ऋषभ पंतच्या वाढदिवशी युवराज सिंगची शुभेच्छाची पोस्ट व्हायरल!
भारतीय क्रिकेट संघाचा यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतचा आज वाढदिवस आहे. यानिमित्त माजी क्रिकेटपटू युवराज सिंगने शुभेच्छाची पोस्ट लिहली आहे. ही पोस्ट तुफान व्हायरल होत आहे.
भारतीय क्रिकेट संघाचा यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतचा आज 23 वा वाढदिवस आहे. तरुण वयातचं पंतने आपल्या उत्कृष्ट खेळामुळे दिग्गज खेळाडूंना आकर्षित केलं आहे. टीम इंडियामध्ये महेंद्रसिंग धोनीचा उत्तराधिकारी म्हणून पंतला ओळखलं जातं. पंत यांच्या वाढदिवसानिमित्त टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंगने जबरदस्त शुभेच्छा दिल्या आहेत. युवराज अनेकदा आपल्याबरोबर खेळलेल्या खेळाडूंची मजा घेतो. युवराजने केलेली वाढदिवसाची पोस्ट सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
युवराजने आपल्या इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये तो पंतबरोबर दिसत आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्याने असे लिहिले आहे की, 'ज्याचं नाव आहे पंत आणि वागणं निक्कर सारखं. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. सुरक्षित रहा आणि आयपीएलच्या यशासाठी शुभेच्छा. '
IPL 2020 | पंजाबकडून ख्रिस गेलला मिळू शकते संधी, 'हे' दोन खेळाडू होऊ शकतात बाहेर
ऋषभ पंत सध्या युएईमध्ये होत असलेल्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळत आहे. शनिवारी कोलकाता नाईट रायडर्स विरूद्ध झालेल्या सामन्यात पंतने 38 धावा केल्या होत्या. यात त्याचा संघ 18 धावांनी जिंकला. या विजयासह संघ पॉइंट टेबलच्या वरच्या स्थानी पोहोचला आहे. त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीबद्दल सांगायचं म्हणजे त्याने इंग्लंडविरुद्ध 2018 मध्ये नॉटिंघम येथे कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. पंतने आतापर्यंत 13 कसोटीत 38.76 च्या सरासरीने 814 धावा केल्या आहेत. कसोटीत त्याची सर्वोत्तम धावसंख्या नाबाद 159 आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सुरुवातीच्या काळात पंतने अनेक विक्रम नोंदवले आहेत. त्याने 11 कसोटी सामन्यात 51 झेल आणि दोन यष्टीचितसह धोनीला मागे टाकले होते. धोनीने 15 कसोटींमध्ये हा पराक्रम केला होता. तेव्हापासून असे म्हटले जात होते की ऋषभ पंत धोनीचा योग्य उत्तराधिकारी आहे. मर्यादित षटकांमध्ये स्पेशलिस्ट समजल्या जाणार्या पंतने एकदिवसीय सामन्यात सुमारे 27 च्या सरासरीने 374 धावा केल्या आहेत. तर टी-20 मध्ये त्याने 20.5 च्या सरासरीने 410 धावा केल्या आहेत.