एक्स्प्लोर
2012 ऑलिम्पिक : योगेश्वर दत्तच्या पदरी रौप्य नाही कांस्यपदकच
![2012 ऑलिम्पिक : योगेश्वर दत्तच्या पदरी रौप्य नाही कांस्यपदकच Yogeshwar Dutts 2012 London Olympics Bronze Wont Be Upgraded To Silver 2012 ऑलिम्पिक : योगेश्वर दत्तच्या पदरी रौप्य नाही कांस्यपदकच](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/09/02191201/Yogeshwar-dutt-compressed-580x395.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : पैलवान योगेश्वर दत्तला लंडन ऑलिम्पिकमध्ये मिळालेलं कांस्यपदक रौप्यपदकात अपग्रेड होण्याच्या शक्यता मावळल्या आहेत. रशियाचा दिवंगत कुस्तीपटू बेसिक खुदाखोव प्रकरणी चौकशी थांबवण्याचा निर्णय आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने घेतला आहे. त्यामुळे योगेश्वरला कांस्यपदकावरच समाधान मानावं लागणार आहे.
2012 च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये योगेश्वर दत्तला पुरुषांच्या 60 किलो फ्री स्टाईल कुस्तीमध्ये कांस्यपदक मिळालं होतं, तर रशियाच्या बेसिक खुदोखोजला रौप्यपदक मिळालं. 2013 साली एका कार अपघातात खुदोखोजचा मृत्यू झाला.
आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (आयओसी) लंडन ऑलिम्पिकदरम्यान गोळा केलेल्या नमुन्यांची पुन्हा तपासणी केल्यानंतर त्यात खुदोखोज दोषी आढळला. त्यामुळे त्याचं रौप्यपदक योगेश्वर दत्तला मिळण्याची शक्यता निर्माण झाली होती. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने मात्र या प्रकरणी चौकशी थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बेसिकचं रौप्यपदक त्याच्या नावेच राहील.
म्हणून दिलदार योगेश्वर दत्तचा रौप्यपदक घेण्यास नकार
योगेश्वरने दिलदारपणा दाखवत ते पदक दिवंगत पैलवान बेसिक खुदोखोजच्या कुटुंबीयांनीच ठेवावं असं म्हटलं होतं. 'खुदोखोज हा आपला चांगला मित्र होता, त्यामुळे त्याचं रौप्यपदक घेणं मला विचित्र वाटत आहे. लंडन ऑलिम्पिकपूर्वी दोन महिने मी रशियात प्रशिक्षण घेत होतो. त्यामुळे बेसिकशी माझी खूप छान ओळख झाली होती.' असं योगेश्वर दत्तने ट्विटरवर म्हटलं होतं. योगेश्वरने ट्वीट करत खुदोखोजच्या कुटुंबीयांनी त्यांच्या दिवंगत मुलाचं पदक स्वतःजवळ ठेवावं, असं म्हणत मनाचा मोठेपणा दाखवला.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)