Iphone 15 : अमेरिका, युरोपसोबत भारतातही Iphone 15 एकाच वेळी होणार लॉंच
Iphone यूजर्सकरता मोठी आनंदाची बातमी आहे. यूएस, युरोप, यूके आणि इतर बाजारपेठेसोबत भारतातही एकाच वेळी आयफोन लॉंच होण्याची शक्यता आहे.
Iphone 15 Series : बहुप्रतिक्षित आयफोन 15 ची अनेकजण आतुरतेने वाट पाहत आहेत. मोठ्या प्रतीक्षेनंतर आता लवकरच Iphone 15 बाजारात येणार आहे आणि विशेष म्हणजे त्याची बाजारात येण्याची तारीखही आता ठरली आहे. येत्या 12 सप्टेंबरला Iphone 15 बाजारात येणार आहे. आयफोन 15, आयफोन 15 प्रो मॅक्स, आयफोन 15 अल्ट्रा बाजारात येणार आहे. सोबतच ॲपल वॉच 9 आणि आयपॅडचे नवे वर्जन बाजारात दाखल होतील.
यावेळी मात्र Iphone यूजर्सकरता मोठी आनंदाची बातमी आहे. यूएस, युरोप, यूके आणि इतर बाजारपेठेतील लोकांसोबत भारतीयांनाही त्याच वेळी Iphone उपलब्ध होण्याची शक्यता आहे. आधी Iphone करता वाट पाहावी लागत होती आता मात्र तुम्हाला लगेच Iphone उपलब्ध होणार आहे. भारतात देखील इतर देशांप्रमाणेच iPhone 15 अनबॉक्स केला जाणार असल्याचे एका रिपोर्टमधून समोर आले आहे.
इकॉनॉमिक टाईम्सच्या वृत्तानुसार, Apple या वर्षी लवकर भारतात iPhone 15 चे अनावरण करण्याची योजना आखत आहे. Apple भारतात एकाच वेळी किंवा काही दिवसांच्या अंतराने आयफोन 15 लाँच करेल. असे झाल्यास ग्राहकांकरता ही वार्ता आनंदाची ठरणार आहे. आयफोन 15 चे उत्पादन भारतातील तामिळनाडूमध्ये सुरू झाले आहे.
iPhone 15 ची संभाव्य वैशिष्ट्ये
iPhone 15 मध्ये 6.1-इंचाचा लिक्विड रेटिना डिस्प्ले दिला जाण्याची अपेक्षा आहे. असे म्हटले जात आहे की, त्याच्या सर्व मॉडेल्समध्ये डायनॅमिक आयलँड-स्टाईल डिस्प्ले असेल. गेल्या वर्षीपर्यंत ते प्रो मॉडेलपुरते मर्यादित होते. कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर, आयफोन 15 पूर्वीपेक्षा अधिक चांगल्या प्रोसेसरसह ऑफर केला जाऊ शकतो. असेही सांगितले जाते की या नवीन सीरिजमध्ये A16 बायोनिक चिपसेट दिला जाऊ शकतो.
कॅमेर्याबद्दल बोलायचे झाले तर, iPhone 15 मध्ये 48-मेगापिक्सेल इमेज सेन्सरसह ड्युअल रियर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. त्यात सॉफ्टवेअर अपग्रेडही दिले जाऊ शकते. iPhone 15 वरून चांगल्या बॅटरी बॅकअपची अपेक्षा करू शकतो. या फोनमध्ये नवीन iOS सॉफ्टवेअर अपडेट दिले जाऊ शकते. भारतात iPhone 15 ची किंमत जवळपास 80,000 रुपये असेल. ही सर्वात स्वस्त मॉडेलची किंमत असू शकते. त्याचवेळी, काही लीक्समध्ये असेही बोलले जात आहे की कंपनी Apple iPhone 15 ची किंमत वाढू शकते.
संबंधित बातमी:
ChatGPT : चॅटजीपीटी लसीकरणासाठी अधिक चालना देऊ शकतो, अभ्यासात उघड; पण नेमकं कसं? वाचा सविस्तर