एक्स्प्लोर

युवराज रणजी सोडून एनसीएत ट्रेनिंग का घेतोय?

युवराजने कोणतीही दुखापत झालेली नसताना एनसीएमध्ये हजेरी लावल्याने बीसीसीआयमधील काही अधिकाऱ्यांनी त्याच्यावर आक्षेप घेतला आहे.

नागपूर : भारताचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंहने रणजी सोडून राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (एनसीए) फिटनेस ट्रेनिंग घेण्याचा निर्णय घेतला आहे. जो बीसीसीआयमधील काही अधिकाऱ्यांना पसंत आलेला नाही. युवराजने आतापर्यंत पंजाबच्या रणजी संघाकडून पाचपैकी केवळ एकच सामना खेळला आहे. विदर्भाविरुद्धच्या एकाच सामन्यात तो खेळला आहे, ज्यामध्ये त्याने एका डावात 20 आणि दुसऱ्या डावात 42 धावा केल्या होत्या. युवराजने कोणतीही दुखापत झालेली नसताना एनसीएमध्ये हजेरी लावल्याने बीसीसीआयमधील काही अधिकाऱ्यांनी त्याच्यावर आक्षेप घेतला आहे. युवराज यो यो फिटनेस टेस्ट पास होण्यासाठी मेहनत घेत आहे, ज्यामध्ये यापूर्वी तो अपात्र ठरला होता. भारतीय संघात पुनरागमन करणं युवराजसाठी गरजेचं आहे. कारण आयपीएलच्या लिलाव प्रक्रियेत पुनरागमन करण्याची त्याला अपेक्षा असेल. कारण भारतीय संघातून बाहेर असलेला खेळाडू घेणं ही आयपीएल संघांसाठी प्राथमिकता नसते. ''युवराज दुखापतग्रस्त असल्याचा कोणताही रिपोर्ट नाही. मात्र तो यो यो टेस्ट पास होण्यासाठी विशेष फिटनेस ट्रेनिंग घेत आहे. मात्र रणजी सोडून एनसीएत राहणं चुकीचं आहे. यावर युवराजलाच निर्णय घ्यावा लागेल'', असं बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर ‘पीटीआय’शी बोलताना सांगितलं. ''जर युवराजने 16.1 (भारतीय संघ व्यवस्थापनाकडून निश्चित करण्यात आलेला मानक) मिळवला आणि त्याच्या खात्यात धावाच नसतील, तर त्याला श्रीलंकेविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी निवडलं जाणार आहे का?'' असा सवालही अधिकाऱ्याने केला. ''युवराजने पंजाब रणजी संघ व्यवस्थापनाला असं सांगितल्याचं ऐकलंय की, भारतीय संघाने त्याला फिटनेस टेस्ट करायला सांगितलं आहे. मात्र भारतीय संघाने नेहमीच रणजी खेळण्यावर भर दिला आहे. ईशांत शर्माला पाहा. तो देखील सध्या भारतीय संघात आहे, मात्र त्याला कोलकाता कसोटीच्या एक दिवस अगोदरच सोडण्यात आलं, जेणेकरुन तो महाराष्ट्रविरुद्धच्या रणजी सामन्यात खेळू शकेल'', असंही अधिकारी म्हणाले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Attacker Update : सैफ अली खानवर हल्ल्या केल्यानंतर आरोपीने खाल्ली भुर्जी, GPay Payment नंबरवर आरोपीचा शोधHasan Mushrif On Ladki Bahin : लाडक्या बहिणींचे पैसे परत घेणार का? मुश्रीफ काय म्हणाले?ABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 19 January 2024Saif Ali Khan Attacker Update : सैफवरील हल्लेखोर वरळीच्या सिल्कवर्क्स कॅफेमध्ये होता कामाला, इतर कर्मचाऱ्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Dada Bhuse : नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी
Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी
Embed widget