एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
विराटच्या 30 वन डे शतकांबाबत स्मिथ म्हणतो...
स्मिथला चेन्नई वन डेनंतर विराटने पूर्ण केलेल्या 30 शतकांच्या विक्रमाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. विराट एक चांगला खेळाडू असल्याचं सांगत स्मिथने त्याच्या खेळाचं कौतुक केलं.
चेन्नई : विराट कोहलीच्या टीम इंडियाने पहिल्या वन डेत ऑस्ट्रेलियाचा 26 धावांनी धुव्वा उडवून पाच सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. या सामन्यानंतर बोलताना ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने भारतीय कर्णधार विराट कोहलीचं कौतुक केलं.
विराट कोहली, स्टीव्ह स्मिथ आणि इंग्लंडचा कर्णधार ज्यो रुट सध्याच्या सर्वोत्कृष्ट खेळाडूंपैकी एक समजले जातात. स्मिथला चेन्नई वन डेनंतर विराटने पूर्ण केलेल्या 30 शतकांच्या विक्रमाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. विराट एक चांगला खेळाडू असल्याचं सांगत स्मिथने त्याच्या खेळाचं कौतुक केलं.
भारतीय संघ आमच्यापेक्षा जास्त वन डे खेळतो. विराटने आतापर्यंत किती वन डे सामने खेळले आहेत, हे नेमकं सांगता येणार नाही. मात्र तो एक चांगला खेळाडू आहे, असं स्मिथ म्हणाला.
कसोटीमध्ये स्मिथच्या नावावर 20 शतकं आहेत, तर विराटच्या खात्यात 17 शतकं जमा आहेत. त्यामुळे कसोटीत स्मिथ विराटपेक्षा पुढे आहे. मात्र वन डेच्या बाबतीत विराटने स्मिथला कधीच मागे सोडलं आहे. विराटने वन डेत 30 शतकं पूर्ण केले आहेत, तर स्मिथच्या खात्यात केवळ 8 शतकं आहेत. विराटने आतापर्यंत 195, तर स्मिथने 99 वन डे सामने खेळले आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
ठाणे
महाराष्ट्र
Advertisement