सुवर्णपदक जिंकणाऱ्या पाकिस्तानच्या अर्शद नदीमवर बक्षिसांचा वर्षाव; सासऱ्यांकडून मिळणार म्हैस
Paris Olympics 2024 Arshad Nadeem: अर्शद नदीमने भारताच्या नीरज चोप्राला हरवून सुवर्णपदक जिंकले. सुवर्णपदक जिंकल्यानंतर अर्शदवर बक्षिसांचा वर्षाव होत आहे.
![सुवर्णपदक जिंकणाऱ्या पाकिस्तानच्या अर्शद नदीमवर बक्षिसांचा वर्षाव; सासऱ्यांकडून मिळणार म्हैस Paris Olympics 2024 Pakistan Arshad Nadeem who won the gold medal will be gifted a buffalo by his father in law सुवर्णपदक जिंकणाऱ्या पाकिस्तानच्या अर्शद नदीमवर बक्षिसांचा वर्षाव; सासऱ्यांकडून मिळणार म्हैस](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/08/12/3ee761f90917d98648f3f2df1fd5a9ac172345996125189_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Paris Olympics 2024 Arshad Nadeem: पाकिस्तानच्या अर्शद नदीमने (Arshad Nadeem) पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये (Paris Olympics 2024) सुवर्णपदक जिंकले. अर्शद नदीमने भालाफेक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले होते. अर्शदने भारताच्या नीरज चोप्राला हरवून सुवर्णपदक जिंकले. सुवर्णपदक जिंकल्यानंतरच अर्शदवर बक्षिसांचा वर्षाव होत आहे.
सुवर्णपद जिंकल्यानंतर अर्शद नदीमला 50 हजार डॉलर (सुमारे 41,97,552 भारतीय रुपये) बक्षीस म्हणून मिळाले. आता अर्शद नदीमला सासरच्या मंडळींकडून खास म्हैस भेट दिली जाणार आहे. अर्शदचे सासरे मुहम्मद नवाज यांनी स्थानिक मीडियाशी बोलताना स्वतः अर्शदला एक म्हैस भेट देणार असल्याचे सांगितले. नीरजच्या गावात म्हैस भेट म्हणून देणे खूप मौल्यवान आणि आदरणीय मानले जाते.
अर्शद नदीमचे सासरे काय म्हणाले?
अर्शद नदीमचे सासरे मुहम्मद नवाज म्हणाले की, चांगली कामगिरी आणि नाव कमावून, यश मिळून देखील अर्शद आजही आई-वडील आणि भावांसोबत गावात राहतो. अर्शदचे सासरे नवाज यांना 4 मुले आणि 3 मुली आहेत. त्यांची धाकटी मुलगी आयशीचे लग्न नदीमशी झाले आहे. जेव्हा आम्ही आमच्या मुलीचे लग्न अर्शद नदीमशी करायचे ठरवले, तेव्हा तो छोटं-मोठं काम करत होता. पण त्याला त्याच्या खेळाची आवड होती आणि तो त्याच्या शेतात आणि घरात भाला फेकण्याचा सराव करायचा, असं नवाज यांनी सांगितले.
अर्शद नदीमचा ऑलिम्पिकमध्ये रेकॉर्ड अन् सुवर्णपदक-
अर्शद नदीमने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये एक विक्रम नोंदवला आणि सुवर्णपदक जिंकले. अर्शद नदीमने 92.97 मीटर फेक केली होती. त्याच्या या थ्रोची ऑलिम्पिक रेकॉर्ड बुकमध्ये नोंद झाली आहे. या स्पर्धेत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या भारताच्या नीरज चोप्राने 89.45 मीटर फेक करून रौप्य पदक पटकावले.
अर्शद अन् नीरजच्या आईंच्या प्रतिक्रिया चर्चेचा विषय-
अर्शद नदीमची आई आणि नीरज चोप्राची आई या दोघांनी भालाफेक स्पर्धेतील विजयानंतर दिलेली प्रतिक्रिया चर्चेचा विषय ठरत आहे. नीरज चोप्राच्या आई सरोज देवी यांनी ज्यानं सुवर्णपदक जिंकलं तो देखील आमचा मुलगा असून तो मेहनत करत असल्याचं म्हटलं होतं. सरोज देवी यांच्यानंतर पाकिस्तानच्या अर्शद नदीमच्या आईनं देखील नीरज चोप्राविषयी भावना व्यक्त केल्या आहेत. नीरज चोप्रा माझा मुलगा नदीमच तो मित्र अन् भाऊ आहे. जय पराजय आपल्या नशीबाचा भाग आहे. नीरज पण माझा मुलगा आहे, अल्लाहताला त्याला देखील यशस्वी करो, तो अर्शदचा भाऊ आहे अन् मित्र पण देखील आहे, असं अर्शद नदीमचा मित्र आहे, असं अर्शद नदीमच्या आईने म्हटलं.
संबंधित बातमी:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)