एक्स्प्लोर

Deepika Kumar Olympic 2020 Exit: तिरंदाजीत दीपिका कुमारीचं आव्हान संपुष्टात, क्वार्टर फायनलमध्ये सलग तीन सेटमध्ये पराभव 

Deepika Kumar Olympic 2020 Exit:  तिरंदाजीत दीपिका कुमारीचं आव्हान संपुष्टात आलं आहे. कोरियाच्या एम सेनकडून क्वार्टर फायनलमध्ये सलग तीन सेटमध्ये दीपिकाचा पराभव झाला आहे.

Deepika Kumar Olympic 2020 Exit:  तिरंदाजीत दीपिका कुमारीचं आव्हान संपुष्टात आलं आहे. कोरियाच्या एम सेनकडून क्वार्टर फायनलमध्ये सलग तीन सेटमध्ये दीपिकाचा पराभव झाला आहे. आतापर्यंत दीपिकानं जबरदस्त कामगिरी करत क्वार्टर फायनलपर्यंतचा प्रवास केला होता. मात्र या सामन्यात तिला सलग तीन सेट गमावत पराभव स्वीकारावा लागला. दीपिकाचा एम सेननं 6-0 असा पराभव करत सेमी फायनलमध्ये प्रवेश केला. या पराभवामुळं दीपिका कुमारीचं आव्हान संपुष्टात आलं आहे.  दीपिका कुमारी भारताकडून ऑलिम्पिकच्या क्वार्टर फायनलमध्ये पोहोचणारी पहिली महिला तिरंदाज ठरली आहे.  

दीपिका कुमारीनं क्वार्टर फायनल्समध्ये धडक दिली होती. भारताला दीपिका कुमारीकडून पदकाची अपेक्षा होती. दीपिका कुमारी जगातील अव्वल तीरंदाजांपैकी एक आहे.  दीपिकाचा पती आणि भारतीय तीरंदाज अतानू दासनंही क्वार्टर फायनल्समध्ये स्थान मिळवलं आहे. 

Tokyo Olympics 2020 LIVE : तिरंदाजीत दीपिका कुमारीकडून निराशा, कोरियाच्या एम सेनकडून क्वार्टर फायनलमध्ये सलग तीन सेटमध्ये पराभव, आव्हान संपुष्टात 

लवलिना जिंकली, भारताचं आणखी एक पदक निश्चित  
महिला बॉक्सिंगमध्ये भारतीय बॉक्सर लवलिनानं (Lovlina Borgohai Medal)जबरदस्त कामगिरी करत क्वार्टर फायनल जिंकली आहे. या विजयासह लवलीनानं इतिहास रचला असून भारताचं आणखी एक पदक निश्चित झालं आहे. क्वार्टर फायनलमध्ये भारताच्या लवलीनानं चिनी तायपेच्या निएन चिन चेनला पराभूत करत पदकावर शिक्कामोर्तब केलं आहे. 69 किलोग्राम गटात लवलिनानं भारताला आणखी एका पदक मिळवून दिलं आहे. चिनी तायपेच्या निएन चिन चेन हिला पराभूत करत लवलीनानं मेडल निश्चित केलं आहे. लवलीनानं आता सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. सेमीफायनलमध्ये ती पराभूत जरी झाली तरी तिला कांस्य पदक तरी मिळणार आहे.  69 किलोग्राम गटात लवलीना भारताकडून मेडल जिंकणारी पहिली महिला खेळाडू आहे. लवलीनाकडे भारताला सुवर्णपदक जिंकून देण्याची संधी आहे. मात्र यासाठी लवलीनाला आणखी दोन सामने जिंकावे लागणार आहेत.  

भारतीय महिला हॉकी संघाचा आयर्लंडवर विजय

नवनीत कौरने केलेल्या गोलच्या जीवावर भारतीय महिला हॉकी संघाने आयर्लंडचा 1-0 असा पराभव केला आहे. या विजयामुळे भारतीय महिला हॉकी संघाचे ऑलिम्पिकमधील आव्हान अद्याप कायम राहिलं आहे. भारत-आयर्लंड महिला हॉकीचा आजचा सामना हा भारतीय महिला संघासाठी 'करो या मरो' स्थितीचा होता. त्यामुळे आजचा सामना जिंकायचाच या इराद्याने प्रत्येक खेळाडू मैदानात उतरल्याचं दिसून आलं. खेळ रंगात आला असताना 57 व्या मिनिटाला नवनीत कौरने एका पासवर अप्रतिमरित्या चेंडू जाळ्यात ढकलला आणि भारताने शेवटच्या क्षणी 1-0 अशी आघाडी घेतली. 

नेमबाज मनु भाकरचं आव्हान संपुष्टात

नेमबाजीत भारतासाठी पदकाची अपेक्षा संपताना दिसत आहे. 25 मीटर एअर पिस्तूल इव्हेंटमध्ये क्वालिफिकेशन आणि रॅपिड राउंडमध्ये मनु भाकरनं एकूण 582 गुण मिळवले आणि ती 11व्या क्रमांकावर राहिली. टॉप 8 खेळाडूंनाच फायनल्समध्ये स्थान मिळतं. त्यामुळे आपलं पहिलं ऑलिम्पिक खेळणाऱ्या मनु भाकरचं आव्हान संपुष्टात आलं आहे. 

Tokyo Olympics 2020: लवलीनानं रचला इतिहास, सेमीफायनलमध्ये एन्ट्री, महिला बॉक्सिंगमध्ये भारताचं पदक निश्चित

60 किलो वजनगटात भारताच्या सिमरनजीतचा पराभव

लवलीनाच्या सामन्याआधी महिला बॉक्सिंगमध्ये 60 किलो वजनगटात भारताला निराशा हाती लागली. भारताच्या सिमरनजीतचा पराभव झाल्यानं तिचं आव्हान संपुष्टात आलं. सिमरनजीतचा 5-0 अशा फरकानं हार पत्कारावी लागली. यासोबतच सिमरनजीतचं ऑलिम्पिकमधील आव्हान संपुष्टात आलं.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 06 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सElection Commission PC :  EVM आणि पंडीलकर यांचा काहीही संबंध नाही- निर्णय अधिकारीSangali Vidhan Sabha Election : सांगलीच्या जागेवरून मविआत विधानसभेलाही वाद?BalKavdi Dam : साताऱ्यातील बलकवडी धरणात 24 वर्षांनी शिवकालीन अवशेष दिसले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Ravindra Waikar kin Mangesh Pandilkar : ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
Embed widget