दमदार फिचर्ससह आयफोन 16 लॉन्च, भारतात किती रुपयांना मिळणार? प्रो, मॅक्स मॉडेल्सची किंमत काय? वाचा सविस्तर...
iphone 16 series : आयफोन 16 लॉन्च झाला आहे. या फोनचे प्रो आणि मॅक्स मॉडेल्सही लॉन्च करण्यात आले आहेत. 20 सप्टेंबरपासून या नव्या आयफोन्सची विक्री केली जाणार आहे.
मुंबई : गेल्या कित्येक दिवसांपासून संपूर्ण जग अॅपल कंपनीच्या आयफोन 16 (iphone 16 Series Launch) या नव्या फोन सिरीजची वाट पाहात होतं. या नव्या फोनमध्ये आतापर्यंतचे सर्वांत दमदार फिचर्स असणार असे सांगितले जात होते. हा फोन कसा असणार? त्याची किंमत काय असेल? असे अनेक प्रश्न लोकांना पडले होते. दरम्यान, आता आयफोन 16 सिरीजचे प्रो, मॅक्स मॉडेल्सची खरीखुरी किंमत तसेच या फोनचे फिचर्स समोर आले आहेत.
आयफोन 16 चे प्रो, मॅक्स मॉडेल्स लॉन्च
गेल्या कित्येक दिवसांची प्रतीक्षा संपली आहे. भारतासह जगभरात आयफोन 16 सिरीज लॉन्च झाली आहे. आयफोन 16 सिरिजच्या या नव्या फोनमध्ये अनेक दमदार फिचर्स आले आहेत. आयफोन 15, आयफोन 14 च्या तुलनेत या नव्या फोनमध्ये अनेक स्पेसिफिकेशन्स अपग्रेड करण्यात आले आहेत. सध्या आयफोन 16 सिरीजचे फोन खरेदी करण्यासाठी तुम्हाला प्री-ऑर्डर बुकिंग करावी लागणार आहे. फ्लिपकार्ट, अॅमोझॉन तसेच अॅपल स्टोअरवर ही प्री-ऑर्डर करता येईल. 20 सप्टेंबरपासून आयफोन 16 सिरीजचे फोन मिळण्यास सुरुवात होईल.
आयफोन 16 सिरीजची स्टँडर्ड किंमत काय? (What is price of iphone 16)
आयफोन 16 या फोनची किंमत फोन 799 अमेरिकन डॉलर्स म्हणजेच साधारण 67,000 रुपयांपासून पुढे आहे तर आयफोन 16 प्लसची किंमत 899 अमेरिकी डॉलर्स म्हणजेच साधारण 75500 रुपये असेल. आयफोन 16 प्रो (128 जीबी) मॉडेलची किंमत 999 अमेरिकन डॉलर्स म्हणजेच 83,870 रुपये असणार आहे. आयफोन 16 प्रो मॅक्स (256 जीबी) मॉडेलची किंमत 1199 अमेरिकी डॉलर्स म्हणजेच साधारण एक लाख रुपये असणार आहे.
भारतात आयफोन 16 किती रुपयांना मिळणार? (Indian price of iphone 16)
वर नमूद केलेली किंमत ही स्टँडर्स किंमत आहे. मात्र प्रत्येक देशात तेथील स्थानिक कररचनेनुसार आयफोन 16 सिरीजच्या फोनची किंमत वेगवेगळी असणार आहे. भारतात आयफोन 16 हा फोन 79900 रुपयांना मिळणार आहे. तर आयफोन 16 प्लस हा फोन 89900 रुपयांना मिळेल. आयफोन 16 प्रो हा फोन 1 लाख 19 हजार 900 रुपयांपासून पुढे मिळेल. तर आयफोन 16 प्रो मॅक्स हा फोन भारतीय बाजारात 1 लाख 44 हजार 900 रुपयांना मिळेल.
13 सप्टेंबरपासून बुकिंग सुरू
13 सप्टेंबरपासून या फोनला प्री-ऑर्डर करता येणार आहे. 20 सप्टेंबरपासून या फोनची प्रत्यक्ष विक्री चालू होईल.
हेही वाचा :
WhatsApp वरुन डिलीट केलेले मेसेज कसे वाचायचे? जाणून घ्या सोपी पद्धत, तुम्हाला कुणीच फसवू शकणार नाही