एक्स्प्लोर

Tokyo Olympics 2020 : नवज्योत कौरचा धमाका; भारतीय महिला हॉकी संघाची आयर्लंडवर 1-0 नं मात, स्पर्धेत आव्हान कायम

Tokyo Olympic, Women's Hockey: भारतीय महिला हॉकी संघाने आयर्लंडवर 1-0 अशी मात करत विजय मिळवला आहे. 

Tokyo Olympics 2020 :  नवज्योत कौरने केलेल्या गोलच्या जीवावर भारतीय महिला हॉकी संघाने आयर्लंडचा 1-0 असा पराभव केला आहे. या विजयामुळे भारतीय महिला हॉकी संघाचे ऑलिम्पिकमधील आव्हान अद्याप कायम राहिलं आहे. 

भारत-आयर्लंड महिला हॉकीचा आजचा सामना हा भारतीय महिला संघासाठी 'करो या मरो' स्थितीचा होता. त्यामुळे आजचा सामना जिंकायचाच या इराद्याने प्रत्येक खेळाडू मैदानात उतरल्याचं दिसून आलं. खेळ रंगात आला असताना 57 व्या मिनिटाला नवज्योत कौरने एका पासवर अप्रतिमरित्या चेंडू जाळ्यात ढकलला आणि भारताने शेवटच्या क्षणी 1-0 अशी आघाडी घेतली. 

भारतीय महिला हॉकी संघाच्या आजच्या विजयामुळे संघाचे ऑलिम्पिकमधील आव्हान कायम असून पदकाच्या आशा अद्याप कायम आहेत.

लवलिना जिंकली, भारताचं आणखी एक पदक निश्चित  
 महिला बॉक्सिंगमध्ये भारतीय बॉक्सर लवलिनानं (Lovlina Borgohai Medal)जबरदस्त कामगिरी करत क्वार्टर फायनल जिंकली आहे. या विजयासह लवलीनानं इतिहास रचला असून भारताचं आणखी एक पदक निश्चित झालं आहे. क्वार्टर फायनलमध्ये भारताच्या लवलीनानं चिनी तायपेच्या निएन चिन चेनला पराभूत करत पदकावर शिक्कामोर्तब केलं आहे. 69 किलोग्राम गटात लवलिनानं भारताला आणखी एका पदक मिळवून दिलं आहे. चिनी तायपेच्या निएन चिन चेन हिला पराभूत करत लवलीनानं मेडल निश्चित केलं आहे. लवलीनानं आता सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. सेमीफायनलमध्ये ती पराभूत जरी झाली तरी तिला कांस्य पदक तरी मिळणार आहे.  69 किलोग्राम गटात लवलीना भारताकडून मेडल जिंकणारी पहिली महिला खेळाडू आहे. लवलीनाकडे भारताला सुवर्णपदक जिंकून देण्याची संधी आहे. मात्र यासाठी लवलीनाला आणखी दोन सामने जिंकावे लागणार आहेत.  

60 किलो वजनगटात भारताच्या सिमरनजीतचा पराभव

लवलीनाच्या सामन्याआधी महिला बॉक्सिंगमध्ये 60 किलो वजनगटात भारताला निराशा हाती लागली. भारताच्या सिमरनजीतचा पराभव झाल्यानं तिचं आव्हान संपुष्टात आलं. सिमरनजीतचा 5-0 अशा फरकानं हार पत्कारावी लागली. यासोबतच सिमरनजीतचं ऑलिम्पिकमधील आव्हान संपुष्टात आलं.

नेमबाज मनु भाकरचं आव्हान संपुष्टात

नेमबाजीत भारतासाठी पदकाची अपेक्षा संपताना दिसत आहे. 25 मीटर एअर पिस्तूल इव्हेंटमध्ये क्वालिफिकेशन आणि रॅपिड राउंडमध्ये मनु भाकरनं एकूण 582 गुण मिळवले आणि ती 11व्या क्रमांकावर राहिली. टॉप 8 खेळाडूंनाच फायनल्समध्ये स्थान मिळतं. त्यामुळे आपलं पहिलं ऑलिम्पिक खेळणाऱ्या मनु भाकरचं आव्हान संपुष्टात आलं आहे. 

तीरंदाजीत भारताची कमाल, दीपिका कुमारीची क्वार्टर फायनल्समध्ये धडक

तीरंदाजीत दीपिका कुमारीनं क्वार्टर फायनल्समध्ये धडक दिली आहे. भारताला दीपिका कुमारीकडून पदकाची अपेक्षा आहे. दीपिका कुमारी जगातील अव्वल तीरंदाजांपैकी एक आहे. दीपिका कुमारी आज क्वार्टर फायनल्सच्या सामना आज खेळणार आहे.  दीपिकाचा पती आणि भारतीय तीरंदाज अतानू दासनंही क्वार्टर फायनल्समध्ये स्थान मिळवलं आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघाची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Ravindra Waikar kin Mangesh Pandilkar : ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Top 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha 04 PMRavindra Waykar on EVM : ईव्हीएमसोबत छेडछाड केल्याचा प्रश्नच येत नाही, रवींद्र वायकरांची प्रतिक्रियाABP Majha Headlines : 04 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सRavindra Waykar : मंगेश पडिलकरजवळचा फोन निवडणूक अधिकाऱ्याचा? ड्रायव्हर बोलवण्यासाठी फोन वापरल्याचा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघाची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Ravindra Waikar kin Mangesh Pandilkar : ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
Embed widget