एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

चौथ्या कसोटीत पृथ्वी शॉला संधी मिळणार का?

मालिकेत 0-2 ने पिछाडीवर पडल्यानंतर टीम इंडियाने दमदार पुनरागमन केलं. यानंतर भारतीय संघाचं लक्ष आता ऐतिहासिक विजयाकडे लागलं आहे.

मुंबई : भारताने नॉटिंगहॅम कसोटीत इंग्लंडवर मात केल्यानंतर आता लक्ष लागलं आहे ते साउदम्प्टन कसोटीकडे. मालिकेत 0-2 ने पिछाडीवर पडल्यानंतर टीम इंडियाने दमदार पुनरागमन केलं. यानंतर भारतीय संघाचं लक्ष आता ऐतिहासिक विजयाकडे लागलं आहे. साउदम्प्टनच्या चौथ्या कसोटीसाठी विराटच्या भारतीय संघात मुंबईच्या एका युवा फलंदाजाचा समावेश करण्यात आला आहे. त्याचं नाव आहे पृथ्वी शॉ. पृथ्वीने गेल्या दीड वर्षात 14 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 56.72 च्या सरासरीने 1418 धावांचा रतीब घातला आहे. त्यात सात शतकं आणि पाच अर्धशतकांचा समावेश आहे. अ दर्जाच्या क्रिकेटमध्येही त्याच्या नावावर 19 सामन्यांत 651 धावा जमा आहेत. पृथ्वीच्या नेतृत्वाखाली भारताने अंडर-19 विश्वचषकावरही यंदा आपलं नाव कोरलं. आयपीएलच्या यंदाच्या मोसमात पृथ्वी थोरामोठ्यांच्या खांद्याला खांदा भिडवून खेळला. पृथ्वी शॉच्या बॅटमधून वाहणारा धावांचा रतीब पाहता तो लवकरच भारतीय संघातून खेळेल अशी अपेक्षा होती. सुनील गावसकरांनीही टीम इंडियाच्या पहिल्या दोन कसोटीतल्या पराभवानंतर पृथ्वी शॉची आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवड करण्याबाबत विधान केलं होतं. बीसीसीआयच्या निवड समितीने त्याआधीच मुरली विजयऐवजी पृथ्वी शॉचा भारताच्या कसोटी संघात समावेश केला. आता प्रश्न हा आहे की, पृथ्वी शॉ साउदप्म्पटन कसोटीत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणार का? टीम इंडियाने नॉटिंगहॅम कसोटीत 203 धावांनी दणदणीत विजय मिळवला. आजवरचा इतिहास लक्षात घेता विनिंग कॉम्बिनेशन सहसा बदललं जात नाही. पृथ्वी शॉला चौथ्या कसोटीसाठी भारतीय संघात घ्यायचंच झालं तर तो कोणाच्या जागी खेळणार? असा प्रश्न आहे. नॉटिंगहॅम कसोटीत शिखर धवन आणि लोकेश राहुल यांनी मोठी खेळी केलेली नसली तरी त्यांनी दोन्ही डावात भारताला चांगली सलामी दिली. त्यामुळे सलामीचा फलंदाज असलेल्या पृथ्वी शॉला साउदम्प्टन कसोटीत संधी मिळणार का याबाबत शंकाच आहे. चेतेश्वर पुजारा, विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे या मधल्या फळीतल्या फलंदाजांनीही तिसऱ्या कसोटीत धावांचा रतीब घातला होता. त्यामुळे चौथ्या कसोटीसाठी विनिंग कॉम्बिनेशनमध्ये बदल होण्याची शक्यता नाही. या परिस्थितीत पृथ्वीला साउदम्प्टन कसोटीत ड्रेसिंगरुमचाच अनुभव मिळण्याची अधिक चिन्हं आहेत. पृथ्वीचं जेमतेम 18-19 वर्षांचं वय लक्षात घेता त्याच्या दृष्टीने टीम इंडियाची ड्रेसिंगरुम शेअर करण्याची संधी मिळणं मोलाचं ठरु शकतं. संबंधित बातम्या : चौथ्या कसोटीपूर्वी पृथ्वी शॉचा कसून सराव मुरली विजयला डच्चू, पृथ्वी शॉ भारतीय संघात!
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde Meeting Ajit Pawar : देवेंद्र फडणीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार, अमित शाहांच्या बैठकीत काय ठरलं?Zero Hour : राज्यावर 7.11 लाख कोटींचं कर्ज, सरकार आव्हानं कसं पेलणार?Zero Hour : आई राज्यसभेत, भाऊ-बहीण लोकसभेत, संपूर्ण गांधी कुटुंब संसदेतZero Hour : आरक्षण, बेरोजगारी,कर्ज, नव्या सरकारसमोर आव्हानांचा डोंगर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Nayanthara Controversy : नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
Embed widget