एक्स्प्लोर
भारताची थट्टा करणाऱ्या ब्रिटिश पत्रकाराचं विरुला आव्हान
नवी दिल्लीः भारताला पुढील ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक मिळेपर्यंत इंग्लंड वर्ल्ड कप जिंकलेला असेल, असं आव्हान ब्रिटिश पत्रकाराने भाराताचा माजी तडाखेबाज फलंदाज वीरेंद्र सेहवागला दिलं आहे. भारत रिओ ऑलिम्पिकमधील दोनच पदकांवर सेलिब्रेशन करत आहे, म्हणणाऱ्या ब्रिटिश पत्रकाराला विरुने सडेतोड उत्तर दिलं होतं. त्यानंतर दोघांत पुन्हा ट्विटर वॉर सुरु झाला आहे.
इंग्लंडने काल पाकिस्तानविरुद्ध 444 धावांचा डोंगर उभा केल्यानंतर पिअर्स मॉर्गनने हे आव्हान दिलं. भारताला पुढील ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक मिळेपर्यंत इंग्लंड वर्ल्ड कप जिंकलेला असेल, यावर 10 लाखांची पैज लावतो का, अशा शब्दात मॉर्गनने आव्हान दिलं.
संबंधित बातमीः सव्वाशे कोटी लोकसंख्येच्या देशाचं 2 पदकांवर सेलिब्रेशन, या ब्रिटिश पत्रकाराच्या वक्तव्याचा विरुकडून समाचार
मॉर्गनने अगोदर भारताला पहिलं ऑलिम्पिकचं पहिलं सुवर्ण मिळेपर्यंत इंग्लंड वर्ल्ड कप जिंकलेला असेल असं लिहिलं, मात्र नंतर चूक लक्षात आल्यावर नवं ट्वीट केलं. कारण भारत ऑलिम्पिकमधील पहिलं ऑलिम्पिक अगोदरच जिंभारताला ऑलिम्पिकमध्ये आतापर्यंत 9 ऑलिम्पिक सुवर्ण मिळाले आहे. यापैकी हॉकीत 8 तर नेमबाज अभिनव बिंद्राने एक सुवर्ण पदक मिळवलं आहे. https://twitter.com/piersmorgan/status/770704694113165312 विरुने आतापर्यंत मॉर्गनच्या या ट्विटचं उत्तर दिलेलं नाही. मात्र विरु नेहमीप्रमाणे यावेळीही खास शैलीत उत्तर देईल, हे निश्चित आहे. मात्र त्यापूर्वी भारतीय ट्विटराईड्सनी मॉर्गन यांचा जोरदार समाचार घेतला आहे.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
शिक्षण
नाशिक
राजकारण
Advertisement