एक्स्प्लोर
Advertisement
IND vs WI T20 and ODI Series : टीम इंडियाच्या शिलेदारांची घोषणा, भुवनेश्वर, शमीचं पुनरागमन
वेस्ट इंडिज विरुद्धच्या तीन टी20 आणि तीन एकदिवसी सामन्यांच्या मालिकांसाठी टीम इंडियाच्या शिलेदारांची निवड झाली आहे. बीसीसीआयने आज संध्याकाळी संघाची घोषणा केली.
कोलकाता : आगामी वेस्ट इंडिज विरुद्धच्या तीन टी20 आणि तीन एकदिवसी सामन्यांच्या मालिकांसाठी टीम इंडियाच्या शिलेदारांची निवड झाली आहे. बीसीसीआयने आज संध्याकाळी संघाची घोषणा केली. टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारचं विंडीजविरुद्धच्या आगामी वन डे आणि टी20 या दोन्ही मालिकांसाठी संघात पुनरागमन झालं आहे.
भारत आणि वेस्ट इंडिज संघांमध्ये डिसेंबर महिन्यात ही मालिका आयोजित करण्यात आली आहे. त्यासाठी आज कोलकात्यात झालेल्या निवड समितीच्या बैठकीत भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. भुवनेश्वरसह जलदगती गोलंदाच मोहम्मद शमीचं टी20 संघात पुनरागमन झालं आहे.
टी20 सामन्यासाठीचा संघ
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, के.एल. राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, ऋषभ पंत, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, दीपक चहर, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार
एकदिवसीय सामन्यासाठीचा संघ
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, के.एल. राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, ऋषभ पंत, शिवम दुबे, केदार जाधव, रवींद्र जडेजा, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, दीपक चहर, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार
मालिकांचं वेळापत्रक
टी20 सामन्यांचं वेळापत्रक
पहिला टी20 सामना- दिनांक - 6 डिसेंबर 2019 (शुक्रवार), स्थळ - मुंबई , वेळ संध्या. 7 वाजता,
दुसरा टी20 सामना - दिनांक 8 डिसेंबर 2019 ,स्थळ -तिरुवनंतपुरम, (रविवार), वेळ संध्या. 7 वजता,
तिसरा टी20 सामना - दिनांक 11 डिसेंबर 2019 (बुधवार), स्थळ - हैदराबाद, वेळ संध्या. 7 वाजता,
एकदिवसीय सामन्यांच वेळापत्रक
पहिला एकदिवसीय सामना:- 15 डिसेंबर 2019 (रविवार),स्थळ - चेन्नई, वेळ - दुपारी 2 वाजता
दुसरा एकदिवसीय सामना:- 18 डिसेंबर 2019 (बुधवार), स्थळ - विशाखापट्टनम, वेळ दुपारी 2 वाजता
तीसरा एकदिवसीय सामना:- 22 डिसेंबर 2019 (रविवार), स्थळ - कटक, वेळ दुपारी 2 वाजता
ALERT🚨: #TeamIndia for the upcoming @Paytm series against West Indies announced. #INDvWI pic.twitter.com/7RJLc4MDB1
— BCCI (@BCCI) November 21, 2019
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement