एक्स्प्लोर
आर अश्विनला सर गारफील्ड सोबर्स ट्रॉफी!
शिमला: धर्मशाला कसोटीतील विजयानंतर भारताचा अष्टपैलू रवीचंद्रन अश्विनला आयसीसीच्या सर्वोत्तम क्रिकेटवीरासाठीच्या सर गारफील्ड सोबर्स ट्रॉफीनं गौरवण्यात आलं.
14 सप्टेंबर 2015 ते 20 सप्टेंबर 2016 या कालावधीतील शानदार कामगिरीसाठी अश्विनला हा पुरस्कार देण्यात आला.
IndvsAus : टीम इंडियाची विजयाची गुढी, ऑस्ट्रेलियाला लोळवलं!
अश्विनच सर्वोत्तम कसोटीवीर पुरस्काराचाही मानकरी ठरला आहे. या कालावधीत अश्विननं आठ कसोटी सामन्यांत 48 विकेट्स काढल्या होत्या आणि 336 धावा केल्या होत्या.टीम इंडियाच्या विजयाचे 6 हिरो !
अश्विननं या कालावधीत 19 ट्वेन्टी20 सामन्यांत 27 विकेट्सही काढल्या होत्या. भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांच्या हस्ते अश्विनला ही ट्रॉफी प्रदान करण्यात आली. भारताचा ऑस्ट्रेलियावर विजय धर्मशालाच्या मैदानात टीम इंडियानं उभारली विजयाची गुढी. भारतानं चौथ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाला आठ विकेट्सनी हरवलं. भारताचा अजिंक्य रहाणेच्या नेतृत्त्वाखाली खेळताना हा पहिलाच कसोटी सामना होता. टीम इंडियानं ही मालिकाही 2-1 अशी खिशात टाकून बोर्डर-गावस्कर ट्रॉफी जिंकली आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारताला विजयासाठी 106 धावांचं आव्हान दिलं होतं. चौथ्या दिवशी भारतासमोर विजयासाठी 87 धावांचं माफक लक्ष्य होतं. त्याचा पाठलाग करताना मुरली विजय आठ धावांवर आणि चेतेश्वर पुजारा शून्यावर बाद झाला. पण लोकेश राहुल आणि अजिंक्य रहाणेनं अभेद्य अर्धशतकी भागीदारी रचून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. संबंधित बातम्याकर्णधार म्हणून पहिल्याच कसोटीत विजय, रहाणे नववा भारतीय
मुरली विजयबद्दल चुकीने अपशब्द निघाला, स्मिथचा माफीनामा
'तू बोलत राहा, मी मारत राहतो,' जाडेजाचं वेडला चोखं प्रत्युत्तर!
IndvsAus : टीम इंडियाची विजयाची गुढी, ऑस्ट्रेलियाला लोळवलं!
टीम इंडियाच्या विजयाचे 6 हिरो !
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर आता माझे मित्र नाहीत : विराट कोहली
टीम इंडियाच्या शिलेदारांवर बीसीसीआयकडून रोख बक्षीस
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
महाराष्ट्र
Advertisement