एक्स्प्लोर

Jammu and Kashmir Champion Ranji Trophy : रणजी ट्रॉफीचा अख्खा इतिहास-भूगोल बदलला; कर्नाटकला नमवून जम्मू-काश्मीर पहिल्यांदाच 'चॅम्पियन'

Jammu and Kashmir beat Karnataka : रणजी ट्रॉफी 2025-26 च्या रोमहर्षक अंतिम सामन्यात जम्मू आणि काश्मीरने बलाढ्य कर्नाटक संघावर मात करत पहिल्यांदाच रणजी चषकावर आपले नाव कोरले आहे.

Ranji Trophy Final Jammu and Kashmir vs Karnataka : भारतीय देशांतर्गत क्रिकेटमध्ये आज एका नव्या अध्यायाची सुवर्ण अक्षरांत नोंद झाली. रणजी ट्रॉफी 2025-26 च्या रोमहर्षक अंतिम सामन्यात जम्मू आणि काश्मीरने बलाढ्य कर्नाटक संघावर मात करत पहिल्यांदाच रणजी चषकावर आपले नाव कोरले आहे. विशेष म्हणजे, अंतिम फेरीत पोहोचण्याची ही जम्मू-काश्मीरची पहिलीच वेळ होती आणि पहिल्याच प्रयत्नात त्यांनी विजेतेपदाला गवसणी घातली. पाचव्या दिवशी दुपारच्या जेवणानंतर कर्णधार पारस डोग्राने आपला डाव घोषित केला आणि नियमांनुसार संघाला विजयी घोषित करण्यात आले.

अंतिम सामना अनिर्णित; तरी जम्मू आणि काश्मीर पहिल्यांदाच चॅम्पियन

कसोटी क्रिकेटमध्ये 5 दिवस खेळूनही निकाल लागला नाही तर तो सामना ड्रॉ मानला जातो, पण फायनलमध्ये एकाला तरी विजेता घोषित करणं गरजेचं असतं. रणजी ट्रॉफीच्या नियमानुसार, जर 5 दिवसांचा खेळ संपल्यानंतरही सामन्याचा निकाल लागला नाही, तर ज्या संघाने पहिल्या डावात जास्त धावा केल्या असतात, त्या संघाला विजयी घोषित केले जाते. येथे जम्मू-काश्मीरने पहिल्या डावात मोठी आघाडी घेतली होती, त्यामुळे सामना ड्रॉ होऊनही नियमांच्या आधारे रणजी ट्रॉफीवर जम्मू-काश्मीर संघाच नाव कोरलं गेलं.

जम्मू-काश्मीरने पहिल्या डावात उभारला 584 धावांचा डोंगर

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या जम्मू-काश्मीर संघाने पहिल्या डावात तब्बल 584 धावा करत प्रतिस्पर्ध्यांपुढे मोठे आव्हान उभे केले. दुसऱ्या विकेटसाठी शुभम पुंडीर आणि यावर हसन यांनी 139 धावांची भागीदारी करत संघाचा पाया मजबूत केला. यावर 88 धावांवर बाद झाला, पण त्यानंतर शुभमने अब्दुल समदच्या साथीने चौथ्या विकेटसाठी आणखी 124 धावा जोडल्या. शुभम पुंडीरने 14 चौकारांसह शानदार 121 धावांची खेळी साकारली, तर अब्दुल समदने 61 धावांचे मोलाचे योगदान दिले. कर्णधार पारस डोगराने 70 धावा करत नेतृत्वाची जबाबदारी समर्थपणे पार पाडली, तर साहिल लोत्रानेही 72 धावांची उपयुक्त खेळी केली. कर्नाटक संघाकडून प्रसिद्ध कृष्णाने 5 विकेट घेत प्रभावी गोलंदाजी केली. तसेच विद्याधर पाटील, विजयकुमार विशाक, श्रेयस गोपाल आणि शिखर शेट्टी यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

औकिब नबी ठरला 'हिरो'

पहिल्या डावात फलंदाजीसाठी उतरलेल्या कर्नाटकच्या संघाची सुरुवात अत्यंत निराशाजनक ठरली. जम्मू-काश्मीरचा वेगवान गोलंदाज औकिब नबीने अचूक मारा करत कर्नाटकच्या वरच्या फळीची अक्षरशः कंबर मोडली. स्टार फलंदाज केएल राहुल (13) याला माघारी धाडल्यानंतर त्याने करुण नायर आणि स्मरण आर यांनाही खाते न उघडताच पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.

औकिबच्या या भेदक गोलंदाजीमुळे कर्नाटकवर सुरुवातीपासूनच दबाव निर्माण झाला. त्यातच सुनील कुमारने देवदत्त पडिक्कलचा बळी घेत कर्नाटकच्या अडचणीत भर टाकली. एकीकडे विकेट्स पडत असताना कर्णधार मयंक अग्रवालने दुसरा टोक सांभाळत शानदार शतक झळकावले आणि डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र औकिब नबीने त्यालाही 160 धावांवर रोखत पुन्हा कर्नाटकला मोठा धक्का दिला.

अखेर कर्नाटकचा संपूर्ण डाव 293 धावांवर आटोपला. औकिब नबीने अप्रतिम गोलंदाजी करत 23 षटकांत 7 निर्धाव षटके टाकत 54 धावांत 5 बळी घेतले आणि सामन्यावर ठसा उमटवला. पहिल्या डावात 291 धावांची भक्कम आघाडी मिळूनही जम्मू-काश्मीरने फॉलोऑन न देण्याचा निर्णय घेतला होता.

दुसऱ्या डावात कामरान अन् साहिलने ठोकले शतके... 

दुसऱ्या डावात जम्मू आणि काश्मीरकडून कामरान इक्बाल आणि साहिल लोत्रा ​​यांनी शतके झळकावली. यावर हसन 1 धावांवर बाद झाला होता, परंतु सलामीवीर कामरानने डाव सावरला. दुसऱ्या डावात जम्मू आणि काश्मीरने 4 बाद 342 धावा केल्या. कामरानने नाबाद 160 धावा केल्या, तर साहिलने नाबाद 101 धावा केल्या. पाचव्या दिवशी दुपारच्या जेवणानंतर कर्णधार पारस डोग्राने आपला डाव घोषित केला आणि नियमांनुसार संघाला विजयी घोषित करण्यात आले.

हे ही वाचा -

IND vs PAK T20 World Cup 2026 : टी-20 विश्वचषकात भारत अन् पाकिस्तान पुन्हा आमनेसामने?, जाणून घ्या संपूर्ण समीकरण

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IND vs NZ Final : भारत की न्यूझीलंड?, फायनल सामना रद्द झाला तर कुणाला मिळणार टी-20 विश्वचषकाची ट्रॉफी?; A टू Z माहिती
भारत की न्यूझीलंड?, फायनल सामना रद्द झाला तर कुणाला मिळणार टी-20 विश्वचषकाची ट्रॉफी?; A टू Z माहिती
Navjot Singh Sidhu on Mohammad Amir Dhongi baba : 'थोथा चना बाजे घना'... ढोंगी बाबा...; मोहम्मद आमिरला नवज्योत सिंग यांनी सुनावलं; नको नको ते बोलले, जुने व्हिडीओ काढले
'थोथा चना बाजे घना'... ढोंगी बाबा...; मोहम्मद आमिरला नवज्योत सिंग यांनी सुनावलं; नको नको ते बोलले, जुने व्हिडीओ काढले
Shoaib Akhtar IND vs ENG Semi-Final : तौबा-तौबा... तोच खरा टीम इंडियाचा मास्टरमाईंड; भारत फायनलमध्ये पोहोचताच शोएब अख्तर मनातलं सगळं बोलला!
तौबा-तौबा... तोच खरा टीम इंडियाचा मास्टरमाईंड; भारत फायनलमध्ये पोहोचताच शोएब अख्तर मनातलं सगळं बोलला!
IND vs ENG T20 World Cup Semi Final : मेहनत गौतम गंभीरची, चर्चा MS धोनीची! टीम इंडिया फायनलमध्ये जाताच सगळं क्रेडिट थाला घेऊन गेला, वानखेडेवर नेमकं काय घडलं?
मेहनत गौतम गंभीरची, चर्चा MS धोनीची! टीम इंडिया फायनलमध्ये जाताच सगळं क्रेडिट थाला घेऊन गेला, वानखेडेवर नेमकं काय घडलं?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Amol Mitkari On Ajit Pawar : अजितदादांशिवाय अर्थसंकल्प ही कल्पनाच असह्य, मिटकरींच्या डोळ्यात अश्रू
Arjun Tendulkar Marriage : अर्जुनची नवी इनिंग, सेलिब्रिटी वऱ्हाडी Special Report
Nitish Kumar Rajyasabha Bihar : राज्यसभेत नितीशकुमार, भाजपसाठी मोकळं बिहार Special Report
Jyoti Waghmare Rajysabha : राज्यसभेत वाघमारे आणि नाराजीचे नगारे Special Report
Maharashtra Rajyasabha Election : सर्वांचा विजय पक्का 'बिनविरोध'वर शिक्का Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Budget 2026 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सादर करणार महाराष्ट्राचा अर्थसकंल्प, लाडकी बहीणचा हप्ता वाढणार? लाईव्ह अपडेटस
Maharashtra Budget 2026 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सादर करणार महाराष्ट्राचा अर्थसकंल्प, लाईव्ह अपडेटस एका क्लिकवर
नेतृत्व संपूनही इराणकडून 9 देशातील 14 अमेरिकन एअरबेस उद्ध्वस्त, दुबईसकट मित्र देश सुद्धा होरपळले; आता ट्रम्प इराणी लष्कराला मरणाची 'भीती' दाखवत काय म्हणाले?
नेतृत्व संपूनही इराणकडून 9 देशातील 14 अमेरिकन एअरबेस उद्ध्वस्त, दुबईसकट मित्र देश सुद्धा होरपळले; आता ट्रम्प इराणी लष्कराला मरणाची 'भीती' दाखवत काय म्हणाले?
Vasant More: सोशल मीडियावर व्हायरल वक्तव्य महागात; वसंत मोरे यांच्यावर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?
सोशल मीडियावर व्हायरल वक्तव्य महागात; वसंत मोरे यांच्यावर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?
Maharashtra Budget 2026 : महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात कोणत्या योजना जाहीर होणार? मत्स्यसंपदा योजना ते नवीकरणीय ऊर्जा धोरण, जाणून घ्या सविस्तर
महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात कोणत्या योजना जाहीर होणार? मत्स्यसंपदा योजना ते नवीकरणीय ऊर्जा धोरण, जाणून घ्या सविस्तर
अमेरिकेची भारताला रशियन तेल घेण्यास 30 दिवसांची 'तात्पुरती परवानगी'; अमेरिका म्हणतो, 'ट्रम्प यांच्या धोरणांमुळे आम्हाला पूर्ण खात्री, भारत आता आमच्याकडून तेल खरेदी वाढवेल'
अमेरिकेची भारताला रशियन तेल घेण्यास 30 दिवसांची 'तात्पुरती परवानगी'; अमेरिका म्हणतो, 'ट्रम्प यांच्या धोरणांमुळे आम्हाला पूर्ण खात्री, भारत आता आमच्याकडून तेल खरेदी वाढवेल'
Su‑30MKI Crash Flt Lt Purvesh Duragkar: भारतीय वायूदलाचं लढाऊ विमान कोसळलं, महाराष्ट्राचे सुपूत्र फ्लाइट लेफ्टनंट पूर्वेश दुरगकर शहीद
भारतीय वायूदलाचं लढाऊ विमान कोसळलं, महाराष्ट्राचे सुपूत्र फ्लाइट लेफ्टनंट पूर्वेश दुरगकर शहीद
IND vs ENG T20 World Cup Semi Final : मेहनत गौतम गंभीरची, चर्चा MS धोनीची! टीम इंडिया फायनलमध्ये जाताच सगळं क्रेडिट थाला घेऊन गेला, वानखेडेवर नेमकं काय घडलं?
मेहनत गौतम गंभीरची, चर्चा MS धोनीची! टीम इंडिया फायनलमध्ये जाताच सगळं क्रेडिट थाला घेऊन गेला, वानखेडेवर नेमकं काय घडलं?
Laxman Hake: महाराष्ट्रातील ओबीसींनो तुम्ही झोपा काढा, तुमचं आरक्षण संपलंय; राधाकृष्ण विखे पाटलांच्या निर्णयानंतर लक्ष्मण हाके संतापले
महाराष्ट्रातील ओबीसींनो तुम्ही झोपा काढा, तुमचं आरक्षण संपलंय; राधाकृष्ण विखे पाटलांच्या निर्णयानंतर लक्ष्मण हाके संतापले
Embed widget