एक्स्प्लोर
गंभीर 28*, विजय 25*, भारत 63/0
राजकोट : राजकोट कसोटीत इंग्लंडनं पहिल्या डावात 537 धावांचा डोंगर उभारल्यानंतर टीम इंडियानंही दमदार सुरुवात केली आहे. भारतानं दुसऱ्या दिवसअखेर नाबाद 63 धावांची मजल मारली आहे. मुरली विजय 25 आणि गौतम गंभीर 28 धावांवर खेळत आहेत.
इंग्लंडच्या ज्यो रुटपाठोपाठ मोईल अली आणि बेन स्टोक्सनं शतकं झळकावली आहेत. बेन स्टोक्सनं 235 चेंडूंत तेरा चौकार आणि दोन षटकांराच्या मदतीनं 128 धावांची खेळी रचली. तर मोईन अलीनं 213 चेंडूंत तेरा चौकारांच्या जोरावर 117 धावांची खेळी केली.
स्टोक्सनं मोईन अलीच्या साथीनं पाचव्या विकेटसाठी 62 धावांची भागीदारीही रचली. भारताकडून रवींद्र जाडेजानं तीन, तर मोहम्मद शमी, उमेश यादव आणि आर. अश्विननं प्रत्येकी दोन विकेट्स काढल्या.
संबंधित बातम्या :
भारताचं ढिसाळ क्षेत्ररक्षण, इंग्लंडचा 537 धावांचा डोंगर
राजकोट कसोटीत पहिल्या दिवशी इंग्लंड सुस्थितीत, ज्यो रुटचं शतक
भारत-इंग्लंड कसोटी मालिकेवरचं संकट टळलं
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement