प्रो कबड्डी लीग : सातव्या सीजनसाठी लिलाव प्रक्रिया पूर्ण, सिद्धार्थ देसाई सर्वात महागडा खेळाडू
परदेशी खेळाडूंमध्ये इराणचा इस्माईल नबीबक्श सर्वात महागडा खेळाडू ठरला. बंगाल वॉरिअर्सने नबीबक्शला 77.75 लाखांना आपल्या संघासाठी खरेदी केलं.
मुंबई : प्रो कबड्डी लीगच्या सातव्या सीजनसाठीची लिलाव प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या लिलावामध्ये एकूण 200 खेळाडूंसाठी एकूण 50 कोटींची बोली लावण्यात आली. 200 मधील 173 खेळाडू भारतीय आहेत, तर 27 खेळाडू परदेशी आहेत. मागील सीजनमध्ये जलद 100 रेड पॉईंट्स घेणारा सिद्धार्थ देसाई आणि नितीन तोमर हे लिलावात करोडपती खेळाडू ठरले आहेत.
सिद्धार्थ देसाई सर्वात महागडा खेळाडू
गेल्या वर्षी 'यू मुम्बा'मधून खेळलेला सिद्धार्थ यंदा 'तेलुगु टायटन्स'मधून खेळताना दिसणार आहे. तेलुगु टायटन्सने सिद्धार्थला एक कोटी 45 लाखांना खरेदी केलं आहे. तर नितीन तोमरला पुणेरी पलटनने एक कोटी 20 लाखांना आपल्या संघात रिटेन केलं आहे.
सहा सीजन तेलुगु टायटन्समधून खेळलेल्या राहुल चौधरीला यावेळी तेलुगु टायटन्सने रिटेन केलं नाही. त्यामुळे राहुलला 94 लाख रुपयांना खरेदी करत तमिल थलायवाजने सातव्या सीजनसाठी आपल्या संघात समावेश केला आहे.
परदेशी खेळाडूंमध्ये इराणचा इस्माईल नबीबक्श सर्वात महागडा खेळाडू ठरला. बंगाल वॉरिअर्सने नबीबक्शला 77.75 लाखांना आपल्या संघासाठी खरेदी केलं. नबीबक्श आजवरजा दुसरा सर्वात महागडा परदेशी खेळाडू ठरला आहे. गेल्या सीजनमध्ये चांगली कामगिरी करणारा अबुजार मेघानीला तेलुगु टायटन्सने 75 लाखांना आपल्या संघात रिटेन केलं आहे.
भारतीय खेळाडू
सिद्धार्थ देसाई - 1 कोटी 45 लाख (तेलुगु टायटन्स) नितीन तोमर - 1 कोटी 20 लाख (पुणेरी पलटन) राहुल चौधरी - 94 लाख (तमिल थलाइवाज) मोनू गोयत - 93 लाख (यूपी योद्धा) ऋषांक देवाडिगा - 61 लाख (यूपी योद्धा) श्रीकांत जाधव - 68 लाख (यूपी योद्धा) चंद्रन रंजीत - 70 लाख (दबंग दिल्ली) रविन्दर पहल - 61 लाख (दबंग दिल्ली) अमित हुड्डा - 53 लाख (जयपूर पिंक पँथर्स) महेंदर सिंह - 80 लाख (बेंगलुरु बुल्स) सुरेंद्र नाड को - 77 लाख (पटना पायरेट्स) परवेश भैंसवाल - 75 लाख (गुजरात फार्च्यूनजायंट्स) संदीप नरवाल - 89 लाख (यू-मुम्बा)
परदेशी खेळाडू
इस्माइल नबीबक्श - 77.75 लाख (बंगाल वॉरियर्स) अबुजार मेघानी - 75 लाख (तेलुगू टाइटंस) जांग कुन ली - 40 लाख (पटना पाइरेट्स) मोहम्मद माघसोउदोलु - 35 लाख (पटना पाइरेट्स) डोंग जेओन - 25 लाख (यू-मुम्बा)