एक्स्प्लोर

IND vs NZ Final : भारत की न्यूझीलंड?, फायनल सामना रद्द झाला तर कुणाला मिळणार टी-20 विश्वचषकाची ट्रॉफी?; A टू Z माहिती

India vs New Zealand Final T20 World Cup 2026 : टी-20 विश्वचषक 2026 च्या दुसऱ्या उपांत्य फेरीत भारताने इंग्लंडवर 7 धावांनी विजय मिळवत अंतिम फेरीत धडक मारली.

India vs New Zealand Final T20 World Cup 2026 : टी-20 विश्वचषक 2026 च्या दुसऱ्या उपांत्य फेरीत भारताने इंग्लंडवर 7 धावांनी विजय मिळवत अंतिम फेरीत धडक मारली. आता या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताचा सामना न्यूझीलंडशी होणार असून हा सामना रविवारी, 8 मार्च रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. मात्र जर अंतिम सामन्यात पावसाचा अडथळा निर्माण झाला तर काय होईल, कोण विजेता ठरेल आणि रिझर्व्ह डे आहे का? याबाबतचे नियम जाणून घेऊया....

फायनलसाठी रिझर्व्ह डेची तरतूद

आयसीसीने टी-20 विश्वचषक 2026 च्या अंतिम सामन्यासाठी रिझर्व्ह डे ठेवला आहे. नियोजित वेळेनुसार 8 मार्च रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना खेळवला जाईल. मात्र पावसामुळे त्या दिवशी सामना पूर्ण होऊ शकला नाही, तर 9 मार्च (सोमवार) हा दिवस रिझर्व्ह डे म्हणून राखीव ठेवण्यात आला आहे.

जर 8 मार्चला काही षटके खेळल्यानंतर पावसामुळे सामना थांबवावा लागला, तर 9 मार्चला तो सामना जिथे थांबला होता तिथूनच पुन्हा सुरू केला जाईल. पण 8 मार्चला एकही चेंडू टाकता आला नाही, तर 9 मार्चला सामना नव्याने सुरू केला जाईल.

किमान 10-10 षटकांचा सामना आवश्यक 

अंतिम सामन्याचा निकाल लागण्यासाठी दोन्ही संघांनी किमान 10-10 षटके खेळणे आवश्यक आहे. सामान्य टी-20 सामन्यांमध्ये 5-5 षटकांतही निकाल लागू शकतो, मात्र आयसीसीच्या विश्वचषक नियमांनुसार फायनलमध्ये दोन्ही संघांना किमान 10 षटके खेळणे बंधनकारक आहे.

सामना झाला नाही तर दोन्ही संघ संयुक्त विजेते...

फायनल सामन्यासाठी आयसीसीने कट-ऑफ टाइममध्ये 90 मिनिटांची अतिरिक्त मुदत ठेवली आहे. तर रिझर्व्ह डेच्या दिवशी हा अतिरिक्त वेळ 120 मिनिटांचा असेल. मात्र रिझर्व्ह डेच्या दिवशीही पावसामुळे सामना पूर्ण होऊ शकला नाही आणि निकाल लागू शकला नाही, तर भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांना संयुक्त विजेते घोषित केले जाईल.

अहमदाबादमध्ये काय आहे हवामान अंदाज? (Ahmedabad Weather Forecast Update)

दरम्यान, हवामान अंदाजानुसार रविवारी अहमदाबादमध्ये पावसाची शक्यता अत्यंत कमी आहे. त्यामुळे भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील अंतिम सामना पूर्णपणे पार पडण्याची शक्यता अधिक आहे.

हे ही वाचा -

Navjot Singh Sidhu on Mohammad Amir Dhongi baba : 'थोथा चना बाजे घना'... ढोंगी बाबा...; मोहम्मद आमिरला नवज्योत सिंग यांनी सुनावलं; नको नको ते बोलले, जुने व्हिडीओ काढले

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

CSK vs DC IPL 2026 : चेन्नईचं COMEBACK... सलग 3 पराभवांच्या जखमेनंतर ऋतुराजच्या सेनेचा पहिला हुंकार, दिल्लीला दिला नारळ, Points Table मध्ये मोठी उडी
चेन्नईचं COMEBACK... सलग 3 पराभवांच्या जखमेनंतर ऋतुराजच्या सेनेचा पहिला हुंकार, दिल्लीला दिला नारळ, Points Table मध्ये मोठी उडी
CSK vs DC Score : पहिला विजय अखेर मिळाला! सॅमसन-ओव्हर्टनच्या जादूने चेन्नईचा ‘क्लायमॅक्स’ जिंकला, दिल्लीचा खेळ खल्लास
CSK vs DC IPL 2026 : पहिला विजय अखेर मिळाला! सॅमसन-ओव्हर्टनच्या जादूने चेन्नईचा ‘क्लायमॅक्स’ जिंकला, दिल्लीचा खेळ खल्लास
CSK vs DC IPL 2026 : सरफराज खानचा चित्तथरारक झेल, अक्षर पटेलसोबत सगळेच अवाक्, सेलिब्रेशनने चेपॉकला वेड लावलं, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
सरफराज खानचा चित्तथरारक झेल, अक्षर पटेलसोबत सगळेच अवाक्, सेलिब्रेशनने चेपॉकला वेड लावलं, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
Sanju Samson Century : अपमानाचा बदला शतकाने! सलग 3 फ्लॉप शोनंतर संजूचा 'विराट' अवतार; यलो जर्सीत ठोकलं पहिलं तुफानी शतक, मोडले सगळे विक्रम
अपमानाचा बदला शतकाने! सलग 3 फ्लॉप शोनंतर संजूचा 'विराट' अवतार; यलो जर्सीत ठोकलं पहिलं तुफानी शतक, मोडले सगळे विक्रम
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Special Report Sunetra Pawar : सुनेत्रा पवारांना धोका? एसयायीकडे तक्रार, रुपाली चाकणकरांवर वार
Special Report Sharad Pawar : महिलांचं सक्षमीकरण हेच माझं स्वप्न, शरद पवारांच्या लेखावरुन वाद
Earthquake in Marathwada : हिंगोली, परभणी, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यात भूकंपाचे धक्के, घरांना तडे
Police Bharti Special Report : फाटक्या चपलातली दांडगी जिद्द, पोलिस भरतीवेळी थक्क करणारी घटना
Ashok Kharat Special Report : खरातविरोधात 160 जीबीचे पुरावे, त्या 19 फोल्डर्समध्ये काय दडलंय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Asha Bhosle Health Update: आशा भोसले यांची प्रकृती खालावली, नातीनं पोस्ट करत दिली हेल्थ अपडेट; सांगितलं खरं कारण, म्हणाली, 'माझी आजी...'.
आशा भोसले यांची प्रकृती खालावली, नातीनं पोस्ट करत दिली हेल्थ अपडेट; सांगितलं खरं कारण, म्हणाली, 'माझी आजी...'
Mumbai Local : मुंबईत पहिल्यांदाच ऑटोमॅटिक दरवाजांची नॉन-AC लोकल; प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी मोठं पाऊल
मुंबईत पहिल्यांदाच ऑटोमॅटिक दरवाजांची नॉन-AC लोकल; प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी मोठं पाऊल
Nashik : लैंगिक अत्याचार, धर्मांतर प्रकरणानंतर नाशिकमधील कंपनीला टाळं, कर्मचाऱ्यांना मुंबई-पुण्यात शिफ्ट करणार
लैंगिक अत्याचार, धर्मांतर प्रकरणानंतर नाशिकमधील कंपनीला टाळं, कर्मचाऱ्यांना मुंबई-पुण्यात शिफ्ट करणार
हे तर इस्त्रायल फर्स्ट धोरण! ट्रम्प यांच्या MAGA चळवळीत मोठी फूट; खंद्या शिलेदारांकडून बाह्य शक्तींचे 'गुलाम' झाल्याचा बोचरा वार, इराणची जिवितहानी करणारे आदेश सैनिकांनी पाळू नयेत, असाही दिला सल्ला
हे तर इस्त्रायल फर्स्ट धोरण! ट्रम्प यांच्या MAGA चळवळीत मोठी फूट; खंद्या शिलेदारांकडून बाह्य शक्तींचे 'गुलाम' झाल्याचा बोचरा वार, इराणची जिवितहानी करणारे आदेश सैनिकांनी पाळू नयेत, असाही दिला सल्ला
US Iran Islamabad Talks:चर्चेच्या पहिल्या फेरीत इराण वरचढ ठरला, पण अमेरिकेची पहिली मागणी काय? पाकिस्तानने सुद्धा 'रामबाण' उपाय शोधत ताकद लावली!
चर्चेच्या पहिल्या फेरीत इराण वरचढ ठरला, पण अमेरिकेची पहिली मागणी काय? पाकिस्तानने सुद्धा 'रामबाण' उपाय शोधत ताकद लावली!
Gold Jewellery : 24, 22 की 18 कॅरेट, दैनंदिन वापरासाठी किती कॅरेटचे सोने सर्वात टिकाऊ? खरेदीपूर्वी 'हे' नक्की वाचा!
24, 22 की 18 कॅरेट, दैनंदिन वापरासाठी किती कॅरेटचे सोने सर्वात टिकाऊ? खरेदीपूर्वी 'हे' नक्की वाचा!
America Iran Islamabad Talks: पाकिस्तानातील अमेरिकेसोबतच्या चर्चेत सुरुवातीलाच इराणनं सर्वात मोठी बाजी मारली! इस्त्रायलला सुद्धा तगडा झटका; तब्बल 48 वर्षाच्या लाॅकडाऊनमधून सुटकेची चिन्हे
पाकिस्तानातील अमेरिकेसोबतच्या चर्चेत सुरुवातीलाच इराणनं सर्वात मोठी बाजी मारली! इस्त्रायलला सुद्धा तगडा झटका; तब्बल 48 वर्षाच्या लाॅकडाऊनमधून सुटकेची चिन्हे
Virat Kohli on Vaibhav Sooryavanshi: चिमुरड्या वैभवने चौफेर कुटाई करूनही आरसीबीच्या किंग कोहलीकडून 'स्पेशल' यादगार गिफ्ट!
चिमुरड्या वैभवने चौफेर कुटाई करूनही आरसीबीच्या किंग कोहलीकडून 'स्पेशल' यादगार गिफ्ट!
Embed widget