एक्स्प्लोर

मोठी बातमी! आयफोन 16 लॉन्च होताच आयफोन 15, आयफोन 14 झाले स्वस्त, तब्बल 'इतक्या' रुपयांनी घट!

अॅपलने नुकतेच आयफोन 16 सिरीज लॉन्च केली आहे. त्यानंतर आता आयफोन 15 आणि आयफोन 14 च्या किमती कमी करण्यात आल्या आहेत.

Apple iPhone 16 Series : ॲपल कंपनीने आयफोन 16 सिरीज लॉन्च केली आहे. या सिरीजअंतर्त ॲपलने आयफोन 16,  आयफोन 16 प्लस, आयफोन 16 प्रो आणि आयफोन 16 प्रो मॅक्स असे एकूण चार फोन आणले आहेत. या चारही फोनमध्ये दमदार फिचर्स आहेत. येत्या 13 सप्टेंबरपासून या फोनला प्री-ऑर्डर करता येणार आहे. तर 20 सप्टेंबरपासून या फोनच्या वितरणाला सुरुवात होईल. दरम्यान, आयफोनची ही नवी सिरीज लॉन्च होताच ॲपल कंपनीने आपल्या याआधीच्या फोनच्या किमतीत मोठी सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. आयफोन 15, आयफोन 14 या फोनमध्ये बम्पर सूट देण्यात आली आहे. 

आयफोन 15, आयफोन 14 किती रुपयांनी स्वस्त

आयफोन 16 सिरीजच्या लॉन्चिंगनंतर ॲपल कंपीने आपल्या इतर 5 फोनच्या किमतीत घट केली आहे. ॲपल कंपनीच्या अधिकृत स्टोअरवर या पाच आयफोनची नवी किंमत दाखवण्यात येत आहे. कंपनीने या आयफोन्सच्या किमती साधारण 10,000 रुपयांनी स्वस्त केल्या आहेत. नव्या iPhone 16 ला कंपनीने 79,900 रुपयांपासून लॉन्च केले आहे. या नव्या सिरीजच्या फोनमध्ये डेडिकेटेड कॅप्चर बटन, नवे प्रोसेसर, ॲपल इन्टेलिजेन्स यासह अनेक दमदार फिचर्स देण्यात आले आहेत. 

iPhone 15, iPhone 15 Plus

गेल्या वर्षी 12 सप्टेंबर 2023 रोजी लॉन्च झालेल्या आयफोन 15 आणि आयफोन 15 प्लस या मॉडेल्सवर ॲपल कंपनीने 10,000 रुपयांची कायमस्वरुपी कपात केली आहे. गेल्या वर्षी iPhone 15 या फोनची सुरुवातीची किंमत 79,900 रुपये होती. हा फोन 128GB, 256GB आणि 512GB स्टोअरेज व्हेरियंटमध्ये लॉन्च करण्यात आला होता. iPhone 15 Plus या फोनची सुरुवातीची किंमत 89,900 रुपये होती.
iPhone 16 ही नवी सिरीज आल्यानंतर या दोन्ही फोनच्या किमतीत 10,000 रुपयांनी घट करण्यात आली आहे. यासह या फोन्सवर 4,000 रुपयांचे इन्स्टंट बँक डिस्काऊन्ट दिले जात आहे. आता iPhone 15 हा 69,900 रुपयांना मिळत आहे. सोबतच बँक डिस्काउन्ट, एक्स्चेंज ऑफर आदी लाभ मिळणार आहे. तर iPhone 15 Plus या फोनसाठी आता 79,900 रुपये मोजावे लागतील.

iPhone 14, iPhone 14 Plus

आयफोन 14 आणि आयफोन 14 प्लस हे ॲपल कंपनीचे फोन 2022 साली लॉन्च करण्यात आले होते. या दोन्ही मोबाईल्सची किंमत गेल्या वर्षी 10,000 रुपयांनी कमी करण्यात आली. ॲपल कंपनीने आता पुन्हा एकदा या दोन्ही मॉडेल्सची किंमत 10,000 रुपयांनी कमी केली आहे. या दोन्ही फोनच्या खरेदीवर 4,000 रुपयांचे बँक डिस्काउन्ट दिले जात आहे. iPhone 14 9 सप्टेंबर रोजी 69,900 रुपयांना मिळत होता. आता हा फोन 59,900 रुपयांना मिळतोय. तर iPhone 14 Plus या फोनला तुम्ही 69,900 रुपयांना खरेदी करू शकता. हे दोन्ही फोन 128GB, 256GB आणि 512GB या व्हेरियंटमध्ये मिळतील. 

Phone SE 3 (2022)

ॲपलच्या iPhone SE 3 या फोनच्या किमतीतही घट करण्यात आली आहे. 2022 साली हा फोन लॉन्च झाला होता. या फोनला आता 47,600 रुपयांना खरेदी करता येणार आहे. हो फोन सुरुवातीला 49,900 रुपयांना मिळायचा. या फोनच्या खरेदीवर 4,000 रुपयांचे बँक डिस्काउन्ट दिले जात आहे. iPhone SE 3 हा 64GB, 128GB आणि 256GB या तिन्ही स्टोअरेज व्हेरियंटवर उपलब्ध आहे.

हेही वाचा :

आयफोन 16 मध्ये नवं काय आहे? नेमके फिचर्स कोणते? खरेदी करणं योग्य की अयोग्य

दमदार फिचर्ससह आयफोन 16 लॉन्च, भारतात किती रुपयांना मिळणार? प्रो, मॅक्स मॉडेल्सची किंमत काय? वाचा सविस्तर...

प्रज्वल ढगे हे 'एबीपी माझा ऑनलाईन'टीममध्ये 'कॉपी एडिटर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकारण, मनोरंजन, क्रीडाविषयक बातम्यांमध्ये विशेष रस आहे. त्यांनी याआधी 'लोकसत्ता', 'टीव्ही ९ मराठी' या माध्यमांत काम केलेले आहे.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

EPFO : गुड न्यूज, पीएफचे पैसे UPI द्वारे काढता येणार, ईपीएफओ एप्रिलपासून नवा पर्याय उपलब्ध होणार
गुड न्यूज, पीएफचे पैसे UPI द्वारे काढता येणार, ईपीएफओ एप्रिलपासून नवा पर्याय उपलब्ध होणार
Eknath Shinde मोठी बातमी! एकनाथ शिंदेंना कुणाची भीती? शिवसेनेचे मुंबईतील 29 नगरसेवक हॉटेलमध्ये मुक्कामी
मोठी बातमी! एकनाथ शिंदेंना कुणाची भीती? शिवसेनेचे मुंबईतील 29 नगरसेवक हॉटेलमध्ये मुक्कामी
रुपाली ठोंबरेंचे फेसबुकवर 3 लाख 72 हजार फॉलोअर्स; पुण्यात महापालिकेला 2 ठिकाणी पराभव
रुपाली ठोंबरेंचे फेसबुकवर 3 लाख 72 हजार फॉलोअर्स; पुण्यात महापालिकेला 2 ठिकाणी पराभव
भाजपकडून मताला 15 हजार वाटले, तरीही उमेदवार पडले; परभणी जिंकणाऱ्या बंडू जाधवांनी सगंळच काढलं
भाजपकडून मताला 15 हजार वाटले, तरीही उमेदवार पडले; परभणी जिंकणाऱ्या बंडू जाधवांनी सगंळच काढलं

व्हिडीओ

CM Devendra Fadnavis : मुंबईत भाजपच मोठा पक्ष, मुख्यमंत्र्यांचा विजयी नगरसेवकांसोबत संवाद
Special Report Asaduddin Owaisi 29 पैकी 13 महापालिकांत MIM ची बाजी,ओवैसींचे फासे, एमआयएमचे सव्वाशे
Ganesh Naik Navi Mumbai : नवी मुंबईत भाजपच्या विजयानंतर गणेश नाईक यांची प्रतिक्रिया
Special Report Vasai Virar Malegaon स्थानिक पक्ष सत्तेत; भाजपची चांगली कामगिरी, पण सत्तेपासून दूरच
Santosh Dhuri on Thackeray BMC Election : मनसेची चेष्टा,एकत्र येऊनही 6 जागा जिंकल्या; आता ठाकरे....

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO : गुड न्यूज, पीएफचे पैसे UPI द्वारे काढता येणार, ईपीएफओ एप्रिलपासून नवा पर्याय उपलब्ध होणार
गुड न्यूज, पीएफचे पैसे UPI द्वारे काढता येणार, ईपीएफओ एप्रिलपासून नवा पर्याय उपलब्ध होणार
Eknath Shinde मोठी बातमी! एकनाथ शिंदेंना कुणाची भीती? शिवसेनेचे मुंबईतील 29 नगरसेवक हॉटेलमध्ये मुक्कामी
मोठी बातमी! एकनाथ शिंदेंना कुणाची भीती? शिवसेनेचे मुंबईतील 29 नगरसेवक हॉटेलमध्ये मुक्कामी
रुपाली ठोंबरेंचे फेसबुकवर 3 लाख 72 हजार फॉलोअर्स; पुण्यात महापालिकेला 2 ठिकाणी पराभव
रुपाली ठोंबरेंचे फेसबुकवर 3 लाख 72 हजार फॉलोअर्स; पुण्यात महापालिकेला 2 ठिकाणी पराभव
भाजपकडून मताला 15 हजार वाटले, तरीही उमेदवार पडले; परभणी जिंकणाऱ्या बंडू जाधवांनी सगंळच काढलं
भाजपकडून मताला 15 हजार वाटले, तरीही उमेदवार पडले; परभणी जिंकणाऱ्या बंडू जाधवांनी सगंळच काढलं
Share Market : रविवारी शेअर बाजार सुरु राहणार, एनएसई आणि बीएसईवर ट्रेडिंग होणार, केंद्रीय अर्थसंकल्पादिवशी शेअर बाजार सुरु राहणार
भारतीय शेअर बाजार रविवारी सुरु राहणार,केंद्रीय अर्थसंकल्पादिवशी विशेष ट्रेडिंग सत्राचं आयोजन
एकनाथ शिंदेंच्या प्रभागात, नंदनवन बंगल्याच्या भागात ठाकरेंचा पठ्ठ्या जिंकला; आई वडिलांच्या डोळ्यात पाणी
एकनाथ शिंदेंच्या प्रभागात, नंदनवन बंगल्याच्या भागात ठाकरेंचा पठ्ठ्या जिंकला; आई वडिलांच्या डोळ्यात पाणी
वसंत मोरेंचे फेसबुकवर 6 लाख फॉलोअर्स; पुण्यातून पराभव, निवडणुकीत किती मतं?
वसंत मोरेंचे फेसबुकवर 6 लाख फॉलोअर्स; पुण्यातून पराभव, निवडणुकीत किती मतं?
मुंबईचा महापौर आमचा व्हावा ही आजही इच्छा; निवडणुकीतील पराभवानंतर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले
मुंबईचा महापौर आमचा व्हावा ही आजही इच्छा; निवडणुकीतील पराभवानंतर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले
Embed widget