WTC Final : पत्नीच्या प्रश्नांवर जसप्रीत बुमराहची विकेट; उत्तरं देत म्हणाला...
मुलाखतीसाठी प्रवेश करताच संजनाला पाहिल्यावर जसप्रीतचा खुललेला चेहरा सर्वांच्याच चेहऱ्यावर स्मित आणत आहे.

WTC Final : क्रीडा जगतात मागील काही दिवसांपासून चर्चेत असणारी सेलिब्रिटी जोडी म्हणजे, खेळाडू जसप्रीत बुमराह आणि त्याची पत्नी, प्रेझेंटर संजना गणेशनची. हल्लीच, जागतिक कसोटीतील अंतिम सामन्याच्या पूर्वी, बुमराहची त्याच्याच पत्नीने विकेट काढली. निमित्त होतं ते म्हणजे एका रंजक मुलाखतीचं.
मुलाखतीच्या निमित्तानं लग्नानंतर कामाच्या निमित्तानं जसप्रीत आणि त्याची पत्नी संजना पहिल्यांदाच चाहत्यांसमोर एकत्र दिसले. आयसीसीनं हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत ही अनोखी केमिस्ट्री सर्वांच्याच भेटीला आणली. जिथं या सेलिब्रिटी जोडीची केमिस्ट्री सर्वांची मनं जिंकल आहे.
WTC Final : सामन्याच्या पहिल्याच दिवशी वरुणराजाची खेळी पाहून ट्विटरवर धम्माल मीम्सचा पाऊस
मुलाखतीसाठी प्रवेश करताच संजनाला पाहिल्यावर जसप्रीतचा खुललेला चेहरा सर्वांच्याच चेहऱ्यावर स्मित आणत आहे. तर, त्याला प्रश्न विचारत असताना संजनालाही आनंद आवरेनासाच झालेला दिसत आहे.
Playing with his sister, starring in school cricket and ‘the best day’ of his life.@SanjanaGanesan takes @Jaspritbumrah93 through some Insta Memories before the #WTC21 Final 🎥 pic.twitter.com/k8FKUxgQJI
— ICC (@ICC) June 17, 2021
हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट होताच त्याला असंख्य व्ह्यूज आणि रिट्वीट मिळाले. या खास मुलाखतीच्या निमित्ताने संजनाने जसप्रीतला त्याच्या इन्स्टाग्राम प्रोफाईलवरील काही फोटो दाखवत त्या फोटोंच्या वेळचे किस्से आणि आठवणी शेअर करण्यास सांगितलं. हे फोटो पाहत असताना जसजसे फोटो पुढे जात होते, तसतसा जसप्रीतही संजनाच्या प्रश्नांची उत्तरं देत होता. एका क्षणी तर, संजना हे फोटो तूच निव़डले आहेस ना असा प्रश्नही त्यानं तिला केला. एकमेकांच्या साथीनं मारलेल्या या मुलाखतवजा गप्पा सध्या सर्वांची मनं जिंकत आहेत.






















