एक्स्प्लोर
मुलीच्या मृत्यूनंतर ‘या’ खेळाडूचा क्रिकेटला कायमचा अलविदा!
सईदबाबत आणखी एक इंटरेस्टिंग बाब म्हणजे 1990 साली वेस्ट इंडीजविरोधातील सामन्यातून क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. या पहिल्या सामन्यात सईद शून्यावर बाद झाला. मात्र, शेवटच्या सामन्यात सईदने शतक ठोकून क्रिकेटला राम राम ठोकला.
मुंबई : वन डे इतिहासात 12 वर्षांपर्यंत सर्वोच्च वैयक्तिक स्कोअरचा रेकॉर्ड बनवणारा सईद अन्वर यांचा आज (6 सप्टेंबर) 49 वा वाढदिवस आहे. पाकिस्तान क्रिकेट टीमचा सर्वोत्तम सलामीवीर म्हणून तो लोकप्रिय आहेत. 1997 मध्ये भारताविरोधातील सामन्यात चेन्नईत 194 धावा बनवून, त्यावेळी वन डेमधील सर्वाधिक धावांची खेळी होती.
सईद अन्वरचं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील करिअर 13 वर्षांचं (1990 ते 2003) होतं. मात्र 2001 साली मुल्तान कसोटी अन्वर यांची शेवटची कसोटी ठरली. कारण त्यानंतर त्याने कसोटी क्रिकेटला राम राम ठोकला.
31 ऑगस्ट 2001 रोजी पाकिस्तानने एशियन टेस्ट चॅम्पियनशिप दरम्यान मुल्तान कसोटीत तिसऱ्याच दिवशी बांगलादेशविरोधात 264 धावांनी मोठा विजय मिळवला होता. त्यावेळी कसोटीमधील सर्वात मोठा विजय मानला जात होता. मुल्तान कसोटीत पाकिस्तानातील पाच फलंदाजांनी शतकं ठोकली होती. याच कसोटी सईद अन्वर याने 101 धावांची खेळी खेळली होती. सईदचं हे शतक करिअरमधील 11 वं आणि शेवटचं ठरलं.
मुल्तान कसोटीच्या तिसऱ्या दिवशी सईदच्या साडेतीन वर्षांची मुलगी बिस्माहचं दीर्घ आजाराने निधन झालं. त्यावेळी मुल्तान कसोटी सोडून तो लाहोरला निघून गेला आणि त्यानंतर पुन्हा सईद कसोटी क्रिकेटमध्ये दिसलाच नाही.
2003 साली वर्ल्डकपमध्ये भारताविरोधातील सामन्यातही सईदने शतक झळकावलं. मात्र पाकिस्तान या सामन्यातही पराभूत झाला. मात्र यातील हे शतक सईद यांनी त्याच्या मुलीला अर्पण केलं.
सईदबाबत आणखी एक इंटरेस्टिंग बाब म्हणजे 1990 साली वेस्ट इंडीजविरोधातील सामन्यातून क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. या पहिल्या सामन्यात सईद शून्यावर बाद झाला. मात्र, शेवटच्या सामन्यात सईदने शतक ठोकून क्रिकेटला राम राम ठोकला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement