एक्स्प्लोर

Ind vs WI T20 World Cup 2026: तो पहिली ओव्हर टाकायला येणार...; वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्याआधी अश्विनचा टीम इंडियाला इशारा, सगळं सांगून टाकलं!

Ind vs WI T20 World Cup 2026: भारत विरुद्ध वेस्ट इंडिजच्या सामन्याआधी भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटपटू रविचंद्रन अश्विनने टीम इंडियाला इशारा दिला आहे.

Ind vs WI T20 World Cup 2026: आयसीसी टी-20 विश्वचषकात आज भारत विरुद्ध वेस्ट इंडिजमध्ये (India vs West Indies) सामना रंगणार आहे. कोलकाताच्या ईडन गार्डन्स मैदानावर भारत आणि वेस्ट इंडिजचा सामना खेळवण्यात येणार असून दोन्ही संघासाठी करो वा मरोची लढत असणार आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात आज जो संघ जिंकेल, तो सेमीफायनलमध्ये प्रवेश करेल. दोन्ही संघांनी आतापर्यंत एकूण चार टी-20 विश्वचषक सामने खेळले आहेत. वेस्ट इंडिजने यापैकी तीन जिंकले आहेत, तर भारताने फक्त एकदाच विजय मिळवला आहे. दरम्यान, भारत विरुद्ध वेस्ट इंडिजच्या सामन्याआधी भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटपटू रविचंद्रन अश्विनने टीम इंडियाला (R Ashwin On Ind vs WI) इशाराच दिला आहे.

टी-20 विश्वचषकामधील दक्षिण अफ्रिकेने जास्त सामने अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळले होते. त्यामुळे त्या मैदानातील परिस्थिती दक्षिण अफ्रिकेच्या खेळाडूंना माहिती होती. तसेच वेस्ट इंडिजने जास्त सामने कोलकातामध्ये खेळले आहेत. स्कॉटलंड, इटलीविरुद्धचे सामने वेस्ट इंडिजने कोलकातामध्ये खेळले आहेत. त्यामुळे त्यांनाही कोलकातामधील खेळपट्टीची जाणीव आहे. डॅरेन सॅमीच्या नेतृत्वाखाली कोलकातामध्ये वेस्ट इंडिजने 2016 चा टी-20 विश्वचषक जिंकला होता, हे विसरु नका...असंही रविचंद्रन अश्विनने ठणकावलं. वेस्ट इंडिजकडे चांगली गोलंदाजी नाहीय. त्यांच्याकडे दोन डावखुरे फिरकीपटू आहेत. भारतीय संघातील इतक्या डावखुऱ्या फलंदाजांसमोर ते जास्त गोलंदाजी करणार नाही. त्यामुळे रोस्टन चेस गोलंदाजीसाठी येईल. रोस्टन चेस भारतविरुद्ध पहिले षटक घेऊन येईल, असा दावाही रविचंद्रन अश्विनने एका यूट्यूब चॅनलशी बोलताना केला. भारताने कसे सुरक्षित चौकार मारता येईल, कसं इंटेंट कायम ठेवता येईल, याकडे लक्ष दिले पाहिजे, असंही रविचंद्रन अश्विनने सांगितले. (R Ashwin On Ind vs WI T20 World Cup 2026)

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Metrendia! (@metrendia)

मुख्य प्रशिक्षक डॅरेन सॅमी भारताला इशारा- (Daren Sammy On Ind vs WI Super 8 Match)

भारतविरुद्धच्या सामन्याआधी वेस्ट इंडिज क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक डॅरेन सॅमीने इशारा दिला आहे. आमच्या संघातील प्रत्येक खेळाडू भारतविरुद्धच्या सामन्यासाठी सज्ज आहे. मला माहिती आहे की, माझ्याकडे 11 धोकादायक खेळाडू आहेत आणि मला विश्वास आहे की भारताचेही असेच 11 खेळाडू असतील. मला खात्री आहे की, ईडन गार्डन्स स्टेडियममध्ये सुमारे 80,000 चाहते असतील आणि बाहेरून 1.4 अब्ज चाहते टीम इंडियाला पाठिंबा देतील. पण मी माझ्या खेळाडूंना आठवण करून दिली की डेव्हिडने गोलियाथला हरवले तसे आपण यावेळीही ते करू शकतो. ही दोन महान संघांमधील लढाई असेल, असं डॅरेन सॅमी म्हणाला.

वेस्ट इंडिजविरुद्ध अशी असेल टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन- (Ind Playing XI Against WI T20 World Cup 2026)

संजू सॅमसन (यष्टिरक्षक), अभिषेक शर्मा, इशान किशन, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, तिलक वर्मा, शिवम दुबे, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह आणि वरुण चक्रवर्ती.

भारताविरुद्ध वेस्ट इंडिजची संभाव्य प्लेइंग इलेव्हन- (WI Playing XI Against India T20 World Cup 2026)

ब्रँडन किंग, शाई होप (यष्टिरक्षक/कर्णधार), शिमरॉन हेटमायर, रोवमन पॉवेल, शेरफेन रुदरफोर्ड, रोस्टन चेस/अकील हुसेन, रोमारियो शेफर्ड, जेसन होल्डर, मॅथ्यू फोर्ड, गुडाकेश मोती आणि शमार जोसेफ.

भारताचा संपूर्ण संघ- (Team India Full Squad T20 WC 2026)

सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, संजू सॅमसन, शिवम दुबे, इशान किशन, हार्दिक पांड्या, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रिंकू सिंग.

वेस्ट इंडिजचा संपूर्ण संघ- (West Indies Full Squad T20 WC 2026)

ब्रँडन किंग, शाई होप (यष्टीरक्षक/कर्णधार), शिमरॉन हेटमायर, रोवमन पॉवेल, शेरफेन रुदरफोर्ड, रोमारियो शेफर्ड, जेसन होल्डर, मॅथ्यू फोर्ड, अकिल हुसेन, गुडाकेश मोटी, शमर जोसेफ, क्वेंटिन सॅम्पसन, जेडेन सील्स, रोस्टन चेस आणि जॉन्सन चार्ल्स.

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli : लंडनमधील रस्त्यावर कोहली 'बापल्योक' एकत्र, विराट कोहली आणि अकायचा व्हिडीओ व्हायरल 
लंडनमधील रस्त्यावर कोहली 'बापल्योक' एकत्र, विराट कोहली आणि अकायचा व्हिडीओ व्हायरल 
Team India: सूर्याच्या संघाला चंद्राचं ग्रहण, इंग्लंडचा वेळेवरच सराव, टीम इंडियानं मात्र वेळ बदलली; चर्चा तर होणारच
Video: सूर्याच्या संघाला चंद्राचं ग्रहण, इंग्लंडचा वेळेवरच सराव, टीम इंडियानं मात्र वेळ बदलली; चर्चा तर होणारच
Sam Curran : वानखेडे स्टेडियमवर भारतीय चाहत्यांना जल्लोषाची संधी देणार नाही, इंग्लंडच्या सॅम करनचा 'पॅट कमिन्सच्या' स्टाईलमध्ये भारताला इशारा
वानखेडेवर भारतीय चाहत्यांना जल्लोषाची संधी देणार नाही, मैदान शांत ठेवणार,इंग्लंडच्या सॅम करनचा इशारा
Team India : टीम इंडियानं इंग्लंडच्या 'त्या' खेळाडूपासून सावध राहावं, सुनील गावस्कर यांचा सूर्या ब्रिगेडला सल्ला, संजू सॅमसनबद्दल म्हणाले...
टीम इंडियानं इंग्लंडच्या 'त्या' खेळाडूपासून सावध राहावं, सुनील गावस्कर यांचा सूर्या ब्रिगेडला सल्ला, संजू सॅमसनबद्दल म्हणाले...
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

CCTV Hack Special Report : सीसीटीव्ही हॅकिंग, ऑपरेशन खामेनींचं प्लनिंग, इस्त्रायलच्या हजारो नजरा
Golesten Palace Special Report : इराणमधील 500 वर्ष जुन्या वास्तूचं गोलेस्टन पॅलेसचं युद्धात नुकसान
Team India Special Report: सूर्याच्या संघाला चंद्राचं ग्रहण, इंग्लंडचा वेळेवरच सराव, टीम इंडियानं मात्र वेळ बदलली
Pakistan Operation Sindoor Special Report : भीती ऑपरेशन सिंदूरची, भाषा बदलली पाकची, पाकिस्तानची झोप उडाली?
Iran Vs America Special Report : इराणचा पलटवार, पश्चिम आशियात हाहाकार, कतारमधील तळ इराणचं लक्ष्य

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pandharpur Viral Video : पंढरपुरात ट्रक चालकाला पोलिसांकडून बेदम मारहाण, नो एन्ट्री कारवाईचा पोलिसांचा दावा, व्हिडीओने खळबळ
पंढरपुरात ट्रक चालकाला पोलिसांकडून बेदम मारहाण, नो एन्ट्री कारवाईचा पोलिसांचा दावा, व्हिडीओने खळबळ
Israel Iran War : दोन दिवसांपूर्वीच पदभार स्वीकारला, इस्त्रायलच्या हल्ल्यात इराणचे नवे संरक्षणमंत्री ठार
दोन दिवसांपूर्वीच पदभार स्वीकारला, इस्त्रायलच्या हल्ल्यात इराणचे नवे संरक्षणमंत्री ठार
Aaditya Thackeray : राज्यसभेसाठी शरद पवारांच्या नावाची चर्चा, आदित्य ठाकरेंची तातडीने पोस्ट, अजून काही ठरलं नाही...
राज्यसभेसाठी शरद पवारांच्या नावाची चर्चा, आदित्य ठाकरेंची तातडीने पोस्ट, अजून काही ठरलं नाही...
Iran Nuclear Radiation Risk : संघर्ष वाढला तर इराणमध्ये न्युक्लिअर रेडिएशनचा धोका? किती देशांना फटका बसणार?
संघर्ष वाढला तर इराणमध्ये न्युक्लिअर रेडिएशनचा धोका? किती देशांना फटका बसणार?
संतापजनक... बदलापुरात 5 रुपयासाठी महिलेला लघुशंकेपासून रोखले; आमदाराचं ठिय्या आंदोलन, गुन्हा दाखल
संतापजनक... बदलापुरात 5 रुपयासाठी महिलेला लघुशंकेपासून रोखले; आमदाराचं ठिय्या आंदोलन, गुन्हा दाखल
Sam Curran : वानखेडे स्टेडियमवर भारतीय चाहत्यांना जल्लोषाची संधी देणार नाही, इंग्लंडच्या सॅम करनचा 'पॅट कमिन्सच्या' स्टाईलमध्ये भारताला इशारा
वानखेडेवर भारतीय चाहत्यांना जल्लोषाची संधी देणार नाही, मैदान शांत ठेवणार,इंग्लंडच्या सॅम करनचा इशारा
मोठी बातमी! शासकीय वसतिगृहांच्या नावातून मागासवर्गीय शब्द हटवला; दोन महापुरुषांची नावे देण्याचा निर्णय
मोठी बातमी! शासकीय वसतिगृहांच्या नावातून मागासवर्गीय शब्द हटवला; दोन महापुरुषांची नावे देण्याचा निर्णय
सोलापुरात रंगणार 4 थी 'महिला महाराष्ट्र केसरी'; तारीख ठरली, मानाची गदा अन् बक्षीस देऊन गौरव
सोलापुरात रंगणार 4 थी 'महिला महाराष्ट्र केसरी'; तारीख ठरली, मानाची गदा अन् बक्षीस देऊन गौरव
Embed widget