एक्स्प्लोर
Advertisement
मेसी, निर्णय मागे घे, राष्ट्राध्यक्षांची विनंती
न्यूजर्सी : गेल्या दशकभरापासून फुटबॉल चाहत्यांच्या गळ्यातलं ताईत बनलेला अर्जेंटिनाचा सुपरस्टार लायनेल मेसीनं आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्तीची घोषणा केली.
कोपा अमेरिकात चिलीविरुद्ध सामन्यात अर्जेंटिनाला पराभव स्वीकारावा लागला. अर्जेंटिनाला गेल्या तीन वर्षांत तीन मोठ्या स्पर्धांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आणि त्याच नैराश्येतून लायनेल मेसीनं आंतरराष्ट्रीय फुटबॉलला रामराम ठोकला.
मेसीच्या या निर्णयामुळं क्रीडाविश्वाला मोठा धक्का बसला आहे. त्यामुळेच अर्जेंटिनाचे अध्यक्ष मॉरिसियो मॅक्री यांनी मेसीला निवृत्तीचा निर्णय मागे घेण्याची विनंती केली आहे.
राष्ट्राध्यक्षांच्या विनंतीनंतर मेसी निर्णय मागे घेणार का याकडे जगभरातील फुटबॉल चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. मात्र अद्याप मेसीकडून कोणतंही उत्तर आलेलं नाही.
पराभव जिव्हारी
कोपा अमेरिकात चिलीविरुद्ध झालेल्या पराभवानंतर मेसीनं आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्तीचा निर्णय घेतला. सामना संपल्यानंतर पत्रकारांशी बोलताना मेसीनं आपला निर्णय जाहीर केला. "माझ्यासाठी राष्ट्रीय संघातला खेळ आता संपला आहे. चारवेळा फायनल गाठूनही मला जिंकता आलेलं नाही, त्यामुळं माझा अंतिम निर्णय झाला आहे. मला आता थांबायला हवं" अशी प्रतिक्रिया मेसीनं दिली.
मेसीनं आजवर 113 सामन्यांत अर्जेंटिनाचं प्रतिनिधित्त्व केलं असून त्याच्या नावावर सर्वाधिक 55 गोल जमा आहेत.
मेसीची कारकीर्द
17 मे 2005 साली मेसीनं हंगेरीविरुद्ध सामन्यातून अर्जेंटिनासाठी पदार्पण केलं. त्यानंतर मेसीनं आजवर अर्जेंटिनाचं 113 सामन्यांत प्रतिनिधित्त्व केलं. त्यात मेसीच्या नावावर सर्वाधिक 55 गोल जमा आहेत. तर व्यावसायिक फुटबॉलमध्ये लायनेल मेसीनं बार्सिलोनाला तब्बल 28 स्पर्धा जिंकून देण्याचा पराक्रम गाजवला आहे. बार्सिलोनासाठी मेसीनं 531 सामन्यांमध्ये तब्बल 453 गोल झळाकावले आहेत. याच कामगिरीसाठी मेसीला सर्वाधिक पाच वेळा जगातला सर्वोत्तम फुटबॉलर या पुरस्कारानं गौरवण्यात आलं आहे.
व्यावसायिक स्पर्धेत यश
व्यावसायिक फुटबॉलमध्ये मेसीनं आजवर जवळपास सर्वच स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम गाजवलाय. पण त्याच मेसीला आपल्या देशासाठी म्हणजेच अर्जेंटिनासाठी एकही स्पर्धा जिंकता आलेली नाही.
2007 साली व्हेनेझुएलात झालेल्या कोपा अमेरिकात अर्जेन्टिनाला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं होतं. अर्जेन्टिनाच्या त्या संघातही लायनेल मेसीचा समावेश होता. त्यानंतर 2010च्या फिफा विश्वचषकात लायनेल मेसीच्या अर्जेन्टिनाचं आव्हान उपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आलं होतं. मग 2011च्या कोपा अमेरिकातही मेसीचा समावेश असलेल्या अर्जेन्टिनाला उपांत्यपूर्व फेरीपर्यंतच मजल मारता आली. पण त्यानंतर मेसीला गेल्या तीन वर्षांत तीन मोठ्या स्पर्धा जिंकण्याची संधी होती. 2014च्या फिफा विश्वचषकात मेसीच्या अर्जेन्टिनाला जर्मनीकडून पराभव स्वीकारावा लागला. मग 2015च्या कोपा अमेरिकात चिलीनं अर्जेन्टिनावर मात केली. आणि त्यानंतर यंदाही अर्जेन्टिनाला चिलीकडून हार स्वीकारावी लागली.
मेसीनं गेल्या दशकभरापासून गाजवलेल्या पराक्रमामुळं त्याची तुलना ब्राझिलचे महान फुटबॉलर पेले आणि अर्जेन्टिनाच्या डिएगो मॅराडोना यांच्याशी केली जाऊ लागली. पण पेलेंनी ब्राझिलला तीनदा, तर मॅराडोनानं अर्जेन्टिनाला एकदा विश्वचषक जिंकून देण्याचा मान मिळवलाय. मात्र मेसीला अशी कामगिरी बजावता आलेली नाही आणि हाच सल मेसीच्या मनात कायम राहिल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
करमणूक
Advertisement