्यंत कोणत्याही कागदपत्राशिवाय भारतात आलेल्या गैर-मुस्लिम म्हणजेच हिंदू, शीख, जैन, ख्रिश्चन, बौद्ध आणि पारशी समुदायातील स्थलांतरित नागरिकांना भारतीय राष्ट्रीयत्व प्रदान करणार आहे.
सरकारने नवीन प्लॅटफॉर्म लॉन्च
आता यासाठी, भारत सरकारच्या गृह मंत्रालयाने एक ऑनलाईन वेब पोर्टल सुरू केलं आहे.या वेब पोर्टलच्या माध्यमातून CAA कायद्याद्वारे भारतीय नागरिकत्व मिळवण्यासाठी लोकांना ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.या वेब पोर्टलबरोबरच सरकारने यासाठी एक अॅपदेखील सुरु केलं आहे. CAA 2019 असं या अॅपचं नाव आहे.
The Citizenship (Amendment) Rules, 2024 under the CAA-2019 have been notified. A new portal has been launched, persons eligible under CAA-2019 can apply for citizenship on this portal https://t.co/Z0BFTYJi8t. (1/2)@HMOIndia @PIB_India @DDNewslive @airnewsalerts
— Spokesperson, Ministry of Home Affairs (@PIBHomeAffairs) March 12, 2024
भारत सरकारने सुरु केलेल्या या नवीन वेब पोर्टल आणि ॲपच्या माध्यमातून लोकांना भारतीय नागरिकत्व मिळवण्यासाठी सर्व नियम, कायदे, प्रश्न आणि कागदपत्रांचा तपशील मिळू शकणार आहे. तसेच, जर कोणाला ऑनलाईन मदत हवी असेल तर तीही या प्लॅटफॉर्मद्वारे मिळू शकते. जर तुम्ही निर्वासित असाल आणि या प्लॅटफॉर्मद्वारे भारतीय नागरिकत्व मिळविण्यासाठी ऑनलाईन अर्ज करू इच्छित असाल, तर तुम्ही या ठिकाणी आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत त्या तुम्ही फॉलो करू शकता.
'या' स्टेप्स फॉलो करा
- यासाठी नागरिकांना सर्वात आधी हे ऑनलाईन पोर्टल किंवा अॅप ओपन करावं लागेल.
- हे अॅप ओपन करताच तुम्हाला नवीन कायद्याची सर्व माहिती मिळेल. त्यानंतर खाली स्क्रोल करा.
- ऑनलाईन सेवांच्या विभागात, तुम्हाला CAA द्वारे नागरिकत्व मिळविण्यासाठी एक लिंक मिळेल, त्यावर क्लिक करा.
- त्यावर क्लिक केल्यानंतर, एक नवीन पेज ओपन होईल. या ठिकाणी तुम्हाला लॉग इन करावं लागेल. त्यासाठी तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी टाकावा लागेल.
- आता Continue ऑप्शनवर क्लिक करा.
'हे' लक्षात घ्या
ही प्रक्रिला फॉलो केल्यानंतर जर, तुम्ही आधीच CAA साठी नोंदणीकृत असाल तर, तुम्ही Continue या बटणावर क्लिक करताच तुम्हाला रजिस्टर्ड मोबाईल नंबर आणि मेल आयडीवर ओक OTP पाठवला जाईल. तो सबमिट करून पुढची प्रक्रिया फॉलो करायची आहे.
महत्त्वाच्या बातम्या :