एक्स्प्लोर
31 व्या रिओ ऑलम्पिकची कशी आहे व्यवस्था?
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/06/24175438/ff1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/7
![ब्राझीलच्या प्रसिद्ध बास्केटबॉलपटू जानेथ अरकेन यांची या खेळ गावचे महापौर म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. अरकेन यांच्यावर खेळाडू आणि आधिकाऱ्यांचे स्वागत करण्यबरोबरच, त्यांना आवश्यक त्या गरजांची पूर्तता करण्याची जबाबदारी आहे. अरकेन यांची महापौर म्हणून नियुक्ती झाल्यानंतर या नेमणूकीवर आनंद व्यक्त करतानाच, ही जबाबदारी म्हणजे एखादे पदक जिंकण्यासारखे असल्याचे मत व्यक्त केले.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/06/24175447/ja2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ब्राझीलच्या प्रसिद्ध बास्केटबॉलपटू जानेथ अरकेन यांची या खेळ गावचे महापौर म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. अरकेन यांच्यावर खेळाडू आणि आधिकाऱ्यांचे स्वागत करण्यबरोबरच, त्यांना आवश्यक त्या गरजांची पूर्तता करण्याची जबाबदारी आहे. अरकेन यांची महापौर म्हणून नियुक्ती झाल्यानंतर या नेमणूकीवर आनंद व्यक्त करतानाच, ही जबाबदारी म्हणजे एखादे पदक जिंकण्यासारखे असल्याचे मत व्यक्त केले.
2/7
![5 ऑगस्ट ते 21 ऑगस्टदरम्यान रिओ येथे होणाऱ्या 31 व्या अंतरराष्ट्रीय ऑलम्पिक स्पर्धेची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. या स्पर्धेसाठी बनवण्यात आलेल्या खेळ गावचा परिचय नुकताच अंतरराष्ट्रीय मीडियाला करून देण्यात आला.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/06/24175438/ff1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
5 ऑगस्ट ते 21 ऑगस्टदरम्यान रिओ येथे होणाऱ्या 31 व्या अंतरराष्ट्रीय ऑलम्पिक स्पर्धेची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. या स्पर्धेसाठी बनवण्यात आलेल्या खेळ गावचा परिचय नुकताच अंतरराष्ट्रीय मीडियाला करून देण्यात आला.
3/7
![खेळाडूंच्या मदतीसाठी नेमण्यात आलेल्या कर्मचारी आणि स्वयंसेवकांना पुढील आठवड्यापासून प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे या खेळ गावच्या संचालिका मारिया सिलेंटी यांनी सांगितले.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/06/24175432/5102.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
खेळाडूंच्या मदतीसाठी नेमण्यात आलेल्या कर्मचारी आणि स्वयंसेवकांना पुढील आठवड्यापासून प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे या खेळ गावच्या संचालिका मारिया सिलेंटी यांनी सांगितले.
4/7
![विशेष म्हणजे, या खेळ गावांत विविध देशांतून आलेल्या खेळाडू आणि नागरिकांसाठी धार्मिक स्थळे, जीम सेंटर, बँक, पोस्ट ऑफिस, दैनंदिन साहित्यासाठी जनरल स्टोअर्स, ब्यूटी सलून आदींचीही व्यवस्था करण्यात आली आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/06/24175423/4110.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
विशेष म्हणजे, या खेळ गावांत विविध देशांतून आलेल्या खेळाडू आणि नागरिकांसाठी धार्मिक स्थळे, जीम सेंटर, बँक, पोस्ट ऑफिस, दैनंदिन साहित्यासाठी जनरल स्टोअर्स, ब्यूटी सलून आदींचीही व्यवस्था करण्यात आली आहे.
5/7
![रिओ ऑलम्पिकसाठी येणाऱ्या खेळाडूंच्या मदतीसाठी जवळपास १३ हजार कर्मचारी आणि स्वयंसेवकांची व्यवस्था करण्यात आली आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/06/24175409/841.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रिओ ऑलम्पिकसाठी येणाऱ्या खेळाडूंच्या मदतीसाठी जवळपास १३ हजार कर्मचारी आणि स्वयंसेवकांची व्यवस्था करण्यात आली आहे.
6/7
![या ऑलम्पिक स्पर्धेसाठी येणाऱ्या १९ हजार अॅथलेटिकपटू आणि आधिकाऱ्यांची राहण्याची व्यवस्था या खेळ गावात करण्यात आली आहे. यासाठी एक ३१ मजली भव्य इमारत उभी करण्यात आली असून त्यात ३६०४ फ्लॅट आहेत. या फ्लॅटमध्ये १९ हजार खाट, १९६५० कपाटे, ११,१५२ एसी बसवण्यात आले आहेत. या गावात ६० हजार लोकांची रोजची जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी येथे एक रेस्टॉरंटही उभारण्यात आले आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/06/24175402/756.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या ऑलम्पिक स्पर्धेसाठी येणाऱ्या १९ हजार अॅथलेटिकपटू आणि आधिकाऱ्यांची राहण्याची व्यवस्था या खेळ गावात करण्यात आली आहे. यासाठी एक ३१ मजली भव्य इमारत उभी करण्यात आली असून त्यात ३६०४ फ्लॅट आहेत. या फ्लॅटमध्ये १९ हजार खाट, १९६५० कपाटे, ११,१५२ एसी बसवण्यात आले आहेत. या गावात ६० हजार लोकांची रोजची जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी येथे एक रेस्टॉरंटही उभारण्यात आले आहे.
7/7
![य खेळ गावाचे उद्घाटन येत्या गुरूवारी ऑलम्पिक समितीच्या वर्धापन दिनी 'ऑलम्पिक डे' च्या दिवशी करण्यात येणार आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/06/24175356/1.8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
य खेळ गावाचे उद्घाटन येत्या गुरूवारी ऑलम्पिक समितीच्या वर्धापन दिनी 'ऑलम्पिक डे' च्या दिवशी करण्यात येणार आहे.
Published at : 24 Jun 2016 06:00 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भारत
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)