एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IPL 2019 : सनराईझ हैदराबादचा रॉयल चॅलेंजर बंगलोरवर दणदणीत विजय
बंगलोरकडून विराट कोहली, पार्थिव पटेल, एबी डिव्हिलियर्स, हेटमायर या प्रमुख फलंदाजांनी नांगी टाकल्याने डाव अवघ्या 113 धावांवर आटोपला.
हैदराबाद : सनराईझ हैदराबादने विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर बंगलोरचा तब्बल 118 धावांनी पराभव केला. हैदराबादच्या संघाने ठेवलेल्या 231 धावांचे आव्हान घेऊन उतरलेल्या बंगलोरच्या संघाला अवघ्या 113 धावांमध्ये गुंडाळत आपला विजय साजरा केला.
That's that from Hyderabad. The @SunRisers win by a huge margin of 118 runs against the RCB???????? pic.twitter.com/i1sgwuTgoh
— IndianPremierLeague (@IPL) March 31, 2019
बंगलोरकडून विराट कोहली, पार्थिव पटेल, एबी डिव्हिलियर्स, हेटमायर या प्रमुख फलंदाजांनी नांगी टाकल्याने डाव अवघ्या 113 धावांवर आटोपला. बंगलोरकडून डी ग्रँडहोमने सर्वाधिक 37 धावा केल्या. हैदराबादकडून मोहम्मद नबीने 4 तर संदीप शर्माने 3 गडी बाद केले.
डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टोची दमदार शतकं, हैदराबादनं उभारली यंदाची सर्वोच्च धावसंख्या
तत्पूर्वी सलामीच्या डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टोच्या दमदार शतकांमुळे हैदराबादनं बंगलोरसमोर 231 धावांचं मोठं आव्हान ठेवलं होतं. हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर आज वॉर्नर आणि बेअरस्टो या जोडीनं चौकार षटकारांची आतषबाजी करत वैयक्तिक शतकं झळकावली.
बेअरस्टोनं 56 चेंडूत 114 धावा फटकावल्या. तर वॉर्नरनं 55 चेंडूत नाबाद 100 धावा कुटल्या. या दोघांनी सलामीच्या विकेटसाठी 185 धावांची विक्रमी भागीदारी रचली. वॉर्नर आणि बेअरस्टोनं रचलेली आयपीएलमधली ही सलग तिसरी शतकी भागीदारी ठरलेली.
हैदराबादच्या डेव्हिड वॉर्नरनं बंगलोरविरुद्ध झळकावलेलं शतक त्याच्या आयपीएल कारकीर्दीतलं चौथं शतक ठरलं. वॉर्नरनं अवघ्या 55 चेंडूत नाबाद 100 धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीत पाच चौकार आणि पाच षटकारांचा समावेश होता. त्याच्यासोबत सलामीला आलेल्या जॉनी बेअरस्टोनंही आयपीएलमधलं पहिलं शतक झळकावलं. त्यानं 56 चेंडूंचा सामना करताना 12 चौकार आणि सात षटकारांसह 114 धावा कुटल्या.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
ठाणे
महाराष्ट्र
Advertisement