एक्स्प्लोर

Asia Cup 2022 : आशिया कपमध्ये पाकिस्तानवर कायमच भारत वरचढ, 1984 ते 2018 पर्यंतच्या सामन्याचे निकाल एका क्लिकवर

Asia Cup 2022 : 27 ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या आशिया कप स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान आपआपल्या स्पर्धेची सुरुवात 28 ऑगस्टला एकमेंकाविरुद्ध करणार आहेत.

Asia Cup IND vs PAK, History : क्रिकेट जगतातील कट्टर प्रतिस्पर्धी म्हटलं तर भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan). दोन्ही संघाचा सामना म्हणजे संपूर्ण जगातील क्रिकेट रसिकांसाठी ब्लॉगबस्टर शो असतो. दोन्ही देशातील संबंध खास नसल्याने दोघेही एकमेकांचा दौरा करत नाहीत. अशात मोठ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्येच आमने-सामने येणारे हे दोघे आता रविवारी आशिया कपच्या (Asia Cup 2022) एकमेंकाच्या पहिल्याच सामन्यात मैदानात उतरतील. अशात या भव्य-दिव्य सामन्यापूर्वी दोन्ही संघाचा आशिया कपमधील एकमेंकाविरुद्धचा इतिहास कसा आहे? कोणाचं पारडं जड आहे? कोण कोणावर भारी पडलंय? हे जाणून घेऊ...

28 ऑगस्ट अर्थात रविवारी दुबईच्या आंतरराष्ट्रीय मैदानात भारत-पाकिस्तान सामना रंगणार आहे. दोघांनी आतापर्यंत आशिया कपमध्ये खेळलेले मोस्ट ऑफ सामने कमालीचे अटीतटीचे झाले आहेत, त्यामुळे यंदाही एक चुरशीची लढत पाहायला मिळू शकते. त्यापूर्वी 1984 पासून 2018 पर्यंत एकूण 14 वेळा आमने-सामने आलेले पाकिस्तान भारत यांच्यातील निकाल पाहूया. यामध्ये 14 सामन्यांत 8 वेळा भारत जिंकला असून 5 वेळा पाकिस्तान जिंकला आहे. 1997 सालचा एक सामना पावसामुळे अनिर्णीत देखील राहिला होता. त्यामुळे आतापर्यंतच्या सामन्यात भारताचंच पारडं जड राहिल्याचं दिसून येतंय तर नेमके निकाल एकदा पाहूया.. 

  • 1984 साली म्हणजेत भारताने 1983 विश्वचषक जिंकल्यावर एक वर्षाने भारत-पाकिस्तान आमने-सामने आले. हा सामना 54 धावांच्या तगड्या फरकाने भारताने जिंकला होता.
  • त्यानंतर 1988 साली पुन्हा एकदा भारताने चार गडी राखून पाकिस्तानला मात दिली होती.
  • 1995 साली मात्र प्रथमच पाकिस्तानने भारताला मात देत 97 धावांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवला.
  • 1997 मध्ये पावसामुळे सामना अनिर्णीत राहिला.
  • मग 2000 साली पुन्हा पाकिस्तानने 44 धावांच्या फरकाने विजय मिळवला.
  • 2004 पुन्हा पाकिस्ता न 59 धावांच्या फरकाने जिंकला अशारितीने 1997 चा अनिर्णीत सामना वगळला तर सलग तीन वेळा पाकिस्तानचा संघ जिंकला.
  • 2008 मध्ये ग्रुप स्टेजमध्ये भारत सहा विकेट्सनी जिंकला. 
  • मग 2010, 2012 अशा दोन्ही वर्षी अनुक्रमे 3 आणि 6 विकेट्सच्या फरकाने भारतच जिंकला. 
  • मग 2014 साली मात्र शाहीन आफ्रिदीच्या तुफान खेळीच्या जोरावर पाकिस्तान अवघ्या एका विकेटने जिंकला.
  • 2016 साली 5 विकेटने भारत जिंकला.
  • 2018 मध्ये दोन वेळा भारत-पाकिस्तान आमने-सामने आले यावेळी एकदा 8 तर एकदा 9 विकेट्सने भारताने विजय मिळवला. 

अशारितीने अधिक विजय मिळवलेला भारत आपली विजयी घोडदौड कायम ठेवेल कि पाकिस्तान काहीतरी धमाकेदार खेळी करुन विजय मिळवेल, हे 28 ऑगस्ट रोजीच कळेल...

हे देखील वाचा-

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Cyber Crime : हॅकर्स शोधतायत गंडा घालण्याचे नवे मार्ग, काही सेकंदात तुमचं अकाऊंट होईल रिकामं
हॅकर्स शोधतायत गंडा घालण्याचे नवे मार्ग, काही सेकंदात तुमचं अकाऊंट होईल रिकामं
भारतातील टॉप 10 शहरे; राहणीमानासाठी मुंबई तिसऱ्या स्थानावर, पुण्याचा कितवा नंबर?
भारतातील टॉप 10 शहरे; राहणीमानासाठी मुंबई तिसऱ्या स्थानावर, पुण्याचा कितवा नंबर?
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Amey Khopkar MNS: Damodar Natyagruha आहे त्या जागेवर पुन्हा बांधा, अन्यथा रस्त्यावर उतरूAkole SDRF Boat Accident : प्रवरा नदीत बुडालेल्या व्यक्तीचा शोध घेणारी एसडीआरएफची बोट उलटलीUjani Boat Accident : दोन गावांवर दु:खाचा डोंगर..उजनी दुर्घटनेनं महाराष्ट्र हळहळा.. ABP MAJHAZero Hour Dombivli Blast : डोंबिवली MIDC मध्ये भीषण स्फोट, अपघाताला कोण जबाबदार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Cyber Crime : हॅकर्स शोधतायत गंडा घालण्याचे नवे मार्ग, काही सेकंदात तुमचं अकाऊंट होईल रिकामं
हॅकर्स शोधतायत गंडा घालण्याचे नवे मार्ग, काही सेकंदात तुमचं अकाऊंट होईल रिकामं
भारतातील टॉप 10 शहरे; राहणीमानासाठी मुंबई तिसऱ्या स्थानावर, पुण्याचा कितवा नंबर?
भारतातील टॉप 10 शहरे; राहणीमानासाठी मुंबई तिसऱ्या स्थानावर, पुण्याचा कितवा नंबर?
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
''बिल्डरच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करणारा आमदार कोणत्या पवारांचा?''; नानांचा सवाल, थेट पत्रच
''बिल्डरच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करणारा आमदार कोणत्या पवारांचा?''; नानांचा सवाल, थेट पत्रच
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
Embed widget