एक्स्प्लोर
विम्बल्डनमध्ये विजयाचं शतक, रॉजर फेडररची ग्रॅण्ड स्लॅममध्ये ऐतिहासिक कामगिरी
याआधी एकाच ग्रॅन्डस्लॅममध्ये सर्वाधिक सामने जिंकण्याचा विक्रम अमेरिकेच्या जिमी कॉनर्सच्या नावावर होता. त्याने अमेरिकन ओपनमध्ये सर्वाधिक 98 सामने जिंकण्याचा पराक्रम गाजवला होता.
लंडन : स्वित्झर्लंडचा महान टेनिसवीर रॉजर फेडररने विम्बल्डनच्या ग्रासकोर्टवर एका ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली. फेडररने बुधवारी जपानच्या केई निशिकोरीचा धुव्वा उडवून विम्बल्डनची उपांत्य फेरी गाठली.
फेडररने निशिकोरीवर मिळवलेला हा विजय विम्बल्डनमधला त्याचा शंभरावा विजय ठरला. त्यामुळे एकाच ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धेत विजयाचं शतक साजरं करणारा फेडरर हा जगातला पहिलाच खेळाडू ठरला आहे. उपांत्य फेरीच्या सामन्यात फेडररने निशिकोरीचं आव्हान 4-6, 6-1, 6-4, 6-4 असं मोडीत काढलं.
याआधी एकाच ग्रॅन्डस्लॅममध्ये सर्वाधिक सामने जिंकण्याचा विक्रम अमेरिकेच्या जिमी कॉनर्सच्या नावावर होता. त्याने अमेरिकन ओपनमध्ये सर्वाधिक 98 सामने जिंकण्याचा पराक्रम गाजवला होता. फेडररने यंदाच्या विम्बल्डनमध्ये उपांत्यपूर्व फेरीपर्यंत सलग चार सामने जिंकून शंभरावा विजय साजरा केला आणि जिमी कॉनर्सचा विक्रमही मोडीत काढला.
चारही ग्रॅण्ड स्लॅममध्ये सर्वाधिक विजय मिळवणारे टेनिसवीर-
रॉजर फेडरर- 97 (ऑस्ट्रेलियन ओपन)
राफेल नदाल- 93 (फ्रेंच ओपन)
रॉजर फेडरर - 100 (विम्बल्डन)
जिमी कॉनर्स - 98 (अमेरिकन ओपन)
फेडररने आजवरच्या ग्रॅण्ड स्लॅम कारकीर्दीत 352 सामन्यांत विजय संपादन केला आहे. त्याची प्रत्येक ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धेतली विजयी कामगिरी-
ऑस्ट्रेलियन ओपन - 97
फ्रेंच ओपन - 70
विम्बल्डन - 100
अमेरिकन ओपन - 85
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement