(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Devendra Fadnavis CM? | संघाची फडणवीसांना पसंती असू शकते का? Special Report
Devendra Fadnavis CM? | संघाची फडणवीसांना पसंती असू शकते का? Special Report
देवेंद्र फडणवीस यांना कुशल अनुभव, महायुती सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री व्हावेत तब्बल 5 टर्म आमदार म्हणून निवडून आलेले सोलापूर उत्तरचे भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांनी व्यक्त केली इच्छा सलग पाचव्यादा आमदाकी मिळवणाऱ्या विजयकुमार देशमुख यांच्या गंगा निवास या घरी सकाळपासून कार्यकर्त्यांची गर्दी पाचव्यांदा आमदार म्हणून निवडून दिल्याबद्दल विजयकुमार देशमुख यांनी मतदारांचे मानले आभार दरम्यान, मंत्री पदासाठी अद्याप पक्षश्रेष्ठींकडून कुठलाही निरोप नआल्याने आयुष्यभर भाजप कार्यकर्ता म्हणून काम करण्याची इच्छा केली व्यक्त
हे ही वाचा..
राज्यातील लोकांनी जो निर्णय दिला आहे तो आम्हाला मान्य आहे. त्याचा अभ्यास करणार आणि पुन्हा लोकांपुढे जाणार असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं. यूपीतून आलेल्या आदित्यनाथ यांच्या 'बटेंगे तो कटेंगे' या प्रचाराचा मतदारांवर परिणाम झाल्याचं पवारांनी मान्य केलं. तसेच लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीला मतं मिळाली असंही ते म्हणाले. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर पहिल्यांदाच त्यांनी कराडमध्ये माध्यमांना प्रतिक्रिया दिली.
महिलांचे मतदान दोन टक्क्यांनी वाढलं
लाडकी बहीण योजनेचा निकालावर परिणाम झाल्याचं दिसतंय असं शरद पवार म्हणाले. ते म्हणाले की, "महायुतीच्या विजयामध्ये लाडकी बहीण योजना हे एक कारण आहे. सत्तेत नसलो तर ही योजना बंद होईल अशी भीती महिलांना घालण्यात आल्याची अनेकांनी सांगितलं. त्यामुळे महिलांच्या मतदानामध्ये दोन टक्क्यांची वाढ झाल्याचं समोर आलं."