(Source: ECI/ABP News/ABP Majha)
T20 World Cup : भारतात 4 वर्षांसाठी आयसीसी स्पर्धां डिज्नी स्टारवर, 2024 ते 2028 पर्यंतसाठी करारबद्ध
ICC T20 World Cup : आयसीसी पुरुष आणि महिला क्रिकेटच्या भव्य स्पर्धांची लाईव्ह स्ट्रीमिंग (Live Streaming) डिज्नी स्टारवर होणार आहे. त्यांनी नुकताच आयसीसीसोबत (ICC) या बाबतचा करार केला आहे.
ICC Tournamnet Live Streaming : आगामी वर्षांत होणाऱ्या आयसीसीच्या पुरुष आणि महिला टूर्नांमेंट तुम्हाला डिज्नी स्टारवर (Disney Star) पाहायला मिळणार आहेत. आयसीसी पुरुष आणि महिला टूर्नांमेंटच्या सामन्यांठी लाईव्ह स्ट्रीमिंग (Live Streaming) डिज्नी स्टारवर होणार असून त्यांनी नुकताच आयसीसीसोबत (ICC) करार केला आहे. आयसीसी आणि डिज्नी स्टारमध्ये हे कॉन्ट्रेक्ट 2024 सालपासून सुरु होणार आहे. त्यानंतर पुढील 4 वर्षें म्हणजे 2028 पर्यंत हा करार असणार आहे.
आयसीसीच्या भव्य स्पर्धा आगामी वर्षात खेळवल्या जाणार आहेत. यावेळी यंदाच्या टी20 विश्वचषकानंतर 2023 मध्ये एकदिवसीय विश्वचषक भारतात आयोजित केला जाईल. त्यामुळे T20 विश्वचषक 2022 आणि एकदिवसीय विश्वचषक 2023 चे लाईव्ह स्ट्रीमिंग क्रिकेट चाहते डिज्ने स्टारवर पाहू शकतील.
Disney Star will be the home of ICC cricket in India through to 2027.
— ICC (@ICC) August 27, 2022
More here ⬇️
आयसीसीचे अधिकारी ग्रेग बार्कले यांनी या करारानंतर दिलेल्या प्रतिक्रियेत ते म्हणाले, “आम्हाला पुढील चार वर्षासाठी झालेल्या या भागीदारीचा आनंद आहे. आम्ही प्रेक्षकांसाठी चांगला अनुभव देण्यासाठी प्रयत्नशील राहू, तसंच अधिक चाहते जोडण्यासाठी आम्ही आणखी प्रयत्न करु असंही ते म्हणाले.
ICC टी20 विश्वचषकासाठी सज्ज
ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आगामी आयसीसी टी-20 विश्वचषक 2022 मध्ये 16 ऑक्टोबरपासून 13 नोव्हेंबर पर्यंत एकूण 46 सामने खेळले जाणार आहेत. हे सर्व सामने ऑस्ट्रेलियाच्या सात शहरांमध्ये म्हणजेच अॅडलेड, ब्रिस्बेन, जिलॉन्ग, होबार्ट, मेलबर्न, पर्थ आणि सिडनी येथे खेळले जाणार आहे. उपांत्य फेरीचे सामने 9 आणि 10 नोव्हेंबर रोजी सिडनी क्रिकेट मैदान आणि अॅडलेड येथे खेळवले जातील. तर, अंतिम सामना 13 नोव्हेंबरला मेलबर्नमध्ये खेळला जाईल.
यंदाच्या विश्वचषकात कसे असतील ग्रुप?
ग्रुप-1: इंग्लंड, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, अफगानिस्तान आणि अन्य दोन क्वालिफायर
ग्रुप-2: भारत, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, बांग्लादेश आणि अन्य दोन क्वालिफायर
हे देखील वाचा-