Virat and Naveen : 'विराट'शी पंगा घेणारा खेळाडू 'आयीपीएल'ला मुकणार? अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाचा दणका
क्रिकेट बोर्डाकडून नवीन उल हक, मजीब उल रहेमान आणि फजहल फारूकी या तीन गोलंदाजांना नो ऑब्जेक्शन सर्टफिकेट (NOC) मिळणार नसल्याचे बोलले जात आहे. नवीन उल हक आणि इतर दोन गोलंदाज आयपीएल खेळू शकणार नाहीत.

IPL 2024 : भारतीय संघाचा फलंदाज विराट कोहलीशी (Virat Kohli) पंगा घेणारा अफगाणिस्तानचा खेळाडू नवीन उल हक 'आयपीएल'ला (IPL 2024) मुकण्याची शक्यता आहे. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाकडून नवीन उल हक, मजीब उल रहेमान आणि फजहल फारूकी या तीन गोलंदाजांना नो ऑब्जेक्शन सर्टफिकेट (NOC) मिळणार नसल्याचे बोलले जात आहे. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाच्या या भूमिकेमुळे नवीन उल हक आणि इतर दोन गोलंदाज आयपीएल खेळू शकणार नाहीत.
करार मुक्त करण्यास अफगाणिस्तान क्रिकेटचा नकार
अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने (ABC) या तिन्ही खेळाडूंचा वार्षिक करार वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. क्रिकेट बोर्डाच्या समितीने या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करुन हा निर्णय घेतला आहे. नवीन उल हक, मजीब उल रहेमान आणि फजहल फारूकी या तीन गोलंदाजांनी 1 जानेवारीपासून करारमुक्त करण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, क्रिकेट बोर्डाने त्यांची मागणी मान्य केलेली नाही.
स्वत:चे हित जोपासण्यासाठी करारमुक्त करण्याची इच्छा
अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने (afghanistan cricket) त्यांच्या वेबसाईटवर याबाबत म्हटले की, हे तिन्ही खेळाडू व्यक्तिगत हित जोपासण्यासाठी करारमुक्त करण्याची इच्छा व्यक्त करत आहेत. नवीन उल हक, मजीब उल रहेमान आणि फजहल फारूकी हे राष्ट्रीय जबाबदारी सोडून व्यक्तिगत फायद्याला महत्व देत आहेत. त्यामुळे क्रिकेट बोर्डाने या तिन्ही खेळांडूविरोधात कठोर पाऊले उचलण्याचा निर्णय घेतला आहे.
अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने म्हटले की, तिन्ही गोलंदाजांनी अफगाणिस्तानकडून मालिका खेळण्यासाठी सहमती दर्शवावी, हे आदेश दिले आहेत. याच महिन्यात आयपीएल 2024 साठी लिलाव पार पडला होता. मुजीब उल रहेमानवर कोलकाता नाईट रायडर्सने 2 कोटी रुपयांची बोली लावत आपल्या संघात समावेश केला आहे. तर लखनौ सुपर जायंट्सने नवीन उल हक ला रिटेन केले आहे.
भारताविरुद्ध होणार टी20 मालिका
भारत वि. अफगाणिस्तान टी 20 मालिकेला ११ जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. अफगाणिस्तानकडून 3 सामन्यांची टी20 मालिका खेळण्याची तयारी करत आहे. मालिकेतील पहिला सामना ११ जानेवारीला मोहिलीमध्ये, दुसरा सामना १४ जानेवारीला इंदुरमध्ये आणि तिसरा आणि शेवटा सामना १७ जानेवारी रोजी बंगळूरच्या मैदानावर खेळवण्यात येईल.
नवीन उल हकने घेतला होता 'विराट'शी पंगा
1 मे 2023 रोजी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि लखनौ सुपर जायंट्स या दोन संघामध्ये सामना रंगला होता. या सामन्यात आरसीबीने 18 धावांनी विजय मिळवला होता. दरम्यान या सामन्यात विराट कोहली आणि नवीन उल हक यांच्यामध्ये मोठा वाद झाला होता. या वादात गौतम गंभीरनेही उडी घेतली होती.
आणखी वाचा
बॉक्सिंग डे कसोटीत जाडेजा नाही, भारताची प्रथम फलंदाजी, नाणेफेकीचा कौल आफ्रिकेच्या बाजूने
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
