एक्स्प्लोर
'पाकिस्तान क्रिकेट प्रशिक्षकपदासाठी मी उपलब्ध आहे'
मुंबई : पाकिस्तान क्रिकेट प्रशिक्षकपदावरुन वकार युनूस पायउतार झाल्यानंतर रिक्त पदासाठी शोधाशोध सुरु आहे. त्यातच माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी यांनी पाकिस्तानचा कोच म्हणून आपला विचार व्हावा, या आशयाचं ट्वीट केलं आहे.
पाकिस्तानतर्फे परदेशी व्यक्तींची प्रशिक्षक म्हणून नेमणूक केली जाणार का, याबाबत स्पष्टता नसली तरी विनोद कांबळी यांनी पाकचा कोच म्हणून काम करण्यास उत्सुकता दर्शवली आहे.
अस्मा शिराझी या पाकिस्तानी पत्रकाराला मेन्शन करुन कांबळी यांनी ट्वीट केला आहे. 'अस्माजी सलाम वालेकुम, पाक क्रिकेट बोर्ड मुख्य प्रशिक्षकाचा शोध घेत आहे, असं ऐकलं. मी उपलब्ध आहे.' असं त्यात म्हटलं आहे.
विनोद कांबळी यांच्या ट्वीटनंतर अनेकांनी त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. त्यातील काही ट्वीट्सना उत्तर देताना 'मी बेरोजगार नाही. पण जर वासिम अक्रम आयपीएलचा कोच होऊ शकतो, तर मी का नाही?' असं म्हटलं आहे.
https://twitter.com/vinodkambli349/status/717541773896261632
https://twitter.com/vinodkambli349/status/717629893308186624
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
छत्रपती संभाजी नगर
महाराष्ट्र
बातम्या
नाशिक
Advertisement