Paris Olympics 2024 : आज भारतीय नेमबाजांना पदक जिंकण्याची संधी, हॉकीचा संघही न्यूझीलंडविरुद्ध मैदानात उतरणार
पॅरिस ऑलिम्पिक 2024 (Paris Olympics 2024) ची सुरुवात मोठ्या दिमाखात झाली आहे. यामध्ये भारताच्या खेळांडूंचे कोणकोणते सामने होणार आहे, याबाबातची माहिती पाहुयात.
Paris Olympics 2024 : पॅरिस ऑलिम्पिक 2024 (Paris Olympics 2024) ची सुरुवात मोठ्या दिमाखात झाली आहे. संपूर्ण जगाच्या नजरा जागतिक क्रीडा स्पर्धेवर लागल्या आहेत. यासोबतच सर्वांच्या नजरा भारतीय संघाकडे लागल्या आहेत. पॅरिस 2024 ऑलिम्पिकमध्ये 16 खेळांमध्ये 100 हून अधिक खेळाडू भारताचे प्रतिनिधित्व करत आहेत. पॅरिस 2024 ऑलिम्पिकमध्ये, 44 वर्षीय भारतीय टेनिस स्टार रोहन बोपण्णा हा सर्वात वयस्कर खेळाडू आहे, तर 14 वर्षीय जलतरणपटू धनिधि देसिंघू सर्वात तरुण खेळाडू सहभागी आहे. दरम्यान, आज कोणकोणत्या स्पर्धा होणार आहेत? याबाबतची माहिती पाहुयात.
आज कोणते भारतीय खेळाडू मैदानात उतरणार?
पॅरिस ऑलिम्पिक आजपासून अधिकृतपणे सुरू होत आहे. अनेक भारतीय खेळाडू आज ॲक्शनमध्ये दिसणार आहेत. नेमबाज दिवसाची सुरुवात करतील. आज भारतीय नेमबाजांना पदक जिंकण्याची संधी आहे. याशिवाय भारताचे बॅडमिंटन स्टार गट फेरीचे सामनेही आज खेळवले जाणार आहेत. दिवसाच्या अखेरीस, भारतीय हॉकी संघ मोहिमेला सुरुवात करण्यासाठी न्यूझीलंडविरुद्ध गट फेरीचा सामना खेळेल. भारताचे टेनिस आणि टेबल टेनिसपटूही आज मैदानात उतरणार आहेत.