Abhishek Sharma Ind vs Nz : स्वतःवर विश्वास उरला नव्हता, पण... वर्ल्डकप जिंकताच अभिषेक शर्मा मनातलं सगळं बोलला; गौतम गंभीरबाबत मोठा खुलासा
Team India Champions T20 World Cup 2026 : सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारताने न्यूझीलंडला हरवून 2026 चा टी-20 विश्वचषक ट्रॉफी जिंकली.

Abhishek Sharma T20 World Cup 2026 : टीम इंडियाने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये इतिहास रचला गेला. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारताने न्यूझीलंडला हरवून 2026 चा टी-20 विश्वचषक ट्रॉफी जिंकली. भारत आता सलग दुसऱ्यांदा आणि एकूण तिसऱ्यांदा विजेता बनला आहे. दरम्यान, भारतीय संघाच्या ऐतिहासिक विजयात युवा फलंदाज अभिषेक शर्मा भावूक झाला. अंतिम सामन्यानंतर दिलेल्या मुलाखतीत अभिषेकने संपूर्ण स्पर्धेदरम्यान आलेल्या कठीण काळाबद्दल मनमोकळेपणाने सांगितले.
𝐂.𝐇.𝐀.𝐌.𝐏.𝐈.𝐎.𝐍.𝐒 🇮🇳#TeamIndia clinch a record 3️⃣rd ICC Men's #T20WorldCup title 🏆
— BCCI (@BCCI) March 8, 2026
Take. A. Bow 🫡#MenInBlue | #Final | #INDvNZ pic.twitter.com/nml1AZY5tK
अभिषेक शर्मा काय म्हणाला?
सामना संपल्यानंतर अभिषेक शर्मा म्हणाला की, “नक्कीच… एक वेळ अशी आली होती की मनात प्रश्न पडत होता, हे सगळं माझ्याबरोबरच का होतंय? या स्पर्धेत सतत फ्लॉप ठरत होता. पण एक गोष्ट मात्र खूप स्पष्ट होती, कोच गौतम गंभीर आणि कर्णधारांचा माझ्यावर प्रचंड विश्वास होता. मी आधीही सांगणार होतो, पण आज सांगण्यासाठी सर्वात योग्य दिवस आहे.
पुढे तो म्हणाला की, प्रामाणिकपणे सांगायचं तर, एका टप्प्यावर मी स्वतःवरही शंका घ्यायला लागलो होतो. हा माझ्यासाठी सोपा टूर्नामेंट नव्हता. अशा परिस्थितीचा मी कधी अनुभव घेतला नव्हता. हा माझा पहिलाच वर्ल्ड कप होता. पण संघातील प्रत्येकजण मला सतत सांगत होता, तू एक मोठा सामना जिंकून देणार आहेस.
Make it THREEEEEEE! 🏆🏆🏆#TeamIndia have repeated & defeated history by becoming the first team to 👇
— Star Sports (@StarSportsIndia) March 8, 2026
▪️ Win back-to-back titles
▪️Three titles
▪️Win the title at home#T20WorldCup #INDvNZ pic.twitter.com/bQlm5t0D3k
अभिषेक शर्मा पुढे म्हणाला की, मी माझ्या प्रक्रियेवर विश्वास ठेवून खेळत राहिलो. पण एका तरुण खेळाडूसाठी हे सोपं नव्हतं. भारतीय संघात नुकतीच दोन वर्षे झाली असताना असा काळ अनुभवणं कठीणच असतं. मात्र या संघाने त्या दिवसांत मला ज्या पद्धतीने साथ दिली, ते मी याआधी कधीच अनुभवलं नव्हतं. खरं सांगायचं तर, संपूर्ण वर्षभर तुम्ही संघासाठी चांगलं खेळत असता, पण मोठ्या प्रसंगी ते जमलं नाही की खूप वाईट वाटतं. या स्पर्धेतही काही सामन्यांमध्ये मला खूप चांगलं करायचं होतं, पण ते शक्य झालं नाही. त्यामुळे मी मध्येच भावुकही झालो होतो.
शेवटी तो म्हणाला की, मला वाटत होतं की मी कोच किंवा कर्णधाराशी बोलावं, पण ते स्वतःच माझ्याकडे यायचे आणि एकच गोष्ट सांगायचे, तू आमच्यासाठी मोठे सामने जिंकून देणार आहेस. मी त्या दिवसाची वाट पाहत होतो… आणि यासाठी यापेक्षा चांगला दिवस असूच शकत नाही.”
हे ही वाचा -




















