एक्स्प्लोर

Ranji Trophy News : सामना ड्रॉ, एक इनिंग झालीच नाही, तरीही रणजीच्या फायनलमध्ये जम्मू-काश्मीर विजयी; काय सांगतो BCCI चा नियम?

Jammu and Kashmir Ranji Trophy Champion : रणजी ट्रॉफी 2025-26 हंगामात इतिहास रचत जम्मू-काश्मीर संघाने पहिल्यांदाच विजेतेपदावर मोहोर उमटवली.

Jammu and Kashmir Ranji Trophy Champion : रणजी ट्रॉफी 2025-26 हंगामात इतिहास रचत जम्मू-काश्मीर संघाने पहिल्यांदाच विजेतेपदावर मोहोर उमटवली. अंतिम सामन्यात जम्मू-काश्मीरचा सामना कर्नाटक संघाशी झाला. या लढतीत जम्मू-काश्मीरने एकतर्फी वर्चस्व गाजवत ट्रॉफी आपल्या नावावर केली. पहिल्याच डावात 584 धावांचा डोंगर उभारत त्यांनी सामन्यावर पकड मजबूत केली आणि अखेर सामना अनिर्णित (Draw) राहूनही ते विजेते ठरले.

जम्मू-काश्मीरची दमदार फलंदाजी

कर्नाटकविरुद्धच्या अंतिम सामन्यात जम्मू-काश्मीरच्या फलंदाजांनी अप्रतिम कामगिरी केली. प्रथम फलंदाजी करताना संघाने पहिल्याच डावात 584 धावा फलकावर लावल्या. या डावात शुभम पुंडिरने शानदार शतक झळकावले, तर पाच फलंदाजांनी अर्धशतके ठोकत भक्कम पाया रचला. 

दुसऱ्या डावातही जम्मू-काश्मीरच्या फलंदाजांनी आपला दबदबा कायम ठेवला. सलामीवीर कामरान अकमलने नाबाद 160 धावांची खेळी केली, तर अष्टपैलू साहिल लोट्राने नाबाद 101 धावा करत शतक पूर्ण केले. परिणामी, दुसऱ्या डावात 4 गडी गमावून 342 धावा उभारण्यात संघाला यश आले.

मयंक अग्रवाल एकटा नडला, पण....

जम्मू-काश्मीरने पहिल्या डावात 584 धावा केल्यानंतर कर्नाटक संघ पहिल्या डावात केवळ 293 धावांवर गारद झाला. कर्नाटककडून मयंक अग्रवालने 160 धावांची झुंजार खेळी केली, पण त्याला इतर फलंदाजांची साथ लाभली नाही. एकाही फलंदाजाला 40 धावांचा टप्पा पार करता आला नाही, त्यामुळे सामना हळूहळू कर्नाटकच्या हातातून निसटत गेला.

ड्रॉ असूनही जम्मू-काश्मीर विजेता का?

कसोटी क्रिकेटमध्ये 5 दिवस खेळूनही निकाल लागला नाही तर तो सामना ड्रॉ मानला जातो, पण फायनलमध्ये एकाला तरी विजेता घोषित करणं गरजेचं असतं. रणजी ट्रॉफीच्या नियमानुसार, जर 5 दिवसांचा खेळ संपल्यानंतरही सामन्याचा निकाल लागला नाही, तर ज्या संघाने पहिल्या डावात जास्त धावा केल्या असतात, त्या संघाला विजयी घोषित केले जाते. जम्मू-काश्मीरने पहिल्या डावात 584 धावा करत आघाडी घेतली होती. त्यामुळेच त्यांना 2025-26 हंगामाचे चॅम्पियन घोषित करण्यात आले. इतिहासात प्रथमच विजेतेपद पटकावत जम्मू-काश्मीरने देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपली ताकद सिद्ध केली आहे. 

हे ही वाचा -

Jammu and Kashmir Champion Ranji Trophy : रणजी ट्रॉफीचा अख्खा इतिहास-भूगोल बदलला; कर्नाटकला नमवून जम्मू-काश्मीर पहिल्यांदाच चॅम्पियन

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kavya Maran Abrar Ahmed The Hundred Leauge: पाकिस्तानच्या अबरारला संघात घेतलं, आता निवेदन जारी केलं; काव्या मारनचा संघ म्हणाला, बोली लावण्यासाठी...
अबरारला संघात घेतलं, आता निवेदन जारी केलं; काव्या मारनचा संघ म्हणाला, बोली लावण्यासाठी...
Kavya Maran Abrar Ahmed The Hundred Leauge: काव्या मारनने पाकिस्तानच्या अबरार अहमदला संघात घेतले; सोशल मीडियावर संताप, आता 'एक्स'कडून पहिली कारवाई
काव्या मारनने अबरार अहमदला संघात घेतले; सोशल मीडियावर संताप, 'एक्स'कडून पहिली कारवाई
RCB IPL 2026 Team Playing XI: धडकी भरवणारा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा Full Squad, IPL 2026 साठी अशी असेल Playing XI
धडकी भरवणारा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा Full Squad, IPL 2026 साठी अशी असेल Playing XI
Abrar Ahmed : पाकिस्तानी अबरार अहमदसाठी काव्या मारनच्या सनरायजर्स लीडसनं मोजले 2.34 कोटी रुपये, द हंड्रेड लीगमध्ये खेळणार
पाकिस्तानी अबरार अहमदसाठी काव्या मारनच्या सनरायजर्स लीडसनं मोजले 2.34 कोटी रुपये, नेटकरी संतापले
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Politics On Gas Shortage : गॅस सिलिंडर टंचाईविरोधात काँग्रेस आक्रमक Special Report
Special Report Bomb Threat to Assembly : धमकीचा बॉम्ब, अफवांमुळे घाम! Special Report
Politics On Marathi Language : मराठीचा मुद्दा, मुनगंटीवारांचा गुद्दा Special Report
Queue For LPG Cylinder : मुबलकसाठा आणि रांगेतला आटापिटा, नागरिक चिंतेत Special Report
Special Rpeort Cockroach Spray On Fish : माशांवर लाल हिट, कारवाईचा स्प्रे कधी? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Stock Market Today: शेअर बाजारात घसरगुंडी सुरूच; सेन्सेक्स 645 अंकांनी कोसळला, निफ्टीतही घसरण, गुंतवणूकदारांना मोठा झटका
शेअर बाजारात घसरगुंडी सुरूच; सेन्सेक्स 645 अंकांनी कोसळला, निफ्टीतही घसरण, गुंतवणूकदारांना मोठा झटका
Kavya Maran Abrar Ahmed The Hundred Leauge: पाकिस्तानच्या अबरारला संघात घेतलं, आता निवेदन जारी केलं; काव्या मारनचा संघ म्हणाला, बोली लावण्यासाठी...
अबरारला संघात घेतलं, आता निवेदन जारी केलं; काव्या मारनचा संघ म्हणाला, बोली लावण्यासाठी...
Kolhapur LPG Cylinder Shortage: कोल्हापुरात लग्न सुद्धा गेली गॅसवर, सिलेंडर मिळेनात, तब्बल तीन आमदारांच्या घरात सुद्धा मोठी लगीनघाई; जिल्हा पुरवठा अधिकारी नेमकं काय म्हणाल्या? कॅटरर्सना सुद्धा सूचना
कोल्हापुरात लग्न सुद्धा गेली गॅसवर, सिलेंडर मिळेनात, तब्बल तीन आमदारांच्या घरात सुद्धा मोठी लगीनघाई; जिल्हा पुरवठा अधिकारी नेमकं काय म्हणाल्या? कॅटरर्सना सुद्धा सूचना
भारतीय वंशाच्या दोन भावांना अमेरिकेत तब्बल 835 वर्षांची शिक्षा, कोर्टाने दोषी ठरवलं; नेमकं प्रकरण काय?
भारतीय वंशाच्या दोन भावांना अमेरिकेत तब्बल 835 वर्षांची शिक्षा, कोर्टाने दोषी ठरवलं; नेमकं प्रकरण काय?
Weather Alert: महाराष्ट्रावर दुहेरी संकट; एकीकडे उष्णतेची लाट तर दुसरीकडे अवकाळी पाऊस झोडपणार, 72 तासांसाठी अलर्ट, हवामान विभागाचा अंदाज
महाराष्ट्रावर दुहेरी संकट; एकीकडे उष्णतेची लाट तर दुसरीकडे अवकाळी पाऊस झोडपणार, 72 तासांसाठी अलर्ट, हवामान विभागाचा अंदाज
Buldhana Crime News: बुलढाणा हादरलं! शिक्षिकेचा मोबाईल हॅक करून अश्लील फोटोद्वारे ब्लॅकमेल; व्हिडिओ कॉल करून विवस्त्र होण्याची अन् शरीर संबंधांसाठी धमकी
बुलढाणा हादरलं! शिक्षिकेचा मोबाईल हॅक करून अश्लील फोटोद्वारे ब्लॅकमेल; व्हिडिओ कॉल करून विवस्त्र होण्याची अन् शरीर संबंधांसाठी धमकी
Santosh Deshmukh Case: सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी जयराम चाटे 14 महिन्यानंतर जेल बाहेर; नेमकं कारण काय?
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी जयराम चाटे 14 महिन्यानंतर जेल बाहेर; नेमकं कारण काय?
Neena Gupta On Unexpected Pregnancy Rumours: 66 वर्षांच्या नीना गुप्ता गरोदर? विजय-रश्मिकाच्या रिसेप्शनमध्ये फ्लॉन्ट केला बेबी बंप, VIDEO
66 वर्षांच्या नीना गुप्ता गरोदर? विजय-रश्मिकाच्या रिसेप्शनमध्ये फ्लॉन्ट केला बेबी बंप, VIDEO
Embed widget