एक्स्प्लोर
Advertisement
श्रीलंकेविरुद्धचा हा विक्रम गेल्या 35 वर्षांपासून कायम
भारताने श्रीलंकेविरुद्धचा गेल्या 35 वर्षांपासूनचा मालिका विजयाचा विक्रमही कायम ठेवला आहे.
विशाखापट्टणम : शिखर धवन आणि श्रेयस अय्यरने रचलेल्या शतकी भागिदारीच्या जोरावर टीम इंडियाने विशाखापट्टणमच्या वन डेत श्रीलंकेचा आठ विकेट्सनी धुव्वा उडवला. भारताने या विजयासह तीन वन डे सामन्यांची मालिका 2-1 अशी जिंकली. भारताने श्रीलंकेविरुद्धचा गेल्या 35 वर्षांपासूनचा मालिका विजयाचा विक्रमही कायम ठेवला आहे.
भारत आणि श्रीलंका यांच्यात आतापर्यंत भारतात खेळवण्यात आलेल्या वन डे मालिकांपैकी एकही मालिका श्रीलंकेला जिंकता आलेली नाही. श्रीलंकेने भारतात पहिली वन डे मालिका 1982-83 साली खेळली होती. तेव्हापासून आतापर्यंत 10 द्विपक्षीय वन डे मालिका खेळल्या आहेत. यापैकी 9 मालिकांमध्ये भारताने श्रीलंकेवर मात केली आहे, तर एक मालिका आनिर्णित राहिली आहे.
भारताने आतापर्यंत जिंकलेल्या वन डे मालिका
- 1982-83 साली तीन वन डे सामन्यांची मालिका भारताने 3-0 ने जिंकली
- 1986-87 साली पाच वन डे सामन्यांची मालिका भारताने 5-0 ने जिंकली
- 1990-91 साली चार वन डे सामन्यांची मालिका भारताने 4-1 ने जिंकली
- 1993-94 साली तीन वन डे सामन्यांची मालिका भारताने 2-1 ने जिंकली
- 1997-98 साली तीन वन डे सामन्यांची मालिका 1-1 ने अनिर्णित
- 2005-06 साली सात वन डे सामन्यांची मालिका भारताने 6-1 ने जिंकली
- 2006-07 साली चार वन डे सामन्यांची मालिका भारताने 2-1 ने जिंकली
- 2009-10 साली पाच वन डे सामन्यांची मालिका भारताने 3-1 ने जिंकली
- 2014-15 साली पाच वन डे सामन्यांची मालिका भारताने 5-0 ने जिंकली
- 2017-18 मध्ये तीन वन डे सामन्यांची मालिका भारताने 3-1 ने जिंकली
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
महाराष्ट्र
क्राईम
राजकारण
Advertisement