एक्स्प्लोर
पैलवान राहुल आवारेचा ऑलिम्पिकच्या शर्यतीतून पत्ता कट
मुंबई : महाराष्ट्राचा गुणी पैलवान राहुल आवारेचा रिओ ऑलिम्पिकच्या शर्यतीतून कायमचा पत्ता कट झाला आहे. भारतीय कुस्ती महासंघानं राहुलवर बेशिस्त वर्तनासाठी तात्पुरत्या बंदीची कारवाई केली आहे. या कारवाईमुळे राहुलची तुर्कस्तानच्या इस्तंबूलमधल्या दुसऱ्या ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत खेळण्याची संधी हुकली आहे.
याआधी भारतीय कुस्ती महासंघाने मंगोलियातल्या पहिल्या ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत खेळण्याची संधी नाकारुन भारतीय कुस्ती महासंघाने त्याच्यावर पहिला अन्याय केला होता. भारतीय कुस्ती संघाच्या शिबिरासाठी जॉर्जियाला निघालेल्या राहुल आवारेच्या लक्षात आलं की, त्याला मंगोलिया आणि तुर्कस्तानचा व्हिसा देण्यात आलेला नाही. त्याचा अर्थ आपल्याला दोन्ही देशांमधल्या ऑलिम्पिक पात्रता कुस्तीत खेळता येणार नाही, हे लक्षात येताच राहुल दिल्ली विमानतळावरुनच माघारी परतला होता.
त्या घटनेचं निमित्त करुन भारतीय कुस्ती महासंघाने राहुलवर बेशिस्त वर्तनाची कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे राहुल आवारेचं रिओ ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंग पावलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement