(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Tokyo Olympics 2020: लवलीनानं रचला इतिहास, सेमीफायनलमध्ये एन्ट्री, महिला बॉक्सिंगमध्ये भारताचं पदक निश्चित
Tokyo Olympics 2020 LIVE : भारतीय बॉक्सर लवलिनानं (Lovlina Borgohai Medal)जबरदस्त कामगिरी करत क्वार्टर फायनल जिंकली आहे. या विजयासह लवलीनानं इतिहास रचला असून भारताचं आणखी एक पदक निश्चित झालं आहे.
Tokyo Olympics 2020 LIVE : महिला बॉक्सिंगमध्ये भारतीय बॉक्सर लवलिनानं (Lovlina Borgohai Medal)जबरदस्त कामगिरी करत क्वार्टर फायनल जिंकली आहे. या विजयासह लवलीनानं इतिहास रचला असून भारताचं आणखी एक पदक निश्चित झालं आहे. क्वार्टर फायनलमध्ये भारताच्या लवलीनानं चिनी तायपेच्या निएन चिन चेनला पराभूत करत पदकावर शिक्कामोर्तब केलं आहे. 69 किलोग्राम गटात लवलिनानं भारताला आणखी एका पदक मिळवून दिलं आहे.
चिनी तायपेच्या निएन चिन चेन हिला पराभूत करत लवलीनानं मेडल निश्चित केलं आहे. लवलीनानं आता सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. सेमीफायनलमध्ये ती पराभूत जरी झाली तरी तिला कांस्य पदक तरी मिळणार आहे.
CREATES HISTORY 🤩@LovlinaBorgohai puts up a brilliant performance and secures 1st medal for 🇮🇳 from boxing in 69 kg at @Tokyo2020 She beat Chinese Taipei's Chen NC 4-1 in QF to reach semis 🥳#RingKeBaazigar#boxing#Tokyo2020#Cheer4India#TeamIndia pic.twitter.com/28cpzoUxZY
— Boxing Federation (@BFI_official) July 30, 2021
69 किलोग्राम गटात लवलीना भारताकडून मेडल जिंकणारी पहिली महिला खेळाडू आहे. लवलीनाकडे भारताला सुवर्णपदक जिंकून देण्याची संधी आहे. मात्र यासाठी लवलीनाला आणखी दोन सामने जिंकावे लागणार आहेत.
60 किलो वजनगटात भारताच्या सिमरनजीतचा पराभव
नेमबाजीत भारतासाठी पदकाची अपेक्षा संपताना दिसत आहे. 25 मीटर एअर पिस्तूल इव्हेंटमध्ये क्वालिफिकेशन आणि रॅपिड राउंडमध्ये मनु भाकरनं एकूण 582 गुण मिळवले आणि ती 11व्या क्रमांकावर राहिली. टॉप 8 खेळाडूंनाच फायनल्समध्ये स्थान मिळतं. त्यामुळे आपलं पहिलं ऑलिम्पिक खेळणाऱ्या मनु भाकरचं आव्हान संपुष्टात आलं आहे.