एक्स्प्लोर
शशांक मनोहर BCCI चा राजीनामा देण्याचे संकेत, पवारांची वर्णी?
मुंबई : बीसीसीआयचे अध्यक्ष शशांक मनोहर यांच्यासमोर एक यक्षप्रश्न उभा राहिला आहे. बीसीसीआयचं अध्यक्षपद राखायचं की आयसीसीचं चेअरमनपद? या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी मनोहर यांच्याकडे केवळ दीड महिन्याचा अवधी आहे.मात्र मनोहर यांनी बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची तिलांजली दिल्यास शरद पवार आणि अजय शिर्के शर्यतीत असण्याची चिन्हं आहेत.
मनोहर हे सध्या बीसीसीआयचे अध्यक्ष आणि आयसीसीचे चेअरमन अशी दुहेरी भूमिका बजावत आहेत. आयसीसीच्या नव्या चेअरमनची निवड ही मेच्या अखेरच्या आठवड्यात होणार आहे आणि आयसीसीच्या नव्या नियमांनुसार चेअरमन पदावरच्या व्यक्तीला राष्ट्रीय किंवा राज्य क्रिकेट असोसिएशनमध्ये दुसरं पद भूषवता येणार नाही. त्यामुळे आयसीसीच्या चेअरमनदावर पुन्हा निवडून यायचं, तर शशांक मनोहर यांना बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागणार आहे.
आयसीसीतल्या एका गटाचा शशांक मनोहर यांना भरघोस पाठिंबा आहे. आणि त्यासाठी त्या गटाच्या पदाधिकाऱ्यांनी नागपूर मुक्कामी मनोहर यांची भेट घेतल्याचंही वृत्तं आहे. पण या संदर्भात मनोहरांनी अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही.
सर्वोच्च न्यायालयाच्या लोढा समितीच्या शिफारशीनुसार बीसीसीआयच्या कार्यकारिणीत काय बदल करावे लागतात, हे लक्षात घेऊनच ते पुढचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. एक राज्य एक मत या शिफारशीनुसार विदर्भाचं बीसीसीआयमधलं मत गेलं आणि मनोहरांना अध्यक्षपदावरून दूर व्हावं लागलं, तर ते आयसीसीचा विचार करण्याची दाट शक्यता आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement