एक्स्प्लोर
धाकटी जिंकली, सेरेनाचा बहिण व्हीनसवर विजय

सिडनी: अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सनं आपली थोरली बहिण व्हीनस विल्यम्सचा 6-4, 6-4 असा धुव्वा उडवून कारकीर्दीत सातव्यांदा ऑस्ट्रेलियन ओपनच्या विजेतेपदावर आपलं नाव कोरलं. सेरेना विल्यम्सच्या आजवरच्या कारकीर्दीतलं हे तेवीसावं ग्रँड स्लॅम विजेतेपद ठरलं. सर्वाधिक ग्रँड स्लॅम विजेतीपदांच्या शर्यतीत सेरेना विल्यम्स आता दुसऱ्या स्थानावर दाखल झाली असून, तिनं स्टेफी ग्राफच्या एक पाऊल पुढे टाकलं आहे. महिला टेनिसच्या इतिहासात मार्गारेट कोर्टच्या नावावर सर्वाधिक 24 ग्रँड स्लॅम विजेतीपदं आहेत. मार्गारेट कोर्टच्या विक्रमाची बरोबरी करण्यासाठी सेरेना विल्यम्सला आता केवळ एका विजेतेपदाची आवश्यकता आहे. https://twitter.com/AustralianOpen/status/825283054633525249
आणखी वाचा























