एक्स्प्लोर
बांगलादेशचा धुव्वा उडवत टीम इंडिया विजयी
धवननं सुरेश रैनाच्या साथीनं तिसऱ्या विकेटसाठी 68 धावांची भागीदारी रचून भारताच्या डावाला आकार दिला.

कोलंबो : टीम इंडियानं बांगलादेशचा 6 विकेट्सनी धुव्वा उडवून, ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांच्या तिरंगी मालिकेत आपलं आव्हान कायम राखलं. श्रीलंकेतल्या कोलंबोत या मालिकेचं आयोजन करण्यात आलं आहे. या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी श्रीलंकेला आठ बाद 139 धावांत रोखून टीम इंडियाच्या विजयाचा पाया रचला होता. मग शिखर धवननं 55 धावांची खेळी उभारुन भारताला विजयपथावर नेलं. त्यानं ही खेळी पाच चौकार आणि दोन षटकारांनी सजवली. धवननं सुरेश रैनाच्या साथीनं तिसऱ्या विकेटसाठी 68 धावांची भागीदारी रचून भारताच्या डावाला आकार दिला. त्याआधी, भारतीय गोलंदाजांनी बांगलादेशला वीस षटकांत 8 बाद 139 धावांत रोखलं. भारताकडून जयदेव उनाडकटनं 38 धावांत तीन फलंदाजांना माघारी धाडलं. विजय शंकरनं दोन, तर यजुवेंद्र चहल आणि शार्दूल ठाकूरनं प्रत्येकी एकेक विकेट काढली.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्रिकेट
बुलढाणा
राजकारण























