एक्स्प्लोर
IPL 2018: स्टिव्ह स्मिथऐवजी रहाणे राजस्थान रॉयल्सचा कर्णधार?
जर राजस्थान रॉयल्सनं स्मिथला कर्णधारपदावरुन हटवलं तर त्या जागी अजिंक्य रहाणेची कर्णधारपदी वर्णी लागू शकते.

मुंबई : बॉल टेम्परिंग प्रकरणानंतर स्टीव्ह स्मिथच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. कारण आयपीएलमधील राजस्थान रॉयल्स संघाचं कर्णधारपदही स्मिथ गमावू शकतो. जर राजस्थान रॉयल्सनं स्मिथला कर्णधारपदावरुन हटवलं तर त्या जागी अजिंक्य रहाणेची कर्णधारपदी वर्णी लागू शकते. याआधी ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने स्मिथला कर्णधारपदावरुन हटवलं आहे. बॉल टेम्परिंगसारख्या गंभीर आरोपानंतर आयसीसीने स्मिथवर एका सामन्याची बंदी आणि सामना मानधनाच्या शंभर टक्के दंड ठोठावला आहे. त्यामुळे बीसीसीआयच्या एका गटाचं असं मत आहे की, स्वत: स्मिथने कर्णधारपद सोडलं तर त्या जागी रहाणेला कर्णधार केलं जाऊ शकतं. बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मते, 'आता चेंडू राजस्थान रॉयल्सच्या कोर्टात आहे. स्मिथने युवा खेळाडूंना चेंडूशी छेडछाड करण्याची परवानगी देऊन बेईमानी केली आहे. त्याने एक खराब उदाहरण जगासमोर ठेवलं आहे. पण तो राजस्थान रॉयल्सचा एक महत्त्वाचा खेळाडू आहे. त्यामुळे राजस्थान रॉयल्स या वादात पडणार नाही असं मला वाटतं. स्मिथ जर फक्त फलंदाज म्हणून खेळणार असेल तर कर्णधारपद दुसरं कुणाला तरी बहाल केलं जाईल.' असं ते म्हणाले. संबंधित बातम्या : क्रिकेट विश्वातील बॉल टेम्परिंगच्या पाच घटना मायकल क्लार्क पुन्हा ऑस्ट्रेलिया संघाचा कर्णधार होणार? स्टीव्ह आणि कॅमेरुनवर अखेर आयसीसीकडूनही कारवाई स्मिथला कर्णधारपदावरुन तातडीने हटवा, ऑस्ट्रेलिया सरकारचे आदेश चेंडूशी छेडछाड, ऑस्ट्रेलियाचा खेळाडू कॅमेऱ्यात कैद स्मिथ, वॉर्नर कर्णधार आणि उपकर्णधारपदावरुन पायउतार
आणखी वाचा























