WhatsApp वरुन डिलीट केलेले मेसेज कसे वाचायचे? जाणून घ्या सोपी पद्धत, तुम्हाला कुणीच फसवू शकणार नाही
How To Read Whatsapp Deleted Message: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म व्हॉट्सॲपचा वापर सर्वाधिक केला जातो. व्हॉट्सॲपवरुन डिलीट केलेले मेसेज कसे वाचायचे असा देखील प्रश्न अनेकांना पडलेला असतो.
How To Read Whatsapp Deleted Messageनवी दिल्ली: सर्वाधिक वापरला जाणारा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म म्हणून व्हाटसअपची ओळख आहे. व्हॉट्सॲपमधील अनेक फीचर्स फायदेशीर ठरतात. काही यूजर्स मेसेज पाठवतात आणि डिलीट करत असल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळं ज्या व्यक्तीला मेसेज पाठवलेला असतो त्याला नेमका कोणता संदेश आला होता ते समजत नाही. अनेकदा अशा घटना घडत असल्यास तुम्हाला व्हॉट्सॲप वापरण्यासंदर्भातील काही स्टेप्सचा वापर केल्यास डिलीट झालेले मेसेज वाचता येतील. त्यामुळं तुम्हाला कोणीही फसवू शकत नाही.
व्हॉट्सॲपवरील डिलीट केलेले मेसेज कसे वाचायचे?
व्हॉट्सॲपवरील डिलीट केलेले मेसेज वाचणं सोपं आहे. तुम्हाला यासाठी तुमच्या स्मार्टफोनच्या सेटिंग्ज मध्ये जावं लागेल. त्यानंतर तिथं तुम्हाला नोटिफिकेशन हा पर्याय पाहायला मिळेल. त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही एडवान्स सेटिंग्जव क्लिक करा. इथं तुम्हाला नोटिफिकेश हिस्ट्री हा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक केल्यास तुम्हाला डिलीट झालेले सर्व मेसेज पाहायला मिळतील. मात्र, यासाठी तुम्हाला त्याचवेळी व्हॉट्सॲप मेसेजसाठी येणाऱ्या नोटिफिकेशनचा पर्याय सुरु करुन ठेवावा लागेल. तो पर्याय बंद असेल तर तुम्हाला डिलीट केलेले मेसेज वाचता येणार नाहीत.
व्हॉट्सॲपच्या मेसेजचं नोटिफिकेशन सुरु करुन ठेवल्यास त्याचवेळी फोनच्या नोटिफिकेशनद्वारे त्या मेसेजचं नोटिफिकेशन दिलं जातं. यामुळं तुम्ही डिलीट केलेले मेसेज वाचू शकता. यामुळं तुम्ही जेव्हा तुमच्या फोनमधील नोटिफिकेसन हिस्ट्री पाहता त्यावेळी तिथं डिलीट केलेले मेसेज देखील पाहायला मिळतात.
व्हॉट्सॲपवर लवकरच नवं फीचर
व्हॉट्सॲप त्यांच्या यूजर्सना चांगला अनुभव देण्यासाठी एक नवीन फीचर आणणार आहे. त्यामुळं तुमची गोपनियता मजबूत होईल. Block unknown account messages या नावानं नवं फीचर येणार आहे. त्यामुळं यूजर्सच्या अकाऊंटची गोपनीयता आणखी मजबूत होईल.
इतर बातम्या :
UPS Calculation : मूळ पगार 50000 रुपये असेल तर UPS अंतर्गत किती मिळणार पेन्शन?
Silver import: चांदीची मागणी वाढली, यावर्षी देशात 7000 टन चांदीची आयात होणार