एक्स्प्लोर

आयफोन 16 मध्ये नवं काय आहे? नेमके फिचर्स कोणते? खरेदी करणं योग्य की अयोग्य

iPhone 16 : अॅपल कंपनीने नुकतेच iPhone 16 सिरीज लॉन्च केली आहे. iPhone 16 मध्ये यावेळी वेगेवगळे अनोखे फिचर्स देण्यात आले आहेत.

मुंबई : अॅपल कंपनीने iPhone 16 सिरीजचे फोन लॉन्च केले आहेत. या फोनची प्री-बुकिंग 13 सप्टेंबरपासून चालू होणार आहे. 20 सप्टेंबरपासून या फोनची विक्री चालू होईल. दरम्यान iPhone 16 तसेच iPhone 16 च्या प्रो आणि मॅक्स मॉडेल्सची विशेषता काय आहे? या मॉडेल्समध्ये नवे काय आहे? हे जाणून घेऊ या... 

आयफोन 16 सुपरफास्ट

iPhone 16 सिरीजमध्ये  A18 Bionic  चिपसेट असेल. या सिरीजचे फोन आयफोन 15 च्या तुलनेत दुपटीने फास्ट असतील. आयफोन 16 च्या सिरीजमध्ये  3nm बेस्ड चिपसेट असेल. आयफोन 16 सिरीजच्या फोनमध्ये अॅपल इंटेलिजन्सचा सपोर्ट मिळेल. iPhone 16 मध्ये अॅपल इंटेलिजन्स, न्यू व्हाईब्रेंट कलर, 2000 युनिट्स ब्राईटनेस असेल.

iPhone 16 ची स्क्रीन किती?

आयफोन 16 या फोनला 6.1 इंची स्क्रीन असेल. तर iPhone 16  प्लस या फोनची स्क्रीन 6.7 इंच असेल. iPhone 16 सिरीजच्या फोनमध्ये अॅक्शन बटन असेल. या अॅक्शन बटनच्या मदतीने तुम्हाला कॅमेरा कंट्रोल करता येणार आहे. 

अॅपल इंटेलिजन्सचा सपोर्ट

iPhone 16 सिरीजच्या फोनमध्ये अॅपल इंटेलिजन्स पूर्णपणे विनामूल्य अशेल. या फोनला अनेक भाषांचा सपोर्ट असेल. या फोनमध्ये अॅपल एआय सर्च फोटोचे फिचर असेल. या फिचरच्या मदतीने तुम्ही तुमच्या फोनला डिस्क्रीप्शन देऊ शकाल. तुमचा इमेल समराईज होऊ शकेल.

iPhone 16  फोनचा कॅमेराही इतर आयफोनच्या तुलनेत वेगळा असेल. या फोनमध्ये ड्यूअल कॅमेरा असेल. मेन कॅमेरा 48 मेगापिक्सेल असेल. सोबतच 12 मेगापिक्सेलचा अल्ट्रा वाईड कॅमेरा असेल. या फोनमध्ये मायक्रो फोटोग्राफीचा सपोर्ट असेल. या फोनमध्ये 60fps वर 4k व्हिडीओ शूट करता येईल. या फोनमध्ये डॉल्बी व्हर्जन सपोर्ट आहे. आयफोन 16 मध्ये फ्यूजन कॅमेरा लेन्स असेल.

आयफोन 16 प्रो मॉडेलमध्ये काय असेल? 

आयफोन प्रो मॉडेलमध्ये 6.3 इंची स्क्रीन असेल. आयफोन 16 प्रो मॅक्स मॉडेलमध्ये 6.9 इंची स्क्रीन असेल. आयफोन 16 चे प्रो मॉडेल एकूण चार कलरमध्ये असेल. यात सॉफ्ट आणि डार्क टायटेनियम कलरही देण्यात आला आहे. आयफोन 16 प्रो आणि आयफोन 16 प्रो मॅक्स या दोन्ही मॉडेल्सना अॅफल इंटेलिजन्स सपोर्ट असेल. आयफोन 16 प्रो मॉडेलमध्ये Apple A18 Pro चिपसेट असेल.

आयफोन 16  प्रो मोबाईलचा कॅमेरा कसा असेल? 

आयफोन 16 प्रो आणि प्रो मॅक्स मॉडेलमध्ये ट्रिपल कॅमेरा असेल. यातील मेन कॅमेरा हा 48 मेगा पिक्सेलचा असेल. या कॅमेऱ्याची फोकल लेंथ ही 24mm असेल. या फोनमध्ये एक अल्ट्रा वाईड कॅमेरा असेल. याची फोकल लेंथ 13mm असेल. या फोनमध्ये फोटो काढताना कलर ग्रेडिंग कंट्रोलची सुविधा आहे. आयफोन 16 प्रो मॉडेलची बॅटरी 3577 mAh तर आयफोन 16 प्रो मॅक्स मॉडेलची बॅटरी 4676 mAh एवढ्या क्षमतेची असेल. या दोन्ही मॉडेल्सला वायरलेस चार्जिंगची सुविधा आहे. आयफोन 16 प्रो आणि मॅक्स या दोन्ही मॉडेल्समधील दोन कॅमेरे हे 48 मेगा पिक्सेल तर एक कॅमेरा हा 12 मेगा पिक्सेलचा असेल. या दोन्ही फोनचा फ्रंट कॅमेरा हा 12 मेगा पिक्सेलचा असेल. या कॅमेऱ्यातून 4k व्हिडीओ शुटिंग करता येईल.

हेही वाचा :

दमदार फिचर्ससह आयफोन 16 लॉन्च, भारतात किती रुपयांना मिळणार? प्रो, मॅक्स मॉडेल्सची किंमत काय? वाचा सविस्तर...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Navneet Rana: अमरावतीत नवनीत राणांच्या सभेत जोरदार राडा, राणांच्या अंगावर खुर्च्या भिरकावल्या, 40 जणांवर गुन्हे दाखल
अमरावतीत नवनीत राणांच्या सभेत जोरदार राडा, राणांच्या अंगावर खुर्च्या भिरकावल्या, 40 जणांवर गुन्हे दाखल
Kalicharan Maharaj : जो हिंदू हिताबाबत बोलेल, त्यालाच मतदान करा, कालीचरण महाराजांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, हिंदू धर्मगुरूंनीही...
जो हिंदू हिताबाबत बोलेल, त्यालाच मतदान करा, कालीचरण महाराजांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, हिंदू धर्मगुरूंनीही...
जयंत पाटलांना CM करण्याची चर्चा, सदाभाऊ खोतांचा खोचक टोला; म्हणाले, मुख्यमंत्री व्हायला...
जयंत पाटलांना CM करण्याची चर्चा, सदाभाऊ खोतांचा खोचक टोला; म्हणाले, मुख्यमंत्री व्हायला...
Nora Fatehi: डोळ्यात काजळाची रेघ, लांबसडक वेणी, नाेरा फतेहीच्या लुकने चाहते खिळले, पारंपरिक पेहरावातले फोटो पाहिलेत का?
डोळ्यात काजळाची रेघ, लांबसडक वेणी, नाेरा फतेहीच्या लुकने चाहते खिळले, पारंपरिक पेहरावातले फोटो पाहिलेत का?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

CM Eknath Shinde : माहीमचा गोंधळ ते मुख्यमंत्रीपद..एकनाथ शिंदेंची स्फोटक मुलाखत!TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 17 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  8 AM : 17  नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMNS-Shivsena Sewri : प्रतिस्पर्धी अजय चौधरी आणि बाळा नांदगावकरांचा नागरिकांशी दिलखुलास संवाद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Navneet Rana: अमरावतीत नवनीत राणांच्या सभेत जोरदार राडा, राणांच्या अंगावर खुर्च्या भिरकावल्या, 40 जणांवर गुन्हे दाखल
अमरावतीत नवनीत राणांच्या सभेत जोरदार राडा, राणांच्या अंगावर खुर्च्या भिरकावल्या, 40 जणांवर गुन्हे दाखल
Kalicharan Maharaj : जो हिंदू हिताबाबत बोलेल, त्यालाच मतदान करा, कालीचरण महाराजांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, हिंदू धर्मगुरूंनीही...
जो हिंदू हिताबाबत बोलेल, त्यालाच मतदान करा, कालीचरण महाराजांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, हिंदू धर्मगुरूंनीही...
जयंत पाटलांना CM करण्याची चर्चा, सदाभाऊ खोतांचा खोचक टोला; म्हणाले, मुख्यमंत्री व्हायला...
जयंत पाटलांना CM करण्याची चर्चा, सदाभाऊ खोतांचा खोचक टोला; म्हणाले, मुख्यमंत्री व्हायला...
Nora Fatehi: डोळ्यात काजळाची रेघ, लांबसडक वेणी, नाेरा फतेहीच्या लुकने चाहते खिळले, पारंपरिक पेहरावातले फोटो पाहिलेत का?
डोळ्यात काजळाची रेघ, लांबसडक वेणी, नाेरा फतेहीच्या लुकने चाहते खिळले, पारंपरिक पेहरावातले फोटो पाहिलेत का?
Amit Thackeray: राज ठाकरेंच्या डोळ्यात तेव्हा पहिल्यांदा पाणी बघितलं; अमित ठाकरेंनी सांगितली आठवण
राज ठाकरेंच्या डोळ्यात तेव्हा पहिल्यांदा पाणी बघितलं; अमित ठाकरेंनी सांगितली आठवण
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
शरद पवारांच्या सांगता सभेकडे अख्ख्या देशाचं लक्ष, बारामतीत शेवटच्या सभेत काय घोषणा करणार? अजितदादा चितपट होणार?
शरद पवारांच्या सांगता सभेकडे अख्ख्या देशाचं लक्ष, बारामतीत शेवटच्या सभेत काय घोषणा करणार? अजितदादा चितपट होणार?
×
Embed widget