एक्स्प्लोर
टेनिसस्टार सेरेना विल्यम्सकडे गुड न्यूज
न्यूयॉर्क : अमेरिकेची माजी वर्ल्ड नंबर वन टेनिसपटू सेरेना विल्यम्सकडे गुड न्यूज आहे. सेरेना सोशल मीडियावरुन आपण गरोदर असल्याचं जाहीर केलं आहे. मात्र स्नॅपचॅटवरील ही पोस्ट तिने काही वेळातच डिलीट केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
35 वर्षीय सेरेनानं स्नॅपचॅटवर फोटो पोस्ट करुन त्याखाली 20 वीक्स असं कॅप्शन दिलं. यामुळे ती 20 आठवड्यांची गर्भवती असल्याचे संकेत मिळतात. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात 'रेडिट' या वेबसाईटचा सहसंस्थापक अॅलेक्सिस ओहानियनसोबत सेरेनाचा साखरपुडा झाला होता.
जानेवारी महिन्यात सेरेनानं बहीण व्हीनस विल्यम्सला हरवून ऑस्ट्रेलियन ओपनचं विजेतेपद पटकावलं होतं. त्यानंतर ती टेनिसच्या कोर्टपासून दूर राहिली आहे. सेरेना आतापर्यंत सर्वाधिक ग्रँडस्लॅम जेतेपदं पटकावण्याचा मान मिळवला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
क्राईम
क्रीडा
Advertisement