यू यूफोरिया: 8 मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा आणि 5 मेगापिक्सलचा फ्रन्ट कॅमेरा, 2GB रॅम आणि 5 इंचाचा HD डिस्प्ले असलेल्या या स्मार्टफोनची किंमत गेल्या वर्षी 6,999 रुपये होती. मात्र, या मेगासेल अंतर्गत हा स्मार्टफोन 5,499 रुपयांना मिळत आहे.
2/11
शाओमी MI 5: शाओमीचा फ्लॉगशिप Mi 5 ची किंमत या वर्षाच्या सुरुवातीला 24,999 रुपये होती. मात्र, अमेझॉनने याच्या दोन व्हेरिएंटवर 2000 रुपयापर्यंत सवलत देण्यात आली आहे. शाओमी Mi 5 चे ब्लॉक आणि व्हाईट व्हेरिएंट तुम्हाला 22,999 रुपयांना मिळतील.
3/11
किनेक्टसोबत एक्सबॉक्स वन : व्हिडीओ गेमच्या चाहत्यांसाठी या सेलमध्ये किनेक्टसोबत एक्सबॉक्स वनवर मोठी सवलत देण्यात आली आहे. याची मूळ किंमत 45,990 रुपये आहे. या मेगासेलमध्ये किनेक्टसोबत एक्सबॉक्स 'वन हालो द मास्टर चीफ कलेक्शन बंडल' फक्त 29,990 रुपयांना मिळत आहे.
4/11
मायक्रोमॅक्सचा 40 इंची फुल HD LED टीव्ही: जर तुम्ही कमी किमतीचा फुल HD LED टीव्ही खरेदी करण्याचा विचारात असाल, तर या मेगासेलमध्ये तुमच्यासाठी चांगली ऑफर आहे. 39990 रुपयांमध्ये मिळणारा मायक्रोमॅक्सचा 40 इंची फुल HD LED टीव्ही 49% सवलतीवर 20,299 रुपयांना मिळेल.
5/11
इनफोक्स II: 50EA 800 50 इंचाचा फुल HD LED टीव्ही : 38000 रुपयांना मिळणाऱ्या इनफोक्स II: 50EA 800, 16 वॉट ऑडिओ, एक यूएस पोर्ट टीव्ही फुल HD LED रिझॉल्यूशन डिस्प्लेवाला हा टीव्ही तुम्हाला केवळ 29,990 रुपयांना मिळेल.
6/11
गो प्रो हिरो 4 अॅडव्हेंचर अॅडिशन : 34,900 रुपयांना मिळणारा, गो प्रो हिरो 4 अॅडव्हेंचर व्हिडीओ कॅमेरा तुम्हाला 14%च्या सवलतीवर 29,999 रुपयांना मिळेल. हा वॉटरप्रुफ कॅमेरा 1080p फुल HD व्हिडीओ रेकॉर्डिंगसाठी उत्तम आहे.
7/11
अमेझॉन या ई-कॉमर्स कंपनीने ऑनलाईन शॉपिंग करणाऱ्या ग्राहकांसाठी तीन दिवसांची मेगासेल ऑफर सुरु केली आहे. 8 ते 10 ऑगस्टदरम्यान सुरु केलेल्या ग्रेट इंडियन सेल या ऑफर अंतर्गत इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीवर मोठी सूट दिली आहे. यामध्ये स्मार्टफोन, लॅपटॉप, पीसी, टॅबलेट, आदींवर ही सवलत मिळत आहे.
8/11
फिटबिट : फिटनेससाठी अमेझॉन इंडियावर 20% सवलतीवर चार्ज एचआर, ब्लेज स्मार्ट फिटनेस वॉचसारखी उत्पादने आहेत. ही उत्पादने तुम्हाला 6,799 रुपयांपासून 19,999 रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत.
9/11
कूलपॅड नोट 3 : 8,999 रुपयांना मिळणाऱ्या या स्मार्टफोनवर तुम्हाला 1000 रुपयांची सूट मिळत आहे. यामध्ये 5.5 इंचाचा 720p डिस्प्ले, 3 जीबी रॅम आणि 3000mAh बॅटरीसोबत हा स्मार्टफोन तुम्हाला 7,999 रुपयांना मिळेल.
10/11
ऑडिओ-टेक्निका H M50x : ऑडिओ-टेक्निका या हाय क्वॉलिटी हेडफोनची किंमत 10,699 रुपये आहे. मात्र, या सेल अंतर्गत हा हेडफोन 8,999 रुपयांमध्ये मिळत आहे, प्रोफेशनल ग्रेडच्या या हेडफोनमध्ये 20,000Hz फ्रिक्वेंसी रिस्पाँस, 700mW पर्यंतचे इनपुट पॉवर आणि 96dbसेन्सिटिव्हीटी आहे.
11/11
अमेझॉन किंडल: अमेझॉनवप मिळणाऱ्या प्रसिद्ध किंडलची किंमत 5,999 रुपयांवरून 4,999 रुपये करण्यात आली आहे. किंडल पेपरव्हाईट सुद्धा 8,999 रुपयांमध्ये मिळत आहे.