एक्स्प्लोर
Advertisement
सलग 9 सामन्यात विजय... टीम इंडियाचा भीमपराक्रम!
टीम इंडियानं आज (बुधवार) श्रीलंकेविरुद्ध एकमेव टी-20 सामन्यात विजय मिळवून भारताच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोचला आहे.
कोलंबो : श्रीलंका दौऱ्यात सलग नऊ सामने जिंकून भारतानं भीमपराक्रम केला आहे. टीम इंडियानं आज (बुधवार) श्रीलंकेविरुद्ध एकमेव टी-20 सामन्यात विजय मिळवून भारताच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोचला आहे.
आजवर जे कधीही घडलं नव्हतं ते विराटच्या टीम इंडियानं करुन दाखवलं. श्रीलंकेविरुद्ध त्यांच्याच भूमीवर भारतानं एकही सामना न गमवता एक नवा विक्रम आपला नावावर केला. कसोटी, वनडे आणि टी-20 या तीनही फॉर्मेटमध्ये भारतानं लंकेला अक्षरश: पाणी पाजलं.
या दौऱ्यात भारतानं श्रीलंकेला प्रत्येक फॉर्मेटमध्ये व्हॉईटवॉश दिला आहे. गेल्या 85 वर्षात भारतीय संघाला जी कामगिरी करता आली नव्हती ती टीम इंडियानं यावेळी केली. त्यामुळे भारतीय संघाचा आत्मविश्वास चांगलाच दुणावला आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड विरुद्धच्या आगामी मालिकेत भारताला याचा नक्कीच फायदा होईल.
कसोटी मालिका
पहिला कसोटी सामना - भारत 304 धावांनी विजयी
दुसरा कसोटी सामना - भारत एक डाव आणि 53 धावांनी विजयी
तिसरा कसोटी सामना - भारत एक डाव आणि 171 धावांनी विजयी
वनडे मालिका
पहिला वनडे सामना - 9 विकेट राखून भारताचा विजय
दुसरा वनडे सामना - 3 विकेट राखून भारताचा विजय
तिसरा वनडे सामना - 6 विकेट राखून भारताचा विजय
चौथा वनडे सामना - 168 धावांनी भारताचा विजय
पाचवा वनडे सामना - 6 विकेट राखून भारताचा विजय
टी-20 मालिका
टी-20 सामना - भारताचा 7 गडी राखून विजय
संबंधित बातम्या :
INDvsSL टी20 : भारताचा श्रीलंकेवर 7 गडी राखून दणदणीत विजय
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
निवडणूक
नागपूर
निवडणूक
Advertisement