एक्स्प्लोर
टीम इंडियाकडून शाहिद आफ्रिदीला खास गिफ्ट

मुंबई : भारत आणि पाकिस्तानमध्ये कितीही तणावाचं वातावरण असलं तरी खेळाडूंमध्ये नेहमी मैत्रीचे संबंध असतात. याचाच प्रत्यय ट्विटरवरील एका फोटोवरुन आला. पाकिस्तानचा दिग्गज क्रिकेटर शाहिद आफ्रिदीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर टीम इंडियाने त्याला खास गिफ्ट दिलं आहे. आफ्रिदीने निवृत्ती घेतल्यानंतर टीम इंडियाने कर्णधार विराट कोहलीची जर्सी त्याला भेट दिली आहे, ज्यावर टीम इंडियाच्या खेळाडूंची स्वाक्षरी आहे. एका पाकिस्तानी पत्रकाराने हा फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. तुमच्यासोबत खेळणं हा नेहमीच सर्वोत्तम अनुभव होता, असं विराटच्या जर्सीवर लिहिलेलं आहे. या जर्सीवर कोहलीसोबत, युवराज सिंह, आशीष नेहरा, जसप्रीत बुमरा, सुरेश रैना, पवन नेगी, मोहम्मद शमी, रवींद्र जाडेजा, भुवनेश्वर कुमार, अजिंक्य रहाणे, शिखर धवन, रविचंद्रन अश्विन, हार्दिक पांड्या आणि टीम इंडियाचे माजी संचालक रवी शास्त्री यांची सही आहे. https://twitter.com/faizanlakhani/status/853362439659769856
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
मुंबई
महाराष्ट्र
निवडणूक























