एक्स्प्लोर
क्लीन स्विप! पाचव्या वन डेत श्रीलंकेचा 6 विकेट्स राखून धुव्वा
कोलंबो वन डेत भारताकडून भुवनेश्वर कुमारने 42 धावांत श्रीलंकेच्या पाच फलंदाजांना माघारी धाडलं.

कोलंबो : विराट कोहलीच्या टीम इंडियाने श्रीलंका दौऱ्यातल्या कसोटी मालिकेपाठोपाठ वन डे सामन्यांच्या मालिकेतही क्लीन स्विपची नोंद केली. भारताने कोलंबोच्या पाचव्या वन डेत श्रीलंकेचा सहा विकेट्सनी धुव्वा उडवून, पाच सामन्यांच्या मालिकेवर 5-0 असं निर्विवाद वर्चस्व गाजवलं.
भुवनेश्वर कुमारने घेतलेल्या पाच विकेट्स आणि कर्णधार विराट कोहलीचं नाबाद शतक टीम इंडियाच्या सलग पाचव्या विजयात निर्णायक ठरलं. या सामन्यात भुवनेश्वर कुमारने 42 धावांत पाच विकेट्स घेऊन श्रीलंकेला 238 धावांत गुंडाळण्यात मोलाची भूमिका बजावली.
त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या विराट कोहलीने नाबाद धावांची खेळी उभारून टीम इंडियाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. त्याने केदार जाधवच्या साथीने 110 धावांची अभेद्य भागीदारी रचली. केदारने 63 धावांची खेळी केली.
श्रीलंकेने कोलंबोच्या पाचव्या वन डेत टीम इंडियासमोर विजयासाठी 239 धावांचं आव्हान दिलं होतं. लाहिरू थिरीमने आणि अँजलो मॅथ्यूजने चौथ्या विकेटसाठी 122 धावांची झुंजार भागीदारी रचूनही, भारतीय गोलंदाजांनी श्रीलंकेचा 238 धावांत खुर्दा उडवला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
भारत
महाराष्ट्र
करमणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
