IPL 2020 | पंजाबकडून ख्रिस गेलला मिळू शकते संधी, 'हे' दोन खेळाडू होऊ शकतात बाहेर
गेलच्या आयपीएलमध्ये आतापर्यंत 326 षटकार ठोकण्याचा विक्रम असून त्याने केवळ 125 सामन्यात 151 च्या स्ट्राइक रेट आणि 41 च्या सरासरीने 4484 धावा केल्या आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ख्रिस गेल आयपीएलमध्ये सर्वाधिक शतके ठोकणारा खेळाडू आहे.
दुबई : यंदाच्या आयपीएलमध्ये चांगली खेळी करूनही किंग्ज इलेव्हन पंजाब संघाला पराभवांचा सामना करावा लागला आहे. पहिल्या सुपर ओव्हरमध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून पराभूत झाल्यानंतर किंग्ज इलेव्हन पंजाब राजस्थान विरुद्ध 223 धावा करूनही जिंकू शकला नाही. मागच्या सामन्यात तर किंग्ज इलेव्हनचे फलंदाज मुंबई इंडियन्स विरूद्ध चांगल प्रदर्शनही करु शकले नाहीत. अशा परिस्थितीत ख्रिस गेलला आज सामन्यात संधी मिळेल का असा प्रश्न आहे.
ख्रिस गेल सारख्या मॅच विनर खेळाडूला बाहेर का बसवलंय हा सर्वात मोठा प्रश्न आहे. क्रिकेट एक्सपर्ट्सचं म्हणणं आहे की, ख्रिस गेलची फिल्डिंग खराब आहे आणि त्यामुळे कदाचित त्यांला संघात संधी दिली जात नाही. पण जर असं असेल तर मग गेलला संघात का समाविष्ट केले गेले आहे?
गेल टी- 20 मधील सर्वात मोठ्या मॅच विनरपैकी एक आहे. फलंदाजीमध्ये गेलने 30-40 चेंडूंचा सामना केल तरी सामन्याचा निकाल बदलण्याची शक्यता जास्त असते. गेलच्या आयपीएलमध्ये आतापर्यंत 326 षटकार ठोकण्याचा विक्रम असून त्याने केवळ 125 सामन्यात 151 च्या स्ट्राइक रेट आणि 41 च्या सरासरीने 4484 धावा केल्या आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ख्रिस गेल आयपीएलमध्ये सर्वाधिक शतके ठोकणारा खेळाडू आहे.
निशान-नायर संघा बाहेर असण्याची शक्यता
ख्रिस गेलला संघात स्थान मिळातं तर आज प्लेइंग इलेव्हनमधून कोणाला वगळणार हा प्रश्न आहे. जेम्स नीशम आतापर्यंत गोलंदाजीत हवी तशी कामगिरी करता आलेली नाही. दोन सामन्यात त्याने 4--4 षटकांत 40 आणि 52 धावा दिल्या आहे. तर एका सामन्यात त्याला केवळ 2 षटके टाकण्याची संधी मिळाली.
अशा परिस्थितीत ईशान पोरेलसारख्या वेगवान गोलंदाजांना संघात समाविष्ट करून नीशमला संघाबाहेर ठेवलं जाऊ शकतं. त्याचबरोबर, ख्रिस गेलला करुण नायरची जागा घेण्याची संधी मिळू शकेल. नीशम आणि नायर प्लेइंग इलेव्हनच्या बाहेरच राहिले तर ईशान पोरेल आणि ख्रिस गेल खेळू शकतील. अशा परिस्थितीत संघाला 4 परदेशी क्रिकेटपटू निवडण्यात कोणतीही अडचण येणार नाही.