एक्स्प्लोर

पाकिस्तानचा विजय पण स्वप्न भंगलं, वर्ल्ड कपमधून बाहेर, श्रीलंकेची शेवटपर्यंत कडवी झुंज

टी-20 विश्वषचकात आज पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात लढत झाली. या सामन्यात पाकिस्तानचा संघ विजयी झाला आहे. मात्र, सेमीफायनलला जाण्याचं त्यांचं स्वप्न भंगलं आहे. पाकिस्तान विश्वचषकातून बाहेर गेला आहे.

T20 World Cup 2026 Pakistan :  टी-20 विश्वषचकात आज पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात लढत झाली. या सामन्यात पाकिस्तानने श्रीलंकेसमोर 213 धावांचा डोंगर उभा केला होता. या धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेनं शेवटपर्यंत झुंज दिली. श्रीलंकेनं 207 धावा केल्या. पाकिस्तानने अवघ्या  5 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात पाकिस्तानचा विजय झाला असला तरी पाकिस्तान टी-20 विश्वषचकातून बाहेर पडला आहे. सेमीफायनला जाण्याचा दरवाजा पाकिस्तानसाठी कायमचा बंद झाला आहे. 

उपांत्य फेरी गाठण्यासाठी पाकिस्तानने श्रीलंकेला 147  धावांवर रोखने गरजेचे होते

सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी पाकिस्तानची आज श्रीलंकेसोबत शेवटची लढाई होती. जर हा सामना पाकिस्तानने मोठ्या फरकाने जिंकला असता आणि नेट रन रेटमध्ये न्यूझीलंडला तीन गुणांसह मागे टाकले असते तर पाकिस्तानचा संघ सेमीफायनलसाठी पात्र ठरला. असता. आज पाकिस्तानने श्रीलंकेसमोर 213 धावांचा डोंगर उभा केला होता. पण उपांत्य फेरी गाठण्यासाठी पाकिस्तानने श्रीलंकेला 147  धावांवर रोखने गरजेचे होते. मात्र, ते शक्य झालं नाही. श्रीलंकेच्या संघानं कडवी झुंज देत 207 धावा केल्या. फक्त 5 धावांनी पाकिस्तानचा विजय झाला. पाकिस्तान जरी विजयी झाला असला तरी त्यांचा सेमीफायनलचा पत्ता कट झाला आहे.  

पाकिस्तान बाहेर, न्यूझीलंड आत

सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी पाकिस्तानला किमान 65 धावांनी विजय मिळवणे आवश्यक होता. त्यामुळं, पाकिस्तानी संघाला श्रीलंकेला 147 धावांचा टप्पा ओलांडता येणार नाही याची खात्री करावी लागली. एका क्षणी, श्रीलंकेने पहिले दोन विकेट लवकर गमावले, परंतु नंतर पवन रत्नायकेने अर्धशतक झळकावले, 37 चेंडूत 58 धावा केल्या. श्रीलंकेला 147 धावांवर रोखण्यात पाकिस्तान अपयशी ठरल्याने, ते टी20 विश्वचषकातून बाहेर पडले. दुसरीकडे, न्यूझीलंडने नेट रन रेटच्या आधारे अंतिम चारमध्ये स्थान निश्चित केले आहे.

कर्णधार दासुन शनाकाची 76 धावांची वादळी खेळी

पाकिस्तानने श्रीलंकेला 147 धावांवर रोखण्याची आशा बाळगली होती, परंतु कर्णधार दासुन शनाकाच्या 76 धावांच्या धमाकेदार खेळीने सर्व आशा धुळीस मिळवल्या. शनाकाने 31  चेंडूत दोन चौकार आणि आठ षटकारांसह 76  धावा केल्या. या खेळीमुळं पाकिस्तानचे उपांत्य फेरीत जाण्याचे स्वप्न भंग झाले आहे. शेवटच्या षटकात श्रीलंकेला 28 धावांची आवश्यकता होती. शाहीन आफ्रिदी गोलंदाजी करत होता, त्याने पहिल्या पाच चेंडूत 22 धावा दिल्या. परिणामी, श्रीलंकेला शेवटच्या चेंडूवर षटकाराची आवश्यकता होती. आफ्रिदीने वाइड लाईनच्या अगदी बाहेर यॉर्कर टाकला, जो शनाकाने वाइड समजून सोडला. यामुळं श्रीलंकेचा पाच धावांनी पराभव झाला आहे. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Team India: सूर्याच्या संघाला चंद्राचं ग्रहण, टीम इंडियानं पाळला क्षण; सरावाची वेळ बदलली, चर्चा तर होणारच
सूर्याच्या संघाला चंद्राचं ग्रहण, टीम इंडियानं पाळला क्षण; सरावाची वेळ बदलली, चर्चा तर होणारच
IND vs ENG Semifinal T20 World Cup 2026: अभिषेक शर्मा, अर्शदीप सिंग OUT, मोहम्मद सिराज IN...; इंग्लंडविरुद्धच्या सेमीफायनलसाठी अशी असेल टीम इंडियाची Playing XI
अभिषेक, अर्शदीप OUT, मोहम्मद सिराज IN...; इंग्लंडविरुद्धच्या सेमीफायनलसाठी अशी असेल भारताची Playing XI
Sanju Samson : कसा आहेस, दु:खी होऊ नको भावा,मोठी स्पर्धा आहे, संधी कधीही मिळू शकते..रोहित शर्मानं संजूला दिलेला सल्ला, ICC कडून व्हिडीओ शेअर
कसा आहेस, दु:खी होऊ नको भावा,मोठी स्पर्धा आहे, संधी कधीही मिळू शकते..रोहित शर्मानं संजूला दिलेला सल्ला
IND vs ENG Semifinal T20 World Cup 2026: इंग्लंडचे 5 खेळाडू धोकादायक, टीम इंडियाचं टेन्शन वाढणार; वानखेडेवर हाय-व्होल्टेज सेमीफायनल
इंग्लंडचे 5 खेळाडू धोकादायक, टीम इंडियाचं टेन्शन वाढणार; वानखेडेवर हाय-व्होल्टेज सेमीफायनल
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Jay Pawar on Ajit Pawar : झोपा काढणाऱ्या पायलटवर कारवाई कधी होणार? Special Report
Iran Attack Effect On Market : युद्ध पश्चिम आशियात, माल अडकला बंदरात Special Report
Israel America Attack Iran : इराणकडून हल्ल्याला उत्तर; अमेरिकेचे तळ लक्ष्य Special Report
Mumbai BMC : घरांसाठी मालमत्ता कर सवलतीची मर्यादा 700 चौरस फुटांपर्यंत वाढवणार
Iran Vs Israel Kolhapur Family : मुलं कतारमध्ये, मिसाईल हल्ले पाहिले, कोल्हापूरचे कुटुंबीय भयभीत

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dharashiv Politics : प्रसंगी विरोधात बसू, पण शिवसेनेत फूट पडू देणार नाही, प्रताप सरनाईकांची स्पष्ट भूमिका
प्रसंगी विरोधात बसू, पण शिवसेनेत फूट पडू देणार नाही, प्रताप सरनाईकांची स्पष्ट भूमिका
BJP Rajya Sabha Candidate List : भाजपची राज्यसभेसाठी पहिली यादी जाहीर, महाराष्ट्रातील नावांचं काय? पक्षाचे अध्यक्ष नितीन नवीन राज्यसभेवर जाणार
भाजपची राज्यसभेसाठी पहिली यादी जाहीर, महाराष्ट्रातील नावांचं काय? पक्षाचे अध्यक्ष नितीन नवीन राज्यसभेवर जाणार
Team India: सूर्याच्या संघाला चंद्राचं ग्रहण, टीम इंडियानं पाळला क्षण; सरावाची वेळ बदलली, चर्चा तर होणारच
सूर्याच्या संघाला चंद्राचं ग्रहण, टीम इंडियानं पाळला क्षण; सरावाची वेळ बदलली, चर्चा तर होणारच
Iran Israel War : इराण वि. इस्त्रायल-अमेरिका! पाकिस्तान इराणसोबत, तर इटलीच्या मेलोनींचीही स्पष्ट भूमिका; कोण कुणाच्या बाजूने? 
इराण वि. इस्त्रायल-अमेरिका! पाकिस्तान इराणसोबत, तर इटलीच्या मेलोनींचीही स्पष्ट भूमिका; कोण कुणाच्या बाजूने? 
मराठवाड्याच्या दाजींची नाद खुळा धुळवड, फुटले रंगांचे सिलेंडर; सदाबहार गाण्यांवर धरला ठेका, पाहा फोटो
मराठवाड्याच्या दाजींची नाद खुळा धुळवड, फुटले रंगांचे सिलेंडर; सदाबहार गाण्यांवर धरला ठेका, पाहा फोटो
Dhananjay Munde : धनंजय मुंडे यांना कृषी साहित्य खरेदी आणि इतर प्रकरणात दिलासा, पोस्ट करत म्हणाले, आपल्याला न्याय मिळाला म्हणून इतरांना हिणवू नका...
आपल्यापैकी अनेकांच्या भावनिक व अविचारी कृतीमुळं आपल्याविरुद्ध षडयंत्र करणाऱ्या बळ मिळतं, संयम महत्त्वाचा: धनंजय मुंडे 
EPFO : ईपीएफओ स्वत:हून 1.33 लाख खातेदारांच्या बँक खात्यात पैसे पाठवणार, पायलट प्रोजेक्टला मंजुरी, 1000 रुपयांपर्यंतची रक्कम खात्यात येणार
ईपीएफओ स्वत:हून 1.33 लाख खातेदारांच्या बँक खात्यात पैसे पाठवणार, पायलट प्रोजेक्टला मंजुरी, खात्यात 1000 रुपयांपर्यंत रक्कम येणार
Dharashiv Crime News: धाराशिवमध्ये कलाकेंद्र चालकाच्या घरात दरोडा; पिस्तूल अन् कोयते दाखवून 9 लाख 51 हजार लुटले, नेमकं काय घडलं?
धाराशिवमध्ये कलाकेंद्र चालकाच्या घरात दरोडा; पिस्तूल अन् कोयते दाखवून 9 लाख 51 हजार लुटले, नेमकं काय घडलं?
Embed widget